दिनकर बाळू पाटील ते नवी मुंबईकरांचा दिबा असा दिबांचा जीवनप्रवास जाणून घ्या या लेखातून !

प्रवास लोकप्रिय शैक्षणिक

दिनकर बाळू पाटील, ते नवी मुंबईचा दिबा. असा प्रवास आपण समजून घेतला तर दिबा पाटलांची ताकत कळू शकेल. लोकप्रतिनिधी फक्त सभागृहात जात नाही तर तो मतदारांच्या देव घरातही जाऊ शकतो हे दि. बां. च्या कर्तृत्वानं दाखवून दिले. आज नवी मुंबई मधील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांच्यासमोर ही दि बा पाटील हे नाव स्थानिक भूमिपुत्र रेटून का धरत आहेत? हे समजण्यासाठी आपल्याला दी बा समजून घ्यावे लागतील.

त्यांची राजकीय कारकीर्द, सामाजिक बांधिलकी आणि मातीशी जुळलेली नाळ समजून घ्यावी लागेल. दी बा फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. हा गैरसमज आपण दूर करूया. दी बा हे संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरुंगात गेले होते. एका वर्षाची शिक्षा त्यांनी भोगली होती.

कष्टकऱ्यांचा योद्धा या पुस्तकामध्ये त्याच्या आठवणी आहेत. १९५८ च्या आसपासची गोष्ट. बेळगावच्या सीमेवरती जाऊन महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्याचं ठरलं. त्यावेळी पनवेल, अलिबाग या भागातून दी बा पाटलांवर ती आंदोलनाची जबाबदारी देण्यात आली. सिमेवरती पोहोचताच त्यांना अटक झाली. आणि नंतर सोडून देण्यात आले.

तिथून ते परतत होते. तेव्हा निपाणीजवळ सत्याग्रह सुरू असल्याचं दिसलं. आणि त्यात ते सहभागी झाले. यावेळी त्यांना अटक झाली. आणि एका वर्षाची शिक्षा सुद्धा त्यांना ठोठावण्यात आली. त्यामुळे दि बा हे काही फक्त प्रकल्पग्रस्तांचे नेते नाहीत. तर संयुक्त महाराष्ट्राची जी फळ आपण सगळेच चाखतोय त्यातही त्यांचे योगदान आहे. हे विसरून चालणार नाही.

आता आपण हे समजून घेऊ, कि स्थानिक किंवा भूमिपुत्र एकूणच नवी मुंबई पट्यात्यातल्या अनेकांना ते आजही आपलेसे का वाटतात? तर उरळ पणवेल तालुक्यातील ६५ गाव आणि ठाणे बेलापूर पट्ट्यातील तिस गाव. अशा एकूण ९५ गावांच्या जवळपास एकवीस हजार हेक्‍टर जमिनी, या सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्याचे ठरले.

१९७० साल ची गोष्ट. सुरुवातीला एकरी दोन हजार रुपये भाव धरला. आणि त्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली. बरीच वर्षे हा संघर्ष चालला. १९८४ साली झालेल्या जासं ईथल्या आंदोलनानंतर त्या संघर्षाला हिंसक वळण लागले. ज्यात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले.

त्या घटनेने दी बा अस्वस्थ झाले. आणि ते पेटून उठले. पुढे त्यांनी भूमिपुत्रांना सोबत घेऊन जे काही केलं. ते ऐतिहासिक होतं. पहिल्यांदा जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. भूमि पुत्रांना तीस हजार रुपयांचा एकरी भाव मिळाला. आणि सोबतच साडेबारा टक्के विकसित भूखंड.

दी बांच्या या संघर्षामुळे स्थानिक भूमिपुत्र नवी मुंबई मध्ये राहू शकला. आपल्या जमिनी पासनं दूर फेकला गेला नाही. आणि म्हणूनच कदाचित तो अजूनही दी बा पाटील यांच्याशी जोडला गेला आहे. १९५२ साली जिल्हा बुलढाणा ची निवडणूक जिंकल्यानंतर, १९५७,१९६५, १९६७, १९७२, १९८० मध्ये ते सलग पाचव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आमदार झाले.

तर १९८३ ते ८४ च्या दरम्यान ते विरोधी पक्ष नेते होते. तसेच १९७७ आणि १९८४ मधील लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले. त्यानंतर १९९२ ते १९९८ मध्ये विधानपरिषदेचे आमदार झाले. जवळपास ४६ वर्षांची यशस्वी विधिमंडळातील कारकीर्द ही दी बा पाटील यांची. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला नेता. अशी दी बा पाटील यांची ओळख ही आज ही सांगितली जाते.

बाळासाहेब यांच्या नावासाठी आज जे शिवसैनिक दि बा पाटील यांच्या नावाला विरोध करतात. त्यांनी हे ही लक्षात घेतले पाहिजे की राजकीय कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात, दी बा पाटील शिवसैनिक होतो. शिवसैनिक या तिकीटावर ते लोकसभेची निवडणूक हरले. आणि त्या नंतर सक्रिय राजकारणातून हळूहळू दूर झाले.

भूमिपुत्रांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दी बा पाटील यांचं नाव द्यावं म्हणून जर का संघर्ष केला नसता. तर कदाचित दी बा यांची ओळख, त्यांचे हे कर्तृत्व आज घडीला राज्यभर प्रकाशात आलं ही नसतं. पण या संघर्षाच्या निमित्तानं, दी बा पाटील यासारख्या राजकारण आणि समाजकारण याचा उत्तम समतोल साधणारा नेत्याचं, काम जनमानसापर्यंत पोहोचतोय.

हे सुद्धा काही कमी महत्त्वाचे नाही आहे. नवी मुंबई विमानतळ याला दी बा यांचं नाव दिले जाईल की नाही माहित नाही. किंवा कुणाच नाव दिले जाईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण या संघर्षाने दी बा पाटील या नावा भोवतिचा आदर आणि जिव्हाळा अधिक घट्ट केला हे लक्षात घेऊया.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.