सिमेंट कसे तयार होते ।। सिमेंटमध्ये कोणते घटक असतात।। सिमेंट बांधकाम साईटवर कसे चेक करावे ।। सिमेंट चा सेटिंग टाईम किती असतो ? या सर्व गोष्टींची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

आज आपण कंस्ट्र्क्शन मध्ये महत्वाचे साहित्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, तो घटक म्हणजे सिमेंट. सिमेंट याविषयी माहिती आपण घेणार आहोत. त्यामध्ये सिमेंट चा शोध कधी लागला? किंवा सिमेंट मध्ये घटक कोणते असतात? सिमेंट कसे तयार केले जातो?

किंवा सिमेंट चे टेस्ट, म्हणजे सुपरव्हिजन ज्यावेळी करायला जाता, तेव्हा सिमेंट चांगला आहे की खराब आहे? हे कसं ओळखायचे ? यासंबंधीची माहिती आपण पाहणार आहोत. आता या सिमेंट चे काम काय असतं? सिमेंट ची गरज का भासली? किंवा सिमेंट का तयार झाले? हे आपण सुरवातीला पाहू. सिमेंट चा शोध कुठे लागला?

किंवा तयार करण्याची गरज का लागली? जर आपण इतिहासात पाहिलं, तर सिमेंट चा वापर करण्या पूर्वी चुन्याचा वापर हा बांधकाम मधे करण्यात यायचा. तर याचा वापर का केलं जात होता ? तर चुना किंवा सिमेंट हे काय आहे? तर हे एक प्रकारे बाईंडिंग मटेरियल आहे.

बाईंडिंग मटेरियल म्हणजे बांधकामांमध्ये जे आपण दगड, विटा, खडि, वाळू हे जे वापरतो, साहित्य त्या साहित्यांना धरून ठेवण्याचे, बांधून ठेवायचे काम सिमेंट करतं. म्हणून याला बाईंडिंग मटेरियल असे म्हणतात. याची गरज का भासली? तर ज्यावेळी आपण पुर्वीचे बांधकाम पाहिले, तर त्यामध्ये आपल्याला चुन्याचा वापर केलेले दिसतो.

ती बांधकामे सुद्धा मजबूत होती. पण ज्या वेळी पाण्यातील बांधकामा आलं, बंधारे, पूल. तेव्हा आपल्याला चुन्या पेक्षा अधिक मजबूत, अधिक ताकदवान अशा बाईंडिंग मटेरियल ची गरज भासते. यासाठी सिमेंट चा शोध लागला. सिमेंट चा शोध कोणी लावला? किंवा कसा लागला? तर इंग्लंड मधील जॉन ऍस्पदिन या नावाचा एक मिस्त्री होता त्याने पोर्ट लॅंड या इंग्लंड मधील खानी मध्ये सिमेंट चा शोध लावला. म्हणून आपल्या कडे जे सिमेंट येतं त्यांच्यामध्ये पोर्टलॅंड हा शब्द हा त्यामुळेच दिसतो.

हे जे सिमेंट आहे त्याच्या मधे घटक काय असतात? सिमेंट म्हणजे एक प्रकारचा चुनाच असतो. त्या चुन्यामधे ॲडिशनल घटक वाढवून, त्याची ताकद वाढवून, आपल्याला एक घटक मिळतो. जुना थोडक्यात डेव्हलप करून त्यामध्ये, घटक वाढवून, त्यांची ताकद वाढवून, आपल्याला चुना मिळतो. त्याचाच वापर बांधकामांमध्ये सिमेंट म्हणून आपण करतो.

चुन्यामध्ये, सिमेंट मध्ये घटक कोणते कोणते आहेत ते पाहू: सिमेंट मधे सर्वात जास्त घटक हा चुनखडक असतो. ६०-६७% हा चुनखडक असतो. त्यानंतर दुसऱा घटक येतो सिलिका. सिलिका हा १७-२५% म्हणजे एक प्रकारे वाळूचा किंवा दगडाचा चुरा, थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल.

त्यानंतर तिसरा घटक म्हणजे ऍल्युमिना, म्हणजे माती सारखं घटक. हा ३-८% सिमेंट मध्ये वापरला जातो. त्यानंतर चौथा घटक आहे, तो म्हणजे आयर्न ऑक्साईड. हा ०.५-६% टक्क्यांपर्यंत वापरला जातो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड. हा ०.१- ५% पर्यंत सिमेंट मध्ये वापरला जातो.

त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सल्फरट्राय ऑक्साईड. हा ०.१-४% पर्यंत वापरला जातो. आणि त्यानंतर सातवा घटक, तो म्हणजे सोडियम ऑक्साईड. हा १-२.७५% वापरला जातो. त्यानंतर शेवटचा घटक म्हणजे पोटॅशियम ऑक्साईड. हा सुद्धा १-२.७५ % वापरला जातो.

जर आपण घटकांचा अभ्यास केला, तर यामध्ये आपल्याला तीन घटक हे जास्त प्रमाणात वापरलेली दिसतील. ती म्हणजे पहिला चुनखडक. जो ६०-६७% पर्यंत वापरलेला असतो. त्यानंतर आहे सिलिका. हा १७-२५% पर्यंत वापरलेला आहे. आणि शेवटी जास्त प्रमाणात वापरलेला तो म्हणजे ऍल्युमिना, ३-८% पर्यंत वापरलेला आहे.

जर आपल्याला असा प्रश्न आला की सिमेंट मध्ये वापरले जाणारे सर्वात जास्त साहित्य कोणते? तेव्हा सिमेंट मध्ये या घटकांचा प्रमाण याचं उत्तर येणार आहे चुनखडक. गव्हर्मेंट एक्झाम मध्ये सुद्धा हा प्रश्न आला आहे. हे झाले सिमेंट. हे सिमेंट कसं तयार केलं जात? हे जे घटक तुम्हाला सांगितले, ते एकत्रित केले जातात.

हे ठराविक उष्णतेला तापवले जातात. त्यानंतर हे पुर्णपणे बारीक दळले जातात. इतकं बारीक की सिमेंट चे आपण जर साईझ बघितले तर पुर्ण बारीक दळलेल असतं. आणि एकत्र मिसळून ते आपल्याला दिलं जातं. हि झाली सिमेंट ची बेसीक माहिती. यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे

तो म्हणजे जे काही सिमेंट असेल, त्याची क्वॉलिटी चेक करायचे आहे:  सिमेंट चांगला आहे का खराब आहे? हे जर चेक करायचं असेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात. एक म्हणजे प्रयोग शाळेमध्ये यांची टेस्ट घेणे‌ जे लॅब असतात, त्या लॅब मध्ये जाऊन त्याची क्वॉलिटी चेक करणं, त्याचे जे काही टेस्ट असतील ते टेस्ट घेणे.

आणि साधी सोपी टेक्निक आहे. समजा तुम्ही एखादे सुपरवायजर आहात. साईड सुपरवायजर आहात, इंजिनिअर आहात. तुम्हाला साईड वर जे सिमेंट आणलेलं आहे. ते सिमेंट चांगला आहे का खराब आहे? हे जर तुम्हाला चेक करायचं असेल, तर तिथं तुमच्याजवळ लॅब किंवा टेक्निकल सपोर्ट नसतो.

त्यावेळी चेकींग करायचे असेल तर, तेवढा वेळ तुमच्या जवळ नसेल, तर साधं सोपं काही गोष्टी आहेत. त्याचा वापर करून तुम्ही सिमेंट चांगला आहे का खराब आहे? हे चेक करू शकता. त्यामध्ये सर्वात पहिली टेस्ट आहे ती म्हणजे, सिमेंट हातामध्ये घ्यायचे. चिमटीत धरायचं. ते पुर्णपणे चेक करायचं.

त्यामध्ये असे दिसले पाहिजे की, ते पुर्णपणे बारीक दळलेल पाहिजे. पूर्ण बारीक पावडर पाहिजे. त्यामध्ये जर खडे आढळून येत असतील, आपण थोड जर त्यांना दाबले. तर दाबल्या नंतर ते खडे तुटले पाहिजे. म्हणजे ते सिमेंट चेच खडे पाहिजे. आणि पावडर झाले पाहिजे. जर त्याची पावडर झाली. बारीक दळलेल असेल, तर चांगला आहे. पण त्यात जर खडे आढळून आले, किंवा ते फुटलेच नाही. तर ते सिमेंट खराब आहे.

दुसरी टेकनिक म्हणजे सिमेंट च जे पोतं असतं, त्यामध्ये आपलं हात टाकायचे. तेव्हा ते आपल्याला थंड लागले पाहिजे. जर थंड वाटत नसेल, उष्ण वाटलं, तर समजायचं ते योग्य पद्धतीने बनविलेले नाही. त्यात प्रोब्लेम आहे. त्यानंतर पाण्याने भरलेली बादली घ्यायची. आणि त्या बादली मध्ये चिमुटभर सिमेंट टाकायचं. आणि ते सिमेंट जर तरंगलं तर ते चांगले आहे. त्यानंतर हातात सिमेंट घ्यायचं. आणि आपला हात हा पुर्ण झटकायचा.

हात झटकले यानंतर आपल्या हाताला जे चिकटलेले सिमेंट आहे, ते पूर्णपणे खाली पडले पाहिजे. ते चिकटलेले नाही पाहिजे. हाताला चिकटून रहात असेल तर ते सिमेंट चांगल नाही. या साध्या सोप्या टेस्ट आहेत. त्यानंतर दुसरी टेस्ट म्हणजे, जर साधं सिमेंट असेल आणि त्याचं कलर, म्हणजे आपलं ग्रे कलर.

आपण त्याला गडद हिरवा असे म्हणतो. असाच कलर पाहिजे. तो कलर बदलेले चालनार नाही. हे सर्वात महत्वाचे टेस्ट आहेत. या सगळ्या बेसीक टेस्ट आहेत. ते केल्या तर आपल्याला कळेल सिमेंट चांगला आहे की नाही साईट वर समजून येते. त्यासाठी प्रयोग शाळेत जायची गरज नाही. जर समजा मोठ कंस्ट्र्क्शन असेल. तुम्हाला टेस्ट चे रिपोर्ट सबमिट करायचे असेल, तर तेव्हा लॅब मधे टेस्ट करणं गरजेचं आहे. या झाल्या सिमेंट च्या साईड वरील टेस्ट.

आता सिमेंट बद्दल अजून महत्वाची माहिती म्हणजे, आपण जेव्हा सिमेंट पासून एखाद्या मॉरटर म्हणजे मसाला बनवतो किंवा कॉंक्रीट बनवतो. तर त्याचं एक स्पेसिफिक टाइम असतं.त्या कालावधी मधे ते वापरायचं असतं. सिमेंट चा इनिशियल सेटींग टाईम म्हणजे काय? सिमेंट जेव्हा आपण पाण्यात मिक्स करतो, आणि मिक्स केल्यानंतर त्याचा जो मॉरटर तयार होतो.

तो घट‌ होण्याचा जो कालावधी असतो. तो घट होण्याचा कालावधी हा तीस मिनिटांच्या आत सुरू होतो. ३० मिनिटांत वापरलं तर ठिक. त्यापेक्षा जास्त कालावधी मध्ये तो तयार केलेले मॉरटर वापरलं तर त्याची ताकद हि कमी प्रमाणात असणार आहे. सिमेंट चा घट होण्याचा कालावधी हा ३० मिनिट असतो.

तीस मिनिटांच्या आत ते कॉंक्रीट वापरावं लागेल.त्यानंतर फायनल सेटिंग टाईम म्हणजे सिमेंट घट होण्याचा जो कालावधी असतो. तो दहा तासांचा असतो. त्यामुळे दहा तासांनी कॉंक्रीट घट झालेलं आढळून येईल. त्यानंतर ते एकवीस किंवा आठावीस दिवसांनी ते मजबूत होते.

फक्त यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. सिमेंट चा इनिशियल सेटींग टाईम हा तीस मिनिटे आहे. तीस मिनिटांनी घट व्हायला सुरुवात होते. आणि फायनल सेटिंग टाईम हा दहा तासांचा असतो. यामध्ये आपण सिमेंट चे घटक आणि त्याचे साईड वरील टेस्ट हे दोन मुद्दे पाहिले.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “सिमेंट कसे तयार होते ।। सिमेंटमध्ये कोणते घटक असतात।। सिमेंट बांधकाम साईटवर कसे चेक करावे ।। सिमेंट चा सेटिंग टाईम किती असतो ? या सर्व गोष्टींची माहिती जाणून घ्या !

Comments are closed.