या अभिनेत्रींनी निगेटिव्ह रोल्समध्ये उमटवला होता ठसा

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

 

हिरो, व्हिलन सिनेमातील मुख्य दोन पात्रं. जवळपास 80 टक्के सिनेमांमध्ये ही दोन पात्रं सिनेमाभर वावरत असतात. अनेकदा अशा सिनेमामध्ये अभिनेत्रीची भूमिका केवळ ग्लॅमर अ‍ॅड करण्यापुरतीच असते. पण सिनेमाने जशी कात टाकत गेली. तशी सिनेमाही अधिक प्रगल्भ होत गेला. एक काळ नायिकाप्रधान सिनेमांनीही गाजवला. या सिनेमांना प्रेक्षकांनीही तितकाच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पण काही सिनेमे असेही आहेत ज्यात व्हिलनची जागा अभिनेत्रींनी घेतलेली दिसते.
सशक्त कथानक असलेले अनेक सिनेमे अभिनेत्रींच्या निगेटिव्ह भूमिकेतील अदाकारीने सजले आहेत. तुम्हाला यातील कोण कोणते सिनेमे आवडतात जरुर सांगा.

प्रियांका चोप्रा (ऐतराज) – करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका साकारुन प्रियांकाने मोठी रिस्क घेतली होती खरी पण हा सिनेमा तिच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या सिनेमात तिने साकारलेली व्हिलन स्टायलिश तर होतीच पण अभिनयातही भाव खाऊन गेली.

काजोल (गुप्त)– बबली लूकमध्ये भाव खाऊन जाणारी काजोल एकदम व्हिलनच्या भूमिकेत समोर आली तेव्हा तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. गुप्तमध्ये तिने एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या मुलीची भूमिका उत्तम साकारली होती.

 

When Kajol turned a villain and her secret remained 'gupt' | Entertainment News,The Indian Express

श्रीदेवी (लाडला)– श्रीदेवीच्या अभिनयाने सजलेला आणखी एक सिनेमा. या सिनेमात श्रीदेवीने घमेंडी, श्रीमंत अशा बॉसची भूमिका साकारली आहे. या सिनेमासाठी तिला उत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

उर्मिला मातोंड्कर (प्यार तुने क्या किया‌ )– उर्मिलाने एकतर्फी प्रेमात मानसिक संतुलन हरवलेल्या मुलीची भूमिका यात उत्तम साकारली होती. या सिनेमात तिच्यासोबत फरदीन खान आणि सोनाली कुलकर्णी होते.

विद्या बालन (इश्किया) – नसरुद्दीन शाह, अर्शद वारसी या तगड्या कलाकारांमध्ये विद्याने साकारलेली व्हिलन खास लक्षात राहिली.

Arshad Warsi,Vidya Balan

प्रियांका चोप्रा (सात खुन माफ )- पुन्हा एकदा प्रियांकाने यात साकारलेली ग्रेशेडची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्य व्यक्त करायला लावणारी ठरली. सात पतींचा खुन करणा-या पत्नीच्या भूमिकेत यात प्रियांका दिसली आहे.

बिपाशा बासू ( जिस्म )- बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमच्या केमिस्ट्रीने हा सिनेमा रंगला. या सिनेमात बिपाशाने निगेटिव्ह भूमिका साकारली होती.

Irrfan Khan biography: How the actor aced his performance in Vishal Bhardwaj's Maqbool

तब्बू (मकबूल, अंधाधुन)- दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तब्बू. आजवर तिने अनेक सिनेमांमधून उत्तम भूमिका साकारल्या. पण नकारात्मक भूमिकेतही तिने खास छाप सोडली. मकबूलमध्ये तिने साकारलेली निम्मी प्रेक्षकांना खास आवडली. याशिवाय तिने अंधाधुनमध्ये साकरलेल्या सिमीवरही कौतुकाचा वर्षाव झाला.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.