नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की तुम्ही तुमची इच्छा असूनही तुम्ही तुमच्या सवयी का नाही बदलू शकत. असं का होतं की काही लोक स्वत:वर विश्वास ठेवतात व काही नाही ठेवू शकत. यशस्वी लोक आणि सर्वसामान्य लोकांमध्ये सगळ्यात मोठा फरक हा नाहीये की त्यांच्या बाहेरील जगात काय चालू आहे. तर वास्तविक मध्ये सगळ्यात मोठा फरक हा असतो की, त्यांच्या आत मध्ये काय चालू आहे. “डॉक्टर जोसेफ मर्फी” ज्यांनी पुस्तक लिहिले आहे द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड ते म्हणतात, “द लॉ ऑफ लाइफ इज द लॉ ऑफ बिलीफ” विश्वास हा तुमच्या मेंदूमधील प्री-प्रोग्राम थॉट्स असतात.
जस तुम्ही विचार करता, (feel) करता तसेच तुमच्या लाईफ मध्ये घडत असतं. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असल तरी जेव्हा तुम्ही अमलात अणाल तेव्हा तुम्हाला त्याचा प्रत्यय नक्की येईल. जोसेफ मर्फी यांनी हे त्यांच्या लाईफ मध्ये सिद्ध करून दाखवले आहे. एकदा त्यांना स्याक्रोमा नावाचा रोग झाला. तर त्यांनी त्यांच्या कडच्या सगळ्या ट्रिक वापरून स्याक्रोमाला ठीक करून दाखवलं. जेव्हा त्यांनी स्वतःला ठीक केलं तेव्हा त्यांना आपल्या सबकॉन्शियस माईंडच्या पावर वर पूर्णपणे विश्वास बसला.
केवळ केवळ तुम्ही या गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तर या गोष्टी ट्राय करा. व स्वतःला सिद्ध करा. तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. वैज्ञानिक दृष्टीने पण हे सिद्ध झालेल आहे की तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या बॉडीवर (शरीरावर) होतो. प्ल्यासोबो इफेक्ट या नावाच्या एका ट्रीटमेंटमध्ये लोकांना नकली औषधे दिली जातात. पण त्यांना सांगण्यात येते की ही गुणकारी औषधे आहे.
असे पाहण्यात आले की औषधी नकली असून देखील पेशंट वर त्याचा चांगला प्रभाव पडला. व त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. दुसरा आहे नासेबो इफेक्ट ज्यामध्ये खरे पाहता पेशंट तंदुरुस्त आहे. पण त्याला सांगितलं गेलं की अमुक एक प्रकारची बिमारी तुला झाली आहे. तर त्याच्यात खरच त्या बिमारीची लक्षणे बघितली गेली. ज्या प्रकारे आपल्या विचारांचा इफेक्ट आपले बॉडीवर होतो. त्याच प्रकारे आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर, आपल्या आर्थिक परिस्थितीवर, आणि आनंदावर पण होत असतो. आपल्या मेंदूचे दोन भाग असतात. कॉन्शियस माईंड आणि सबकॉन्शियस माईंड सध्या आपण जी माहिती पाहत आहोत ती, किंवा आपण जो आवाज ऐकतो तो म्हणजे तुमचा “कॉन्शियस माईंड”.
पण तुमच्या मेंदूमध्ये जी गोष्ट तुमच्या हार्टबीट तुमचा श्वास कंट्रोल करते ते म्हणजे तुमचे “सबकॉन्शियस माईंड”. जोसेफ मर्फी एक उदाहरण देतात की कॉन्शियस माईंड आणि सबकॉन्शियस माईंड यामध्ये फरक काय आहे हे कळण्यासाठी. तुमचे कॉन्शियस माइंड हे एका जहाजाचे कॅप्टन सारखे असते. ज्या लोकांना ऑर्डर्स देतो. की काय काम करायचा आहे, किंवा सध्या मला काय करायचा आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, की चालायचं की बसायचं या सर्व प्रकारे. या ऑर्डर तुमचा कॉन्शियस माईंड देतो. आणि ऑर्डर्स फॉलो करणारे जे असतात ते म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माईंड.
जसे की जहाजामध्ये ऑर्डर फॉलो करणारे कृमेन हे सबकॉन्शियस माईंड असतात. आणि ते कधी कॅप्टनला प्रश्न विचारत नाही किंवा वाद घालत नाही. तसेच तुमचे सबकॉन्शियस माईंड देखील तुमच्या कॉन्शियस माईंडला प्रश्न न विचारता ऑर्डर्स फॉलो करतो. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की, लोक स्वतःची लाईफ बदलू शकत नाही. ते आपल्या सबकॉन्शियस माईंडला परत सांगतात की मी हुशार नाहीये, माझ्याजवळ पैसे नाहीयेत, मला खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, व त्यांचे सबकॉन्शियस माईंड याच वाक्यांना ऑर्डर समजतो व ते खरे करून दाखवतो. तुम्ही म्हणाले की माझी मेमरी चांगली नाहीये तर तुमच्या सबकॉन्शियस माईंड हेच फॉलो करेल.
जर तुम्ही म्हणाले की माझ्यात आत्मविश्वास नाही तर तुमचा सबकॉन्शियस मेंदू तुम्हाला तसं बनवुन टाकेल. पण या सगळ्यांमध्ये गुड न्यूज आहे ही आहे की, जर तुम्ही याच्या उलट बोलाल तर ते पण खरं होईल. जर तुम्ही म्हणाले की मी हुशार आहे व माझी मेमरी चांगली आहे तर तुमच्या सबकॉन्शियस मेंदू हे खरं करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. जर तुम्हाला तुमची लाईफ बदलायचे असेल तर पहिला मार्ग आहे तुमचे विचार बदला. ते तुम्ही करू शकता ऑटो सजेशन चा वापर करून. ऑटो सजेशन म्हणजे जे तुमचे चांगले विचार आहे ते तुम्हाला परत परत तुमच्या सबकॉन्शियस माईंडला सांगायचेत.
बेसिकली तुम्हाला तुमच्या कॉन्शियस माईंडला एक वॉचमन सारखं बनवावे लागेल. की फक्त चांगले विचारच मध्ये जातील आणि वाईट विचार मध्ये जाणार नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर,, एक 75 वर्षाच्या आजी नेहमी म्हणायच्या की माझी मेमरी खराब आहे. पण त्यांनी जोसेफ मर्फीच्या ऑर्डर सजेशन बद्दल त्यांनी ऐकल होत. तर त्यांनी हे बोलायला सुरुवात केली की माझी मेमरी आता चांगली होत आहे, मला जे पण काही लक्षात ठेवायचे ते मी ठेवू शकते, आणि असं म्हणत गेल्यामुळे त्यांची मेमरी इम्प्रू होऊ लागली. अशाच प्रकारे निगेटिव सूचना पण काम करतात.
जेव्हा आपण आपल्या मेंदूला नकारात्मक सूचनांनी फ्लर्ट केल जात. तुम्हाला दाखवलं जातं की जगात वेगवेगळे किती प्रॉब्लेम आहेत. आणि जरी तुमची परिस्थिती चांगली असेल तरी तुम्ही निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतात. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कान बंद करून घ्यावेत, किंवा स्वतःच्या मनाचे ऐकावेत. तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या विचारांचे पहरेदार बना. व फक्त चांगल्या विचारांना मध्ये जाऊ द्या.
वाईट विचार मग ते तुमचे असो किंवा दुसऱ्यांचे त्यांना बाहेरच थांबवा. एक सायकॉलॉजीस्ट होते ज्यांना ट्यूबर्क्युलोसिस झाला होता. त्यांच्या एक्स-रे मध्ये पण टीबीचे निदान झाले होते. त्यांनी एक नवीन प्रॅक्टिस सुरू केली. रात्री झोपण्याच्या अगोदर ते स्वतःला सांगत असेल की मी एक हेल्दी पर्सन आहे. व माझी बॉडी ही ठीक होत आहे. एका महिन्यानंतर त्यांचे लंग्ज पूर्णपणे ठीक झाले होते. जोसेफ मर्फीने सायकॉलॉजिस्टला विचारलं कि ते रात्री झोपतांना का बर हे वाक्य स्वतःची म्हणायचे. यावर त्यांनी उत्तर दिलं की तुमच्या सबकॉन्शियस माईंडचे एक कायनेटिक ॲक्शन असतं.
म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा पण ते सुरूच राहतात. म्हणजे जर तुम्ही झोपण्याच्या अगोदर तुमच्या मेंदूला काही चांगले विचार दिले तर तो रात्रभर त्यावर काम करतो. तर मुद्दा हा आहे की झोपण्याच्या अगोदर आपण सर्वांनी पण हेच केलं पाहिजे. झोपण्या अगोदर स्वतःला सांगा की मी हेल्धी आहे. माझ्याकडे चांगल्या संधी चालून येत आहेत. वगैरे वगैरे,, ट्राय करून बघा फरक तुम्ही स्वतःचा अनुभवाल. जोसेफ मर्फीने या पुस्तकात आपले थॉट्स चेंज करण्याच्या खूप सारे पद्धती सांगितल्या आहेत. त्यातील 3 पद्धती आपण इथे पाहुयात.
1) मेंटल मूवी मेथड..
तुम्ही रिलॅक्स होऊन एका जागेवर बसा व आपल्या श्वासावर केंद्रित करा. पूर्णपणे शांत व्हा व तुमच्या मनात एक मूव्ही चालवा. तुमच्या आयडियल सिच्युएशन वरची. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला एखादे एक्झाम द्यायची आहे. इमॅजीन करा की तुम्ही परीक्षा हॉल मधून बाहेर पडत आहात व खूप खुश आहात. व तुम्हाला पेपर खूप चांगला गेला आहे.
2) थँक्यू मेथड..
ही खूप समाधानकारक टेक्निक आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर, जर तुम्हाला तुमची फायनान्शिअल कंडिशन चांगली बनवायचे असेल तर जा पण काही अडचणी आहेत त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्ही म्हणा थँक्यू युनिव्हर्स फॉर माय वेल्थ हे परत परत करण्यामुळे तुमच्यातील भीती निघून जाते. व तुम्ही चांगल्या मनस्थितीचा अनुभव घेता तुमचे प्रॉब्लेम सोडविण्याकरिता.
3) अफर्मेटिव मेथड..
या मध्ये तुम्ही वर्तमान काळातील एक वाक्य द्या. असं तुम्हाला वाटतं की तुमची लाइफ असायला पाहिजे. जर तुम्हाला कोणता आजार असेल तर तुम्ही म्हणाल की मी हेल्दी आहे, आणि मी फिट आहे व माझी बॉडी सगळे न्यूट्रीयेंट अब्जोर्ब करते. तर कशा प्रकारे काम करते. जोसेफ मर्फी एक्झाम्पल देतात की अफर्मेशन काम कसे करते. जेव्हा एखादा मुलगा बोर्डवर (3+3=7) असे लिहितो. तेव्हा ते लगेच बरोबर नाही होत.
तेव्हा शिक्षक त्यांना सांगतात (3+3=6) ते त्याला करेक्ट करू शकतात. त्याचप्रकारे जर आपले सबकॉन्शियस माईंड काही चुकीचे करत असेल, तर आपण त्याला अफर्मेशन देवून योग्य दिशा दाखवू शकतो. यामध्ये हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माईंडला फोर्स नाही करू शकत. येथे तुम्हाला कल्पना शक्तीचा उपयोग करायचा आहे इच्छाशक्तीचा नाही. तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माईंड सोबत भांडण नाही करायचं. तर पूर्णपणे रिलॅक्स होऊन त्याला चांगले विचार द्यायचे आहेत आणि बाकी काम तो स्वत:च करेल. तुमच्या सबकॉन्शियस माईंड मध्ये अमर्याद ताकद आहे. जगात अशी कोणतीच शक्ती नाहीये की तुमच्या मनातल्या शक्ती पेक्षा मोठी आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा