भारतात जून-जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत आणि एप्रिल-मे महिन्यात संपत. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी यूजीसीने दिली आहे. वर्षातून दोनदा ऍडमिशन म्हणजे नेमकं काय होणार काय म्हटलं? आणि त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? चला तर जाणून घेऊ..
विद्यापीठ अनुदान आयोग ही संस्था देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण, परीक्षा, संशोधन या विषयीचा दर्जा कायम राखण्यासाठी विद्यापीठांसाठीचे नियम मार्गदर्शक तत्व ठरवण्याचा तसंच त्यांच्यात समन्वय साधण्याचं काम करते.याच संस्थानी जाहीर केले की देशातला विद्यापीठांना वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. हा निर्णय विद्यार्थी हे विद्यापीठ अशा दोघांनाही फायद्याचे ठरणार असल्याचे UGC अध्यक्ष प्राध्यापक कुमार यांनी म्हटले आहे.
या निर्णयाचा विद्यापीठाना थोडासा थोडा बदल करून याचा स्वीकार करावा लागेल. याचा स्वीकार करून संस्थात्मक नियम धोरणांमध्ये बदल करावे लागतील. वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्यात आल्यानंतर ही विद्यापीठे आणि कॉलेजेसना याविषयीची पुढील आखणी करावी लागेल. दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रवेश घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते कोर्स उपलब्ध असणार आहेत?
जुलै-ऑगस्ट आणि त्यांनंतर जानेवारी महिन्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपक्रम कधी आणि कसे राबवले जाणार? या विषयाची आखणी सुद्धा त्यांना करावे लागेल. वर्षातून दोनदा प्रवेश राबवण्याची यंत्रणा या गोष्टींचा विचार सुद्धा करावा लागेल. त्यानंतरच याची अंमलबजावणी होऊ शकते. अर्थात विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा प्रवेश देणे हे विद्यापीठांसाठी बंधनकारक नाहीये.
याबाबतचा निर्णय विद्यापीठाने स्वतः घ्यायचा आहे. आजारपण, उशिरा लागलेले आधीच्या कोर्सेसचा निकाल, वैयक्तिक अडचणी किंवा पुन्हा परीक्षा द्यावी लागण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे एखाद्या विद्यार्थ्यांची जुलै-ऑगस्ट या काळात विद्यापीठ प्रवेशाचे प्रक्रिया चुकू शकते. मग अशा विद्यार्थ्यांना सध्या वर्षभर वाट पाहावी लागते,
त्यामुळे अक्खा एक वर्ष फुकट जातं. जर यातल्या काही गोष्टींसाठी जानेवारी महिन्यात प्रवेश घेण्याचा पर्याय त्यांच्याकडे आला तर त्यांना संपूर्ण वर्ष वाट पहावी लागणार नाही. वर्षातून दोनदा ऍडमिशन झाल्यानं विद्यापीठांना ही त्यांच्याकडे टीचिंग लॅब, रीसर्च लॅब सारख्या पायाभूत सुविधांचा जास्त वापर करून घेता येणार असल्याचं UGC न म्हटलं आहे.
यासोबतच भारतातील विद्यापीठांना जागतिक शैक्षणिक संस्थांशी संघात प्रवेश प्रक्रिया पार पाडणं यामुळे शक्य होईल. वर्षांतून दोनदा प्रवेश तरी याचा फायदा इंडस्ट्रीला ही होणार असून वर्षातून दोनदा कॅम्पस प्लेसमेंट होऊ शकते, असे UGC अध्यक्ष जगदीश कुमार यांनी म्हटलंय आहे. यासोबतच यामुळे विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीची संख्या सुद्धा वाढेल. अधिकाधिक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील असेही त्याने म्हटले आहे. या विषयी तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट सांगायला विसरू नका..