या होळीला व्यंजनांच्या यादीत या टेस्टी पदार्थाला जरुर आणा

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

नव्या वर्षात येत्या काही दिवसात सणांचा सिलसिला सुरु होईल. भारतीय संस्कृतीची सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर तिची उत्सवप्रियता. प्रत्येक उत्सवामागची धारणा वेगळी, साजरा करण्याची पद्धत वेगळी. तरीही या उत्सवांनी आपलं आयुष्य व्यापलं आहे. आताही होळीचा सण येऊ घातला आहे.

आपल्याकडे कोणताही सण गोड पदार्थांशिवाय अपुर्ण आहे. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे केसर पिस्ता फिरनी. कमी वेळात झटपट होणारी ही डीश सगळ्यांना नक्कीच आवडेल.

साहित्य : केसर काही काड्या, पिस्ता – 10, 12, दुध – 1 लिटर, तांदुळ – 3 मोठे चमचे, वेलची पावडर – पाव चमचा, लो कॅलरी स्वीटनर

Kesar Pista Phirni Recipe by Archana's Kitchen

कृती-

सर्वप्रथम तांदुळ दोन तास भिजवून ठेवा. त्यानंतर मिक्सरवर जाडसर बारीक करुन घ्या. त्यानंतर एका नॉन स्टीक पॅनमध्ये दुध ठेवा. मंद आचेवर अर्धा होईपर्यंत आटवून घ्या. त्यात जाडसर वाटलेले तांदुळ घाला. वरुन थोडं कोमट पाणी घाला.

त्यामुळे गाठी होणार नाहीत. आता थोडं दाट होऊ लागलं की आच कमी करा. कमी आचेवर उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करुन उतरुन घ्या. यात इलायची आणि केसर टाका. आता लो कॅलरी स्वीटनर टाका.

आता बाऊल किंवा कुल्ह्डमध्ये हे मिश्रण भरा. यावर पिस्ते बारीक चिरलेले टाका. आणि केसरही पसरवा. आता हे मिश्रणफ्रिजमध्ये ठेवा. दोन तास फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर सर्व्ह करा. उन्हाळ्यासाठी सगळ्यात उत्तम डेझर्ट आहे आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा