मृत्यूपत्र, हक्कसोड पत्र, तसेच खरेदी खत यासोबतच बक्षीस पत्र यालाच आपण gift deed सुद्धा म्हणतो हा मालकी हक्क तबदिल म्हणजेच ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. वरील उल्लेखित दस्ताऐवजापैकी मृत्यूपत्र हे दस्तऐवज सोडल्यास बाकी सर्व दस्ताऐवजाची अमलबजावणी ही संबंधित व्यक्तीच्या हयातीत होत असते.
बऱ्याच वेळा जवळील नात्यांमध्ये, प्रेमाखातर किंवा आपुलकीमुळे केल्या जाणाऱ्या बक्षीस पत्र दस्ताबद्दल कायदेशीर तरतुदी ह्या transfer of property act च्या 122 ते 126 या कलमांमध्ये उल्लेखित आहे. या बद्दल काही महत्वाची माहिती खाली दिली आहे. 1.जी व्यक्ती बक्षीस पत्र लिहून देते तिला दाता असे म्हणतात, तर ज्या ज्या व्यक्तीच्या लाभात ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीला लाभार्थी असे म्हणतात.
2.स्वतः च्या मालकीची तसेच अस्तित्वात असलेली स्थावर म्हणजेच existing किंवा जंगम मिळकत बक्षीस पत्राने तबदिल म्हणजेच ट्रान्सफर करता येते. म्हणजेच जी गोष्ट अस्तिवात नाही त्या गोष्टीचे बक्षीसपत्र करता येत नाही. 3.बक्षीस पत्र हे विना मोबदला असावे लागते. मिळकती मधील हक्क तबदिल म्हणजेच ट्रान्सफर केल्याच्या बदल्यात लाभार्थ्यांकडून म्हणजेच donee कडून कुठलाही मोबदला मिळत नाही.
त्याचबरोबर काही अटी ठेवूनही बक्षीस पत्र करता येते त्याला conditional gift deed असे सुद्धा म्हणतात. 3.स्थावर मालमत्ता म्हणजेच immovable मालमत्ता होय तिलाच अचल मालमत्ता असे सुद्धा म्हणतात. स्थावर मिळकतीचे बक्षीस पत्र हे नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर करणे कायद्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
त्यावर दाता म्हणजेच donar तसेच दोन साक्षीदार यांनी सह्या करणे सुध्दा गरजेचे आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याने म्हणजेच donee ने देखील मला बक्षीस पत्र मान्य आहे असे लिहून सही करणे आवश्यक आहे. याप्रमाणे अटी शर्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बक्षीस पत्राद्वारे मालकी हक्क तबदिल म्हणजेच हस्तांतरित होतो. 4.जंगम मालमत्ता म्हणजेच moveable मालमत्ता होय जंगम मालमत्ते संदर्भातील बक्षीस पत्र नोंदणीकृत दस्ताने किंवा प्रत्यक्ष त्या मालमत्तेचा ताबा देऊन करता येते.
बक्षीस पत्र रद्द करता येते का?: बक्षीस पत्र अपवादात्मक परिस्थिती मध्ये रद्द करता येते, एखादी घटना किंवा विशिष्ट गोष्ट घडली तर बक्षीस पत्र होईल असे जर दाता आणि लाभार्थी यांनी बक्षीसपत्र करतांनी ठरविले असेल आणि तशी घटना अथवा गोष्ट घडली तर बक्षीस पत्र रद्द होऊ शकते. मात्र अशी विशिष्ट गोष्ट घडणे किंवा न घडणे यावर दात्याचे म्हणजेच donar चे नियंत्रण असेल तर असे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही.
तसेच ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता येतो त्या कारणांनी देखील बक्षीसपत्र रद्द करता येते. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता तो कोणता ते पहा: माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे स्पष्ट केले आहे की conditional gift deed हे त्या gift deed मधील पूर्व अटींची पूर्तता लाभार्थी म्हणजेच donee ने न केल्यास ते रद्द करण्याचा अधिकार donar म्हणजेच दात्याला आहे.
एस सरोजिनी अम्मा विरुद्ध वेलायधून पिल्लई दिवाणी अपील क्र.10785/18 ह्या केसची माहिती पाहुयात. सरोजिनी अम्मा यांना मूलबाळ नसल्यामुळे सरोजिनी अम्मांनी त्यांचा भाचा वेला वधू याला बक्षीसपत्र करून मालमत्ता conditional gift deed द्वारे तबदिल करून दिली आणि त्या बदल्यात मोबदला सुद्धा स्वीकारला.
मात्र त्या conditional gift deed मध्ये पूर्वअट अशी ठेवण्यात आलेली होती की वेलाय वधू ने एस. सरोजिनी अम्मा आणि त्यांच्या नवऱ्याची आयुष्यभर देखभाल सांभाळ करावा आणि त्या दोघांच्या मृत्यूनंतर बक्षीसपत्राची अमलबजावणी होईल. आणि मालमत्तेचा मालकीहक्क आणि ताबा वेलाय वधूला मिळेल. मात्र काही वर्षांनी एस सरोजिनी अम्मांनी सदरचे बक्षीसपत्र रद्द केले आणि तसा दस्त देखील नोंदवून घेतला. त्या विरोधात वेलायवधू ने न्यायालयात आव्हान दिले.
न्यायालयाकडून निकाल एस सरोजिनी अम्मा यांच्या विरोधात दिल्या गेला त्यानंतर प्रकरण गेले माननीय सर्वोच्च न्यायालयात गेले माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की ट्रान्सफर deed मधील बक्षीसपत्राचा भाग हा conditional होता आणि दात्याला ते रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच पुढे नमूद केले की बक्षिसंपत्राद्वारे एखाद्या मिळकतीमधील मालकी हक्क तबदिल करण्यासाठी मिळकतीचा ताबा देणेही गरजेचे आहे असा कुठल्याही कायदा नाही.
मृत्यूपत्र आणि बक्षीस पत्र एकत्रितपणे करता येते का?: वरील उल्लेखित केस मध्ये बक्षीस पत्र आणि मृत्यूपत्र एकत्र करता येते का असाही प्रश्न उपस्थित झाला होता मात्र कुठलेही ठोस उत्तर न्यायालयाकडून दिलेलं नाही, मात्र यापूर्वी मथाई सम्पूयल विरुद्ध इपिन या केसमंध्ये 2014 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या केसच्या आधारे असा निकाल दिला की जरी कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून एकाच दस्तामध्ये मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र करणे गैर नसले.
तरी जर लाभार्थ्यांच्या म्हणजेच donee ला दात्याला म्हणजेच donar च्या हयातीत कुठलेच हक्क मिळणार नसतील तर ते मृत्यूपत्र म्हणता येईल. एखाद्या दस्ताचे शीर्षक काय आहे यावरून तो दस्त काय आहे हे ठरत नाही तर त्यातील सर्व तरतुदी एकत्रितरीत्या वाचून मगच तो दस्त कोणता आहे हे ठरविता येते. उदा. बऱ्याचवेळा विसार पावती असे शीर्षक असलेल्या दस्तमधील तरतुदी या साठेखतासारख्या असल्याचे दिसून येते, त्यामुळे कोर्टात देखील साठेखताच्या तरतुदी लागू होतात. खरेतर ह्या वरील दोन्ही दस्तांची जातकुळी वेगळी आहे.
मृत्यूपत्रासाठी कोणत्याही स्टॅम्प द्यावा लागत नाही. त्याचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही. लाभार्थ्यांना ते मान्य आहे असे लिहून द्यावे लागत नाही, तर त्या तीनही गोष्टी बक्षीसपत्रासाठी करणे अनिवार्य आहेत. तसेच मृत्यूपत्राचा अंमल हा ते करण्याचा मृत्यूनंतर होतो, तर बक्षीपत्राद्वारे मिळकतीमधील हक्क आणि अधिकार हे त्या व्यक्तीच्या हयातितमध्येचतब दिल होतात. कधीही तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन सोपे आणि सुटसुटीत दस्त करायला हवेत.
बक्षीसपत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का?: Maharashtra stamp act प्रमाणे बक्षीसपत्र नोंदविण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. या कायद्याच्या अनुछेद 34 अनव्ये जर का दात्याच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच नवरा बायको भाऊ किंवा बहीण ह्यांना बक्षीपात्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या तीन टक्के इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
मात्र का सदरील मिळकत ही राहण्याची किंवा शेतीची असेल आणि बक्षीस पत्राद्वारे ती मिळकत नवरा बायको मुलगा मुलगी नातू नात मृत मुलाची पत्नी यापैकी कोणाला द्यायची असेल तर केवळ दोनशे रुपये इतकीच स्टॅम्प ड्युटी आकारल्या जाते, इतर सर्व बक्षिसंपत्रासाठी खरेदीप्रमाणे पूर्ण स्टॅम्प ड्यूटी आकारली जाते.
अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती सविस्तरपणे दिली गेली आहे.
Natymade jaminichi vikri hou shakte ka 30 versh zali ya vayvaharala,
सर माझी आत्त्यानि आमच्या सोबत 2 वर्षा आधी शेतीचा विक्री करार केला होता अणि त्या शेताची किम्मत वाढली असल्याने ते करून देण्यास तयार नाही. अणि त्यांनी स्वतःच्या मुलाच्या नावानी बक्षीस पत्र केले आहे
(ज्या वेळेस बक्षीस पत्र केले त्या वेळेस सातबाराच्या फेरफार प्रलंबित होता अणि तोच फेरफार आज रोजी नामंजूर करण्यात आला आहे)
सर, माझा एक प्रश्न आहे की , एक अविवाहित भाऊ आहेत ज्यांचे वय आजरोजी ६० वर्ष इतके आहे, त्यांना वडिलोपार्जित शेतीमधून त्यांचा हिस्सा वतानिपत्रद्वरे मिळाला आहे आणि ती आता त्यांच्याच नावे आहे. पण ते त्यांना कोणी अपत्य वगैरे नसल्याकारणाने त्यांचा सांभाळ करणारे त्यांचे दुसरे भाऊ यांना बक्षिसपत्र करून सदरील शेती त्यांच्या नावे करू इच्छितात. तर तसे करता येईल का?
कारण असे आहे की सर याची चौकशी आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसला केली असता ते म्हणाले की भावाभावांमध्ये बक्षिसपत्र करता येत नाही.
काय करणे योग्य राहील?? कृपया मा्गदर्शन करावे.
शेतीची रजिष्ट्री झालेली रद्द करता येईल का… फेरफार रद्द झालं आहे…
वडिलोपार्जित जमिनीचे बक्षिसपत्रं तयार करता येते का?
(आईवडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे)वडिलांनी माझी संमती न घेता परस्पर लहान भावाच्या नावे बक्षिसपत्रं तयार करून दिलं आहे.
Mob.9226110851
बक्षिसपत्र जमीन विकता येती का
वडिलांच्या मृत्यूनंतर आई बक्षीस पत्र लिहून देऊ शकते का .,(वय वर्षे ८४ असताना आणि कोणाला ओळखत नाही अश्यावेळी केलेले बक्षीस पत्र खरं की खोटं याचं शहानिशा न करता सोसायटी NOC देऊ शकते का? )
आणि 4 मुलगे आणि एक मुलगी असेल तर मोठ्या मुलाला काही न कळविता परस्पर नावाने करता येते का?
Sir माझ्या नवऱ्याने नवीन जागा घेऊन घर बांधूया. नवीन home loan घेण्यासाठी राहत असलेला फ्लॅट दोघांच्या नावे असल्याने नवीन loan होणार नाही त्यामुळे खरेदीखत बदलून एकाच्या नावाने करूयात अस सांगून खरेदीखत न करता फसवून बक्षिसपत्र करून घेतले. हे बक्षिसपत्र रद्द होऊ शकत का?