दीप सिद्धूच नाही तर या कलाकारांनीही गमावला अपघातात जीव

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

रस्ते अपघाताची बातमी अजूनही काळजाचा ठोका चुकवते. मागील वर्षी देशभरात जवळपास 3.4 लाख रोड अ‍ॅक्सिडेंट झाले असा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल आहे. रोज पेपरात एक ना दोन अशा अनेक बातम्या रोज अपघाताच्या असतात.

अनेकदा या अपघातात सेलिब्रिटीही बळी पडताना दिसतात. अनेकजण करिअरच्या शिखरावर असताना, कमी वयात जगाचा निरोप घेतात. नुकतीच एक बातमी आली की पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू झाला. शेतकरी आंदोलनाच्या वेळी दीप सिद्धूचं नाव चर्चेत आलं होतं.

पण तुम्हाला माहिती आहे का अशा अपघातात यापुर्वीही अनेक सेलिब्रिटींनी आपला जीव गमावला आहे. अनेकांनी तर करिअरच्या पीकवर असताना या जगाचा निरोप घेतला. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी…..

भक्ती बर्वे – इनामदार : अपघातासारख्या वाईट घटनेने भक्ती बर्वे यांच्यासारखी गुणी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. वयाच्या 52 व्या वर्षी भक्तीचा मृत्यू झाला.

शफी इनामदार यांच्या निधनानंतर चारच वर्षांत त्यांची पत्नी अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे झाले होते निधन - Marathi News | Due to Shafi Inamdar's death, his wife actress ...

आनंद अभ्यंकर – 2012 मध्ये मुंबई-पुणे हायवेवर झालेल्या अपघातात अभिनेता आनंद अभ्यंकर यांनी जीव गमावला होता. वयाच्या 48 व्या वर्षी आनंद यांनी जगाचा निरोप घेतला. अनेक मराठी, हिंदी सिनेमात आनंद यांनी अभिनय केला होता.

Anand Abhyankar

अक्षय पेंडसे – आनंद अभ्यंकर यांच्यासोबतच अक्षय पेंडसे या अभिनेत्याचाही अपघात झाला होता. अक्षयसोबत त्याचा लहान मुलगा प्रत्यूष याचाही या अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला. या अपघातात अक्षयची पत्नी दीप्ती जखमी झाली होती.

Marathi actors, child killed in E-way accident - Indian Express

ईश्वरी देशपांडे- अभिनेत्री ईश्वरी देशपांडे ही अगदी कमी वयात अपघाती निधन झालेली अभिनेत्री. मागील वर्षी गोव्यातील बागा-कलंगुट येथील खाडीत ईश्वरीची कार कोसळली होती. यावेळी ईश्वरीसोबत तिचा मित्र शुभम देगडेही होता. शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाडीत कोसळली. नाकातोंडात पाणी जाऊन या दोघांचाही मृत्यू झाला.

Ishwari Deshpande Height, Age, Death, Boyfriend, Family, Biography & More » StarsUnfolded

जसपाल भट्टी – हास्य अभिनय आणि व्यंग अभिनेते जसपाल भट्टी यांचंही अपघाती निधन झालं. जसपाल आपल्या व्यंगात्मक विनोदासाठी ओळखले जायचे. त्यांच्या उल्टा पुल्टा आणि फ्लॉप शो या विनोदी सिरीजनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. जालंदर येथे त्यांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात जसपाल यांचं निधन झालं होतं.

Jaspal Bhatti - Wikipedia

गीता माळी – प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचंही अपघाती निधन झालं. नाशिकला जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघतात त्यांचं निधन झालं होतं.

Marathi Singer Geeta Mali dies in road accident on Mumbai-Agra highway | Latest News India - Hindustan Times

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.