50:30:20 या आर्थिक बचतीच्या मूलमंत्राबद्दल माहिती ।। आपल्या रोजच्या जीवनात आर्थिक नियोजन कसे सुयोग्य पद्धतीने करता येईल याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

बजेट नियम मध्ये आपण आर्थिक व्यवस्था आणि पैशाचे नियोजन कसे करायचे? याबद्दलची माहिती बघणार आहोत. भले तुम्ही दहा हजार कमवत असाल किंवा एक लाख कमवत असाल तर त्याचे आर्थिक नियोजन कसे करायचे? आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे? याची सविस्तर माहिती तुम्हाला  इथे भेटेल. यामधून तुम्ही हजाराचे लाख बनवू शकता किंवा अगदी करोड सुद्धा बनवू शकता.

१ . आर्थिक शिस्त : आर्थिक शिस्त म्हणजेच पैसे वाढवण्याचे चावी म्हणजेच गुरु किल्ली आहे. यामध्ये तुम्ही पैसा मॅनेज करण्यासोबतच, त्याची वाढ ही करू शकता. हरकत नाही की तुमचा पगार किती आहे? तुम्हाला माहित नसेल पण 65 टक्के भारतीय आपल्या आर्थिक नियोजन करत नाही. आणि त्याचे खूप काही कारण आहेत.

पहिलं कारण – आर्थिक नियोजन हा विषय समजण्याच्या पलीकडे आहे.

दुसरा कारण – आर्थिक नियोजन समजण्याकरिता आर्थिक व्यवसायांकडे म्हणजे फायनान्शिअल एक्सपर्ट कडे जाण्याशिवाय पर्याय नाही.

तिसरे कारण – सॅलरी कमी असल्यास आर्थिक नियोजनाची गरज नाही. कारण आपण असा विचार करतो की आपला महिना कसाबसा निघून जातो या प्रगारात त्यामुळे नियोजनाची गरज वाटत नाही. तर याच आर्थिक शिस्तीसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी आपण काही नियम उदाहरणासहित बघणार आहोत.

५०:३०:२० बजेट नियम : या नियमाचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्य मजेत सेविंग करत जगू शकता. आपण आपला पगार नुसार आपला प्लॅनिंग आणि खर्च करत असतो. त्यासाठी आपण सगळ्यात आधी समजून घेऊ ग्रॉस इन्कम, नेट इन्कम.

ग्रॉस इन्कम म्हणजेच एकूण उत्पन्न, टॅक्स , इपीएफ इत्यादी वजावट न केलेली रक्कम इत्यादी. आणि टॅक्स ईपीएफ इत्यादी वजावट करून हातात येणारी रक्कम म्हणजेच नेट इन्कम त्यालाच निव्वळ उत्पन्न असे म्हणतात. आज आपण येथे निव्वळ उत्पन्नावर, बजेट प्लॅनिंग कसं करायचं? ते बघणार  आहे.

५०:३०:२०  हा नियम आपल्याला सांगतो की, आपल्या निव्वळ उत्पन्नापैकी 50 टक्के इन्कम हा गरजा पूर्ण करायला पाहिजे आणि तीस टक्के हे आपल्या इच्छा पूर्ण करायला गेले पाहिजे आणि 20 टक्के हे आपली बचत आणि गुंतवणूक इकडे गेले पाहिजेत. या नियमाला आपण काही उदाहरणासहित समजून घेऊ.

उदाहरण : समजा, नेहा नावाची एक व्यक्ती आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात आत्ताच केलेली आहे तिचा पगार म्हणजेच, नेट इन्कम हा 20 हजार रुपये दरमहा आहे. या नियमानुसार नेहाने तिच्या पगाराची पन्नास टक्के रक्कम म्हणजेच 10000 गरजे साठी ठेवली पाहिजे. आता गरजा म्हणजे काय आहे? तर आयुष्यात जगण्याकरता ज्या गोष्टींची आवश्यकता आहे घर भाडे, पाणी, फोन, इंटरनेट बिल, प्रवास इत्यादी. आता ज्या घरात आपण राहतो त्या घराची गृह कर्ज, ईएमाय सुद्धा या भागातच देतो. थोडक्यात गरजा म्हणजे रोटी कपडा मकान.

पगाराची 30 टक्के रक्कम ही, म्हणजे 6000 तिच्या इच्छा साठी ठेवले पाहिजेत. इच्छा म्हणजेच आयुष्य जगण्या करता आवश्यक नसलेला खर्च. वैयक्तिक खर्च जसे की ब्रँडेड कपडे, शॉपिंग, कार-बाइक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बाहेर खाणे इत्यादी असू शकतात. दृष्टीने यशस्वी होण्याकरता आपल्या पगारातून 30 टक्के पेक्षा जास्त खर्च करू नये. आता नेहाने तिच्या इच्छा करिता rs.6000 ठेवले म्हणजेच, एका वर्षाचे 72 हजार तिच्या इच्छां करिता गेले. तेही तिच्या कर्जांवर तडजोड न केल्याशिवाय व कर्ज न घेतल्याशिवाय. म्हणजेच आपल्याला इथे असे कळते की, आर्थिक शिस्तीसह आपण आनंदी होऊ शकतो आणि बचत देखील करू शकतो.

सर्वात महत्त्वाचा आता राहिलेले वीस टक्के. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. पगाराची वीस टक्के रक्कम बचत व गुंतवणूक इकडे म्हणजेच सेविंग आणि इन्वेस्टमेंट कडे जाणे आवश्यक आहे. आता आणीबाणी चेतावनी शिवाय येऊ शकते. आपण त्यासाठी तयार आहोत का?

Eg. जसे की कोरोनाव्हायरस मुळे लोकांनी नोकरी गमावली आहे आणि पगार कट सुद्धा झाले आहेत. पण आपली नोकरी गमावलेल्या अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत का किंवा पुढे अभ्यासासाठी परदेशी जाण्यासाठी बँकेतून कर्ज न घेता, पैसे कसे जमा करू शकतो किंवा आपल्याला घर विकत घ्यायचे आहे. तर बँका केवळ 80 टक्के कर्जपुरवठा करतात. उरलेले 20 टक्के कुठून मिळवायचे अशा परिस्थितीत बचत आणि गुंतवणूक हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.

बचत करणे आणि नियमित गुंतवणूक करणे आपत्कालीन परिस्थिती पासून तुमचे रक्षण करु शकते. आणि तुमच्या जीवनाचे लक्ष्य पूर्ण करण्यात मदत करते. बचत आणि गुंतवणूक करण्याचे बरेच मार्ग आहेत. जसे की फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, पी पी एफ, म्युचल फंड, एस आय पी ,स्टोक्स, गोल्ड बॉन्ड इत्यादी.

आता राहिलेले नेहाच्या पगार चे 20 टक्के म्हणजे चार हजार, बचत पर्यायांमध्ये ठेवले पाहिजेत. हेच शिस्त पाळल्यास नेहाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिक मदत मिळेल आणि मनाची शांती सुद्धा. तर नेहा वार्षिक 48 हजारांपर्यंत बचत करू शकते. बचत आणि गुंतवणुकीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पैसे आपल्यासाठी काम करतात आपण काम न करता तुम्हाला त्या रकमेवर व्याज मिळत राहणार तर ते खूप मस्त आहे आणि ह्या व्याजाने तुमची गुंतवणुकीची रक्कम सुद्धा वाढत जाते. हाच सोप्या शब्दात ५०:३०:२० नियम होता.

आता काही वर्षे पुढे जाऊ. आता नेहा चा पगार आता वाढला आहे. आता तिचा निव्वळ पगार 60000 झाला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल तिने आता तोच ५०:३०:२० बजेट नियम पाळला पाहिजे का? तर उत्तर आहे” नाही”. तर तिने आता ५०-२०-३० नियम पाळला पाहिजे. तर आता या नव्या नियमाला बारकाईने पाहून समजून घेऊया.

आपण पाहिलं की ,आता नेहाचा निव्वळ पगार हा 60000 झाला आहे . त्यातील 50 टक्के म्हणजेच 30000 तिच्या गरजांकडे गेले पाहिजेत. ज्या घरांमध्ये राहतात, त्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जासाठी आपण आपल्या पगाराच्या 40 टक्के रक्कम करण्याची शिफारस सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर्स द्वारे केल्याने हे बदलले नाही. बाकीचे दहा टक्के हे बाकी घर खर्चा साठी ठेवले आहेत.

जर आपले गृहकर्ज 40 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर उरलेली रक्कम ही आपण जादा कर्जा मध्ये भरली पाहिजे. तर ती अधिकची रक्कम असल्यास आपल्या बचत आणि गुंतवणुकीमध्ये ठेवले पाहिजे. नेहाने आता तिच्या वाढत्या उत्पन्नानुसार तिच्या इच्छा तीस टक्क्यांवरून खाली आणाव्यात. म्हणजेच 20 टक्के जे 12 हजार आहेत, जे पूर्वी ठेवलेल्या रकमेपेक्षा दुप्पट आहेत.

तर तिच्या हातात आता खर्च करण्यासाठी एका वर्षात एक लाख 44 हजार  आहेत .वाढीव पगारामध्ये आता तिने बचत आणि गुंतवणुकीचा कोटा हा 20 टक्‍क्‍यांवरून 30% केला पाहिजे,  म्हणजेच 18000 मासिक ठेवले पाहिजेत. नेहाकडे घर कर्ज नसेल तर तीने तिच्या गरजा विभागातील दहा टक्के, या बचत विभागात नक्की जोडून त्यास 40 टक्के करावे. आपल्याला आपल्या पैशांचे अधिक अनुभव आणि चांगली समज प्राप्त झाल्यास, आपल्या गरजेनुसार हा बजेट नियमाचा फेरफार करू शकता. परंतू  सुरुवातीस त्यास चिकटून राहण्याचा सल्ला देत आहे.

जेव्हा आपण आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर   कमी पगार असेल तेव्हा फिफ्टी थर्टी ट्वेन्टी चा नियम पाळावा. जशी आपली प्रगती होईल आपला पगार वाढत जाईल, तसा हा नियम कर्जाप्रमाणे 50- 20-30  किंवा 40-20-40 असा बदला.

एकदा या नियमाचे पालन करण्यास चालू केले की तुम्ही पहाल, कि तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक भक्कम पाया तयार केलेला आहे. आपल्याला शिस्ति वर ताण द्यायचा आहे जर, संपत्ती बांधायची असेल तर शिस्त लावावी लागेल. हे छोटे पाऊल घेऊन तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल आणी आता हे कुणाला नको असतं ?

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा