या बॉलिवूड कलाकारांनी सोडली मराठी सिनेमातही खास छाप
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
मराठी सिनेमा आजवर अनेक कलाकारांना आकर्षित करत आला आहे. आशयघन विषयांना हात घालत असलेल्या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे. अनेक सिनेमांनी मराठीचा झेंडा अटकेपारच नव्हे तर सातासमुद्रापारही नेऊन पोहोचवला आहे. मराठी सिनेमांची भुरळ बॉलिवूड कलाकारांना पडली नाही तर नवलच. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा मराठी सिनेमातही उमटवला आहे. तुम्हाला माहिती आहे का कोण कोण आहेत हे कलाकार…..
अमिताभ बच्चन – अमिताभ बच्चन अलीकडेच एबी आणि सीडी या मराठी सिनेमात दिसले होते. या मराठी सिनेमात त्यांच्यासोबत अभिनेते विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव यांच्या भूमिकाही होत्या.
माधुरी दीक्षित – मराठमोळ्या माधुरीने अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य केलं आहे. माधुरीने तिच्या सेकंड इनिंगमध्ये मराठी सिनेमात पदार्पण केलं. बकेट लिस्ट या सिनेमातून ती मराठी पडद्यावर अवतरली. या सिनेमातील तिच्या मराठमोळ्या अंदाजालाही प्रेक्षकांनी खुप पसंती दर्शवली.
रितेश देशमुख – बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा मराठी मुलगा म्हणजे रितेश देशमुख. रितेशने बॉलिवूड सिनेमातून पदार्पण केलं असलं तरी मराठी सिनेमात मात्र त्याला जबरद्स्त प्रतिसाद मिळाला. रितेश 2014 मध्ये लय भारी सिनेमातून प्रेक्षकांचा भेटीला आला होता.
उर्मिला मातोंडकर – उर्मिलाने बालकलाकार म्हणून ‘झाकोळ’ या मराठी सिनेमात काम केलं होतं. याशिवाय तिने आजोबा या सिनेमातही काम केलं आहे. या सिनेमात ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफरच्या व्यक्तिरेखेत दिसली आहे.
तब्बू – अभिनय संपन्न अभिनेत्री म्हणजे तब्बू. तिच्या अभिनयाचे चाहते बॉलिवूडमध्ये आहेतच पण तिने मराठीतही अदाकारीचा जलवा दाखवला आहे. ‘अस्तित्व’या मराठी सिनेमात ती दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत मोहनीश बहल, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, नम्रता शिरोडकर हे कलाकारही होते.
इशा कोप्पीकर – बॉलिवूडमध्ये खल्लास गर्ल म्हणून ओळख असलेली इशा कोप्पीकर अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे. मराठी सिनेमांमध्येही इशाने जवळपास दोन मराठी सिनेमात काम केलं आहे. मात आणि FU- फ्रेंडशिप अनलिमिटेड या दोन सिनेमात इशा झळकली आहे.
नाना पाटेकर – मराठी रंगभूमीनंतर नानाने बॉलिवूडमध्येही खास छाप उठवली. बॉलिवूडमधील अनेक उत्तम भूमिकांसाठी नानाचं कौतुक झालं आहे.
राकेश बापट – लोभस चेह-याचा अभिनेता राकेश बापटने तुम बिन सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. राकेशनेही दोन मराठी सिनेमात अभिनय केला आहे. आयना का बायना आणि सविता दामोदर परांजपे या सिनेमात तो झळकला होता.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.