महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहे. मित्रांनो या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी GR प्रकाशित केलेला आहे. याचे टायटल आहे शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषिकर्ज मित्र योजना राबविण्याबाबत.
या योजनेचा शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे तसेच कृषी कर्ज मित्र बनण्यासाठी कोणती पात्रता व कशाप्रकारे अर्ज करावा लागणार आहे या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
GR ची प्रस्तावना: शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका सरकारी तसेच खासगी बँका व पतपेढ्या मार्फत मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. यामध्येही शेतकऱ्यांचा कल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडे जास्त असतो. सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या मार्फत कर्जाचे वितरण केले जाते.
सर्वसाधारणपणे शेतकरी नवीन पीक कर्ज व मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतो. हे कर्ज घेत असताना त्याला सातबारा उतारा पासून ते बँकांचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात. यासाठी बराच कालावधी लागतो व कधी कधी तर हंगाम संपून जातो. केवळ कागदपत्रांच्या पूर्तते अभावी त्यास वेळेवर कर्ज मिळत नाही.
नाईलाजास्तव त्याला खासगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजाचे कर्ज घ्यावे लागते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषिकर्ज मित्र योजना राबविण्याचे बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शा’सन नि’र्णय : शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषिकर्ज मित्र योजना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. योजनेचा उद्देश्य: शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेनं व विनाविलंब होण्यासाठी साहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास साधणे.
योजनेचे स्वरूप : दरवर्षी खरीप, रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असतात यात विषमता आढळून येते कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे. सूक्ष्म निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळे बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येतात.
त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या शेतकऱ्यां व्यतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही. अशा इच्छुक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत किंवा सहाय्य देणे गरजेचे आहे.
ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठी चे कर्ज आवश्यक आहे अशी प्रकरणे कृषिकर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल. प्रत्येक गावांमध्ये कृषिकर्ज मित्र हा नेमण्यात येणार आहे. तो कशाप्रकारे नेमण्यात येणार आहे तसेच तुम्हाला सुद्धा कृषी कर्ज मित्र व्हायचं असेल तर कशा प्रकारे अर्ज करायचा याची माहिती या जीआरमध्ये दिली आहे.
आता कर्ज प्रकरणासाठी शेतकऱ्याला काही सेवा शुल्क द्यावे लागणार आहे ते किती असणार आहे: 1)अल्प मुदतीचे कर्जासाठी सेवाशुल्क 150/- प्रति प्रकरण असणार आहे. 2)मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी: नवीन कर्ज प्रकरण असेल तर 250 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण असेल तर 200/-.
कृषिकर्ज मित्र नोंदणी : 1) कृषिकर्ज मित्र म्हणून सेवा आपण देऊ इच्छित असाल तर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करायचे आहे. 2) नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येणार आहे. 3) जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार हे असणार आहे.
तसेच कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दती ची सविस्तर माहिती द्यावी. कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करेल.
कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्या मधील माध्यस्त च्या भूमिके ऐवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका बजावेल. तसेच कृषिकर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यास सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे.
आपल्या गावासाठी जर कधी आपली कृषिकर्ज मित्र म्हणून आपण नोंदणी केली आणि आपली निवड झाली तर आपल्याला प्रत्येक कर्ज प्रकरणामागे आपल्याला काही सेवा शुल्क हे मिळणार आहे. कृषिकर्ज मित्र म्हणून आपल्याला या ठिकाणी काही पैसे कमवण्याची संधी हे आपल्या गावांमध्ये मिळणार आहे.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.