नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते या विषयावर भारतात प्रबंध लिहिता येऊ शकेल इतका मोठा आहे. भारतीय चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींवर जीवापाड प्रेम करत असतात. अनेकदा विविध टास्क करतानाही ते मागेपुढे पाहात नाही. मग ते आवडत्या सेलिब्रिटींच्या घरापाशी एक झलक पाहण्यासाठी तासंतास वाट पाहणं असो किंवा आवडत्या सेलिब्रिटींची स्टाईल कॉपी करणं असो.
चाहते आपलं प्रेम व्यक्तं करताना जराही थकताना दिसत नाही. पण भारतासारख्या देवभोळ्या देशात केवळ देवाचेच पुतळे आणि मंदिरं असतील या गैरसमजात असाल तर बाहेर या. भारतीय त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचे पुतळेही उभारले आहेत. तुम्हाला माहिती आहे का? आपल्या देशात अभिनेता, अभिनेत्री राजकारणी यांची मंदिरं आहेत. तर आज आपण माहित करुन घेऊया की कोणकोणते सेलिब्रिटी फॅन्सच्या मनात देवासारखं स्थान पटकावून आहेत.
अमिताभ बच्चन – ‘स्टार ऑफ द मिलेनियम’ चा किताब आपल्या शिरावर मिरवणारे बिग बी या यादीत नसतील तर नवलच. 2001 मध्ये कोलकाता येथे अमिताभ यांचं मंदिर बांधलं आहे. कोणत्याही हिंदू देवतेप्रमाणेच अमिताभच्या मुर्तीचीही इथे प्रतिष्ठापना केली आहे. व्हाईट शुज घातलेले सरकार सिनेमाच्या लूकमध्ये असलेल्या अमिताभची इथे सकाळ संध्याकाळ आरतीही केली जाते.
नमिता- दाक्षिणात्य लोक व्यक्तीपुजेच्या संदर्भात इतर भारतीयांपेक्षा काकणभर पुढे आहेत. 35 हून तमिळ, तेलुगु आणि मल्याळम सिनेमात झळकलेली अभिनेत्री नमिता हिचेही तमिळनाडूमध्ये मंदिर आहे. 2008मध्ये नमिताच्या चाहत्यांनी तिचं तामिळनाडूमध्ये मंदिर बांधलं. असं मंदिर बांधलं जाणारी ही दुसरी दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
सचिन तेंडुलकर – भारतीयांसाठी गॉड ऑफ क्रिकेट असलेला सचिन तेंडुलकरचं बिहारमध्ये मंदिर आहे. अभिनेता मनोज तिवारीने सचिनच्या पाच फुटी पुतळ्याचं अनावरण करत हे मंदिर सर्वांसाठी खुलं केलं होतं.
रजनीकांत- थलैवा रजनीकांतच या यादीत नाव नसणं शक्यच नाही. रजनीकांतची मुर्ती असलेलं मंदिर नसलं तरी एक खास गोष्ट आहे जी या मंदिराला अतिशय खास बनवते. रजनीकांत यांच्या फ़ॅनने त्यांच्या आरोग्यासाठी जवळपास एक कोटी शिवलिंगांची स्थापना करत मंदीर उभं केलं आहे.
खुशबू- जिवंतपणी मंदिर उभं राहणारी खुशबू ही पहिली दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. 2001 मध्ये तिच्या फॅन्सनी हे मंदिर बांधल होतं. पण खुशबूने 2005 मध्ये लग्नापुर्वीच्या संबंधामुळे केलेल्या वक्तव्यामुळे तिच्याच फॅन्सनी हे मंदिर पाडलं.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा