निगेटिव्ह आणि अनावश्यक विचार बंद करण्यासाठी ‘ह्या’ ४ गोष्टींचा अवलंब करा ।। सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार कसे ओळखायचे? याबद्दल जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय

तुम्हाला माहीत आहे का?आपण दिवसाला 60 ते 65 हजार विचार करतो आणि सामान्य माणसाची त्यातले 90% विचार हे नकारात्मक आणि अनावश्यक असतात. आणि महत्वाचं म्हणजे माणसाला आपण निगेटिव्ह विचार करत आहोत हेच माहिती नसते. बऱ्याच वेळेला असे होते की, शारीरिक थकव्यापेक्षा आपला मानसिक थकवा जास्त असतो.

त्यामुळे आज आपण पाहणार आहोत हे आपल्याला कसे थांबवता येईल. काय असे करता येईल कि हे फालतू विचार आपल्या मनातून कमी झाले पाहिजे? प्रथम पाहुयात विचार करणे आणि फालतु विचार करणे यात काय फरक आहे. ज्या वेळी एखादी गोष्ट किंवा विशिष्ट ध्येय आपल्या गाठायचे असते, आणि मग आपण त्यावरती विचार करतो या प्रकारचे विचार करणे आपल्यासाठी चांगले असते.

आणि ते आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जातात. पण एखादया गोष्टी वर आपण काय करू शकत नाही, पण आपण निष्कारण त्या गोष्टी वर विचार करतो त्याला नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार म्हणतात. हे असले विचार आपल्या मनामध्ये टेन्शन, नैराश्य, मानसिक ताण निर्माण करतात.

उदा. समजा एक मुलाची परीक्षा जवळ आली आहे. आणि मग तो योग्य प्रकारे नियोजन करतो कसा अभ्यास करायचा? सकाळी किती वाजता उठायचे? किती तास वाचायचे? किती तास लिखाण करायचे? वगैरे वगैरे हे विचार त्याच्या हिताचे आहे आणि हे विचार त्याला प्रगती करण्यासाठी मदत करते. कारण या सगळ्यांवर तो कृती करू शकतो.

पण आता त्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली आणि नंतर तो रोज विचार करतो मला किती मार्क भेटतील, मला नीट टक्केवारी भेटेल ना, मला एवढी टक्के नाही मिळाले तर मला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही आता विचार आहेत ते सगळे फालतू आणि नकारात्मक आहेत कारण असले विचार करून काय फायदा होणार नाही.

कारण परीक्षेत आता संपली आहे आणि ज्या गोष्टीवर तो काही करू शकत नाही, त्या गोष्टींचा विचार करून काही फायदा नाही. मला वाटतं तुम्हाला आता कळले असेल चांगले विचार आणि नकारात्मक विचारांमध्ये काय फरक आहे. आता हे विचार थांबवता कसे येतील किंवा त्याची संख्या काशी कमी करता येईल यासाठी आपण आज चार सुत्र बघणार आहोत.

1-विचारांनवर लक्ष ठेवणे: लोकांच्या लक्षातही येत नाही की त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार येतात आणि जातात त्यामुळे कधी विचार यांची साखळी चालू होते आणि कधी आपण त्यात गुरफटून जातो ते आपल्याला पण कळत नाही. उदा. द्यायचे झाले तेव्हा आपण फेसबुक बघतो ते आपल्या खास मित्रांनी आपला फोटो लाईक केलेला नसतो तो विचार चालू होतो माझ्या फोटोला लाईक केले नाही आणि माझे व्हाट्सअप मेसेज ला पण रिप्लाय दिला नाही.

मी तर त्याच्या प्रत्येक मसेज ला रिप्लाय देतो. लगेच आपल्या दुसरी पोस्ट दिसते, त्याच्यामध्ये आपण दुसरा मित्र थिएटर मध्ये पिक्चर बघत असतो, तर तुम्ही विचार करताना त्याने आपल्याला विचारले पण नाही, माझ्याच बाबतीत का असे होते, आपण पिक्चर ला जायचे का? कोणाला घेऊन जात येईल? कोणाला बोलवता येईल? अशा प्रकारे तुमच्या विचारांची साखळी चालू होते.

आणि मग बर्याच वेळानंतर आपण भानावर येतो तेव्हा आपल्याला कळले असते की बराच वेळ निघून गेला आहे त्यामुळे विचारांवर आपल्या ला लक्ष ठेवायला शिकले पाहिजे. तसे केल्याने बरेचसे विचार कमी होतात. उदाहरण द्यायचे झाले तर समजा रस्त्याने आपण जातो तर रस्त्यात जागोजागी ट्राफिक हवालदार फक्त उभे असतात.

तर ते उभे असल्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिकचे नियम पाळतात, पण जेव्हा ते ट्राफिक हवालदार तिथे नसतात तेव्हा ट्रॅफिकचे काय होते ते सांगायची गरज नाही तसेच आपण सुद्धा आपल्या मनाची ट्राफिक हवालदार झाले पाहिजे अर्थात त्याला थोडा सराव लागेल पण तुम्ही ठरवलं की मी आज माझ्या विचारांवर लक्ष ठेवणार तर काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल तुमचे बरेचसे अनावश्यक विचार कमी झाले आहे.

2-स्वीकार करणे: काय असते बऱ्याच वेळा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात आणि मग आपण त्या गोष्टीचा विचार करत असतो समजा आपण ऑफिसला गाडीवरु चाललो आहोत आणि अचानक एखादा माणूस तुम्हाला ओव्हर टेक करतो, आपण प्रचंड रागावतो आणि वेळ पडली तर त्याला शिव्या पण देतो ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा आपण सारखा तोच विचार करतो आणि मग आपला पूर्ण दिवसावर आणि कामावर त्या घटनेचा परिणाम होतो.

आता येथे बारकाईनं तुम्ही पाहिले तर तो बाईक वाला तुम्हाला ओव्हरटेक करून गेला सुद्धा पण दिवसभर झुरत कोण बसलं आपण, त्रास कोणाला झाला आपल्याला आशा वेळेस स्वीकार करणे हाच त्याला पर्याय आहे. त्यामुळे मनामध्ये विचार करायचा त्याचे संस्कार त्याप्रमाणे आहे त्यामुळे तो असा वागतो. ज्यावेळेस आपण मनामध्ये असा स्वीकारभाव आणतो त्या वेळेस आपल्याला लगेच बरे वाटते.

आपण ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून देतो पण आपण ज्या वेळेस विरोध करतो की त्यांनी असे केले कसे तो असा वेगळाच कसा आणि मग त्यामुळे आपले मन अशांत होते जे आपल्यालाच घातक ठरते. हे एखादी घटना घडली तर तुम्ही काही करू शकत नसाल ते स्वीकार करा तुम्हाला लगेच बरं वाटेल.

3- आपले नियंत्रण हे आपल्या ॲक्शन किंवा कृती वर असते: मला वाटतं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जेव्हा याची जाणीव होईल तुमच्या हातामध्ये फक्त तुमच्या ॲक्शन किंवा कृती वर असते. मला वाटत हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जेवहा याची जाणीव होईल तेव्हा तुमच्या हातामध्ये फक्त ऍक्शन्स किंवा कृती आहे बाकी काहीच तुमच्या हातामध्ये नाही.

दुसरा तुमच्याबद्दल काय विचार करतोय? या देशाचे भविष्य काय असेल? लोकांनी कसे वागले पाहिजे? ते काहीच तुमच्या हातात नाही. हा तुमच्या कृतीमुळे तुम्ही तुमच्या हातातीळ कृती बदलू शकत आणि तीच करणे तुमच्या हातामध्ये आहे. ज्यावेळी तुम्हाला याची जाणीव होईल त्यावेळेस तुमचे दुसर्‍यांना दोष देणे कमी होईल आणि मग तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या ऍक्‍शनमध्ये म्हणजे कृती वर लक्ष केंद्रित कराल.

तसेच चांगला अभ्यास करणे विद्यार्थ्यांच्या हातात आहे, पण मार्क्स किती पडतील ते त्याच्या हातात नाही. नोकरीवाले यांनी चांगले काम करणे त्यांच्या हातात आहे, पण पगार वाढ प्रमोशन हे त्यांच्या हातात नाही.व्यवसाय करणाऱ्याच्या चांगली सेवा देणे हातात आहे,

पण किती व्यवसाय होईल हे त्याच्या हातात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त तुमची कृती चांगली आणि प्रभावी कशी होईल याकडे लक्ष द्या आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्यांना बदले तुमच्या हातात नाही पण तुम्ही तुमच्या कृतीमुळे दुसऱ्यांमध्ये बदल घडू शकतात त्यासाठी तुम्हाला तुमची पात्रता मिळवावी लागेल. त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या हातात फक्त आपल्या कृती आहेत.

4- चौथे सूत्र ध्यान म्हणजे मेडिटेशन: मेडिटेशन नाव ऐकून घाबरून जाऊ नका मला मान्य आहे मेडिटेशन थोडे बोअरिंग असते पण मी सांगेल फक्त 10 मिनिटे मेडिटेशन करून पाहा कसे असते जोपर्यंत आपण काही गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्या ला त्याचा परिणाम होत नाही. आता इथे कोणते मेडिटेशन करायचे वैगरे मी काही सांगणार नाही. इंटरनेटवर भरपूर प्रकार भेटतील जो प्रकार तुम्हाला आवडतो तुम्ही करा तुम्ही फक्त करून पाहा, तुम्हाला फरक जाणवेल.

तुमच्या विचारांची संख्या झपाट्याने कमी होईल. मी आत्तापर्यंत तुम्हाला 04 सूत्रे सांगितली त्यांची थोडक्यात उजळणी करूयात.पहिले सूत्र विचारांवर लक्ष ठेवा. दुसरे सूत्र स्वीकार भाव निर्माण करा.तिसरे सूत्र आपल्या नियंत्रणात फक्त आपल्या एक्शन्स आहे ते लक्षात ठेवा. आणि चौथे ध्यान. मित्रांनो तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.