चांगला मेडिक्लेम प्लान, हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा कसा निवडायचा? ।। मेडिक्लेम निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार हा प्रामुख्याने करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

आज आपण मेडिक्लेम या विषयावर बोलणार आहोत. मेडिक्लेम, हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मेडिक्लेम हा असा प्रकार आहे की सध्या ती गरजेची वस्तू बनली आहे. तुमच्याजवळ मेडिक्लेम आहे किंवा तुम्ही मेडिक्लेम घेण्याचा विचार करत आहात यामध्ये आपण बघणार आहोत की मेडिक्लेम मध्ये कोण कोणत्या गोष्टी येतात.

मेडिक्लेम घेताना कोण कोणत्या गोष्टी तुम्ही पडताळून पाहिले पाहिजे. मेडिक्लेम म्हणजे एक असा विमा, ज्यामध्ये एखादा व्यक्ती दवाखान्यात ऍडमिट झाला किंवा चोवीस तासापेक्षा अधिक काळ जर तो हॉस्पिटल मध्ये असेल. तर त्याला हॉस्पिटलचा सर्व खर्च म्हणजे रूम रेंट, नर्सिंग चार्जेस किंवा जर त्याला आय सी यू मध्ये भरती केले तर आय सी यू फीज, डॉक्टर फीज आणि मेडिसिन हे सर्व खर्च तुम्हाला कंपनी देते. ज्यावेळी तुम्ही मेडिक्लेम घेण्याचा विचार करता. त्या वेळी सर्वप्रथम तुमच्या डोळ्यासमोर येते की मेडिक्लेम ला किती खर्च येईल.

आणि तुम्ही शोधू लागता कि स्वस्तामध्ये मला कोणता मेडिक्लेम मिळेल. पण थांबा. स्वस्त मध्ये मेडिक्लेम घेण्याआधी विचार करा कि ती कंपनी तुम्हाला स्वस्तामध्ये मेडिक्लेम का देत आहे. आणि यासाठी महत्वपूर्ण आहे की ते मेडिक्लेम मध्ये असणाऱ्या वेगळ्या गोष्टी पडताळून पाहणे तुम्ही मेडिक्लेम घेताना तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वैयक्तिक ईन्डिविज्युअल मेडिक्लेम घेऊ शकता. व तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी, फॅमिली किंवा त्याला फ्लोटर प्लॅन असं बोलतात. तो तुम्ही घेऊ शकता.

मेडिक्लेम घेताना सर्वात पहीली गोष्ट बघा तर ती म्हणजे सम इन्श्युर म्हणजे किती रुपयापर्यंत तुम्ही क्लेम करू शकता. तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला किती सम इन्श्युर ची गरज आहे. तुम्हाला किती अमाऊंट गरज आहे. अनेक कंपन्या प्लान मध्ये तुम्हाला एक लाखापासून एक करोड पर्यंत रुपये चा मेडिक्लेम मिळतो. सर्वप्रथम ठरवलं पाहिजे कि तुम्हाला किती मेडिक्लेम, किती अमाऊंट ची गरज आहे.

त्यानंतरच तुम्ही पुढे जा. सम इन्श्युर ठरल्या नंतर आपल्याला पुढली गोष्ट बघायची आहे कि जी पॉलिसी आपण घेत आहोत किंवा घेतली आहे. त्यामध्ये कॅशलेस ट्रीटमेंट आहे की नाही. अनेकदा असं होतं की एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्याला आधी हॉस्पिटलचा पूर्ण खर्च स्वतः करावा लागतो. त्यानंतर तो सगळ्या हॉस्पिटल चे पेपर कंपनीमध्ये सब्मिट करतो आणि त्यानंतर त्यांना क्लेम मिळतो.

पण जर तुमच्या पॉलिसी मध्ये कॅशलेस ट्रिटमेंट असेल तर तुम्हाला सुरुवातीला हॉस्पिटलचा कोणताही खर्च करण्याची गरज नाही. एखादी व्यक्ती ज्या वेळी हॉस्पिटलाईज होईल आणि त्याच्या पॉलिसीमध्ये कॅशलेस ट्रिटमेंत उपलब्ध असेल तर त्याला फक्त सुरुवातीचे काही डिपोझिट, उदाहरणात पाच ते दहा हजार रुपये, डिपेंड ऑन हॉस्पिटल भरावे लागतात आणि त्यानंतर सर्व खर्च कंपनी बघते. त्याला त्या डिपॉझिट खेरिज ईतर कोणतीही रक्कम नंतर भरण्याची गरज नसते. हा आहे एक कॅशलेस ट्रिटमेंट चा फायदा.

त्यानंतर तुम्ही पहाल की त्या कंपनीच्या पॉलिसी मध्ये कोण कोणते नेटवर्क हॉस्पिटल आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो, आपल्या घरापासून जवळ असणारे चांगल्या हॉस्पिटल ची लिस्ट. ज्या पॉलिसीमध्ये आहे त्या हॉस्पिटल त्या नेटवर्क लिस्ट मध्ये येतात तीच पॉलिसी आपण निवडावी. आपण मेडिक्लेम का घेतो. की देव ना करो आपल्यावर हॉस्पिटल मध्ये जाण्याची वेळ आली तर त्या हॉस्पिटलचा सर्व खर्च आपल्याला परवडावा.

त्या हॉस्पिटलच्या खर्चाचा बोजा आपल्या व आपल्या कुटुंबास पडू नये म्हणून. त्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम तपासा, कि त्या मेडिक्लेम पॉलिसी मध्ये हॉस्पिटलाईझेशन एक्सपेन्सेस. हॉस्पिटल चा खर्च जो आहे त्यामध्ये येतं नर्सिंग चार्जेस, आणि बेड एक्स्पेंस, त्याचबरोबर डॉक्टर फी, आय सी यू फी, मेडिकल ट्रीटमेंट फी, ऑपरेशन फी यामध्ये तर काही कॅंपिंग नाहीये ना? या मध्ये तर काही लिमिट नाही ना? तुम्ही तोच प्लॉन निवडा ज्या प्लॉन मध्ये ऍक्च्युअचल ऑपरेशन एक्सपेंस, डॉक्टर फी, आय सी यु फी, मेडिकल फी, तुम्हाला मिळेल.

अनेक प्लानमध्ये एक टक्का किंवा दोन टक्के सम इन्श्युर च्या अशा रीतीने तुम्हाला ऑपरेशन एक्सपेंस चा कवर दिला जातो. पण असे मेडिक्लेम घेणं तुम्ही टाळा. उदाहरणार्थ बघा एखाद्या व्यक्तीकडे दोन लाख रुपये चा सम इन्श्युर चा विमा आहे. त्याच्यावर हॅस्पिटलाईज होण्याची पाळी आली. आता त्याच्या पॉलिसीमध्ये कॅपिंग आहे. दोन टक्के दोन लाखाच्या. दोन टक्के सम इन्श्युर च्या. तर सम इन्श्युर च्या दोन टक्के म्हणजे झाले चार हजार रुपये. एका दिवसात जर त्याच्या हॉस्पिटल चा खर्च हा सात ते आठ हजार रुपये असेल. तर त्याला फक्त चार हजार मिळतील. कारण त्यांच्या पॉलिसीमध्ये कॅपिंग, म्हणजे लिमिट आहे. तर शक्यतो अशा लिमिट वाल्या पॉलिसी घेणे टाळा.

त्यानंतर बघा की तुमच्या पॉलिसीमध्ये ॲम्बुलन्स चार्ज किती कवर होत आहेत? अनेकदा पॉलिसी मध्ये एम्ब्युलेन्स चार्ज पाचशे किंवा हजार किंवा दोन हजार पर्यंत असतात. परंतु अशी पॉलिसी निवडा ज्या पॉलिसी मध्ये एक्चुल जो काही तुमचा एम्ब्युलेन्स चा खर्च येईल. तो खर्च तुम्हाला मिळाला पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलाझेशन एक्सेपेंस.

अनेक पॉलिसी तुम्हाला तीस- साठ म्हणजेच प्रि हॉस्पिटलाझेशन एक्सेपेंस तीस दिवसापर्यंत आणि पोस्ट हॉस्पिटल एक्सपेंस साठ दिवसापर्यंत देते. हे नक्की काय आहे? एखादा आजार जर तुम्हाला डिटेक्ट झाला‌. तर तुम्ही सुरुवातीला लगेचच हॉस्पिटल मध्ये ऐडमिट होत नाही. आधी आपल्या डॉक्टर कडे जाता. त्या ठिकाणी रिपोर्ट काढता. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हॉस्पिटलाईज होता. मग हे सर्व खर्च, हे तुमच्या प्रि हॉस्पिटल एक्सपेंस मध्ये येतात. त्यानंतर हॉस्पिटल मध्ये झालेला खर्च पूर्ण तुम्हाला भेटतो.

पण त्या नंतर तुम्ही जेव्हा हॉस्पिटल मधून बाहेर येता. त्यावेळी देखील तुम्हाला अनेक रिपोर्ट करावे लागतात. अनेक फॉलो-अप चेकअप करावे लागतात. अनेक मेडिसीन लागतात. हे खर्च जे आहेत, ते त्या पोस्ट हॉस्पिटल मध्ये कव्हर होता. सध्या अनेक कंपनी प्रि मध्ये तीस- साठ ते नव्वद दिवस. आणि पोस्टमध्ये साठ दिवस, नव्वद दिवस आणि १२० दिवस पर्यंत तुमच्या सर्व खर्च कवर करते. ती पॉलिसी निवडा ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रि आणि पोस्ट हॉस्पिटल कवर मिळतोय.

पुढे महत्वाची गोष्ट डे केअर हॉस्पिटल एक्सपेंस. डे केअर म्हणजे कि एखाद्या व्यक्ती सकाळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. त्याच्यावर जे काही सर्जरी करायचे आहे, ते दिवसामध्ये पूर्ण होऊन त्याला संध्याकाळी डिस्चार्ज मिळतो. अनेक कंपन्या डे केअर मध्ये दीडशे ते पाचशे किंवा सातशे, आठशे प्रोसिजर कवर करतात. अनेक कंपन्या ऑल डे केअर प्रोसिजर कवर करतात.

शक्यतो ती पॉलिसी निवडा जी कंपनी तुम्हाला ऑल डे केअर प्रोसिजर देत आहे. नंतर महत्वाची गोष्ट आहे. कंज्युम्बल बेनिफिट. ज्यावेळी एखादा व्यक्ती हॉस्पिटलाझेशन होतो. त्यावेळी त्याच्या साठी मेडिकल बरोबर नॉन मेडिकल गोष्टी देखील वापरल्या जातात. उदाहरणार्थ हॅंड ग्लोज, मास्क, थर्मामीटर. आता या सर्व गोष्टींचा त्याच्या आजाराशी काही संबंध नसतो. परंतु या गोष्टीचा वापर डॉक्टर करतात. आणि याचं बिल तुम्हाला दिले जाते. हे सर्व आइटम येतात कन्ज्युमेबल मध्ये. आणि अनेक प्लान हे कन्ज्युमेबल तुम्हाला देत नाही. त्यामुळे हा कंज्युम्बल चा खर्च तुम्हाला स्वतःला करायला लागतो. सध्या अनेक कंपनी यांचे प्लॉन आहे या मध्ये कन्ज्युमेबल चा खर्च तुम्हाला दिला जातो. शक्यतो असे प्लॅन निवडा ज्या मध्ये तुम्हाला कन्ज्युमेबल बेनिफिट दिले जातील.

नंतर महत्वाची गोष्ट आहे, को पे. सर्व प्रथम समजून घेऊ कि को पे ही कन्सेप्ट काय आहे? को पे या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला को पे जितका असेल तितका खर्च स्वतः करावा लागतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या पॉलिसीमध्ये वीस टक्के को पे असेल. आणि त्याच्या हॉस्पिटल चा खर्च दोन लाख रुपये आला. तर दोन लाखाच्या 20% म्हणजे चाळीस हजार रुपये हे त्याला भरावे लागतील. आणि उरलेला एक लाख साठ हजार हा खर्च त्यांना कंपनीकडून मिळेल. सध्या अनेक कंपन्या को पे हा ऑप्शन ठेवत नाहीत. हा परंतु जर तुम्ही साठ वर्षाच्या वर पॉलिसी घेतली. तर तुम्हाला मात्र प्रत्येक पॉलिसीमध्ये को पे लागतो. त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही लवकरात लवकर म्हणजे अर्ली एज मध्ये मेडिकल पॉलिसी घ्या. जेनेकरून तुम्हाला को पे लागणार नाही.

पुढची गोष्ट जी तुम्ही तुमच्या पॉलिसी मध्ये बघाल ती म्हणजे डॉमिसलरी एक्सपेंस तुमच्या पॉलिसीमध्ये कवर आहेत की नाही. डॉमिसलरी एक्सपेंस म्हणजे तुम्ही हॉस्पिटलाईज न होता, पूर्ण ट्रीटमेंट जे आहे ते घरीच घेत आहात त्याला बोलतो आपण डॉमिसलरी ट्रीटमेंट. तर अशावेळी ते ट्रिटमेंट तुमच्या पॉलिसीमध्ये हवी. ही ट्रिटमेंट तुमच्या पॉलिसीमध्ये नसेल तर शक्यतो अशी पॉलिसी घ्यायचा प्रयत्न करा ज्या मध्ये ती ईन्क्लुड असेल. त्याच बरोबर ती ईन्क्लुड असेल तर त्यामध्ये टर्म्स अंड कंनेक्शन्स काय आहे? अटी काय आहे? ते चेक करा. अनेक कंपन्या तुम्हाला डॉमिसिलरी ट्रिटमेंट तेव्हा देतात ज्यावेळी तुमची ट्रीटमेंट हे तीन चार किंवा पाच दिवसाच्या वरती चाललेली असते.

पुढील महत्त्वाची गोष्ट आहे आयुष ट्रीटमेंट. आयुर्वेदिक खर्च. तुमच्या पॉलिसीमध्ये आयुष ट्रिटमेंट कवर आहे की नाही ते तपासून पहा. जर आयुष ट्रिटमेंट कवर असेल तर त्याची लिमिट बघा. ज्या पॉलिसीमध्ये आयुष ट्रीटमेंट कवर आहे. चांगले लिमिटेड कंपनी देते ती पॉलीसी शक्यतो निवडा. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे को’रो’ना. सध्या को’रो’ना चे दिवस आहेत. को’रो’ना ची साथ सर्वत्र पसरलेली आहे. त्यामुळे तुम्ही जी पॉलिसी घेत आहात किंवा जे अधिक पॉलिसी तुमच्याकडे ऑलरेडी आहे ती पॉलिसी को’रो’ना कव्हर करते की नाही. को’रो’नाशी संबंधित हॉस्पिटलचे सर्व खर्च कव्हर करते की नाही. ते एकदा नक्की तपासून पहा. जी पॉलिसी को’रो’ना कव्हर करते. ज्या पॉलिसीमध्ये को’रो’नाचे खर्च मिळतात, ती पॉलिसी तुम्ही निवडा.

पुढचा मुद्दा बघू. तो म्हणजे मीड टर्म इंक्लुजन. मीड टर्म इंक्लुजन म्हणजे काय? जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत आहात. एक सहा महिन्यानंतर तुमचं लग्न आहे. आणि आज तुम्ही ठरवलं की मला पॉलिसी घ्यायची आहे. तर हे नक्की तपासा पॉलिसी घेताना की सहा महिन्यानंतर मी माझ्या स्पाऊस ला, बायकोला किंवा नवऱ्याला, त्या पॉलिसी मध्ये ऍड करू शकतो की नाही. त्याच बरोबर जन्माला येणार नवीन अपत्य, त्याला देखील तुम्ही तुमच्या पॉलिसी मध्ये ऍड करू शकता की नाही हे एकदा नक्की तपासून पहा. अनेक पॉलिसीमध्ये मीड टर्म इन्क्लुजन दिले जात नाही.

म्हणजेच काय? जर तुमचं लग्न पॉलिसीच्या मध्यावर झालं. किंवा जर तुम्हाला एखाद्या पॉलिसीच्या मध्यावर झालं. तर त्या अपत्याला किंवा तुमच्याच पाऊस ला ॲड करण्यासाठी तुम्हाला पूर्ण पॉलिसी संपण्याची वाट बघावी लागेल. तर शक्यतो अशी पॉलिसी निवडा ज्यामध्ये तुम्ही मीड टर्म इंक्लुजन करू शकता. म्हणजेच पॉलिसीच्या मध्ये देखील तुम्ही एखाद्या व्यक्तीला ऍड करू शकता.

पुढचा महत्वाचा मुद्दा जो तुम्ही तपासाल, तो असा आहे की तुम्ही ज्या कंपनीची पॉलिसी बघत आहात, ती कंपनी तुम्हाला मल्टी ईअर पॉलिसी पुरवते आहे का? म्हणजेच एक वर्षात, दोन वर्षे किंवा तीन वर्षांपर्यंत तुम्ही एकाच वेळी पॉलिसी घेऊ शकत आहात का? याचा फायदा हा होतो की जर तुम्ही मल्टी ईअर पॉलिसी घेतली. तर तुम्हाला सुरुवातीलाच डिस्काउंट मिळते. त्याचबरोबर पुढील वर्षांमध्ये किंवा त्या पुढील वर्षामध्ये पॉलिसीचे रेट वाढले, तरी देखील तुम्हाला जुन्या रेट मध्येच पॉलिसी मिळालेली असते. या मध्ये तुमचे पैसे वाचतात.

पुढचा मुद्दा आहे. तो म्हणजे तुमच्या मेडिकल पॉलिसी मध्ये बॅरियर ट्रिक सर्जरी, डेंटल ट्रिटमेंट आणि सायकियाट्रिक ट्रिटमेंट ईन्क्लुड आहे की नाही. जर असेल तर त्यांचं वेटींग पिरेड किती आहे? त्याच बरोबर किती लिमीट तुम्हाला त्या ट्रिटमेंट साठी कंपनी देत आहे. तसेच तुमच्या पॉलिसी मध्ये अवयव डोनर एक्सपेंस कवर आहेत की नाही. जर आहे तर त्यांचं लिमिट किती आहे? किती ओरगन पर्यंत तुम्हाला एक्सपेंस मिळतील?

पुढची महत्वाची गोष्ट जी तुम्ही तुमच्या पॉलिसी मध्ये बघाल, की तुमच्या पॉलिसीमध्ये मेटरनिटी एक्सपेन्सेस कवर आहेत की नाही आहेत. जर तुम्ही लग्न झालेल्या व्यक्ती असाल. आणि तुम्हाला पॉलिसी घ्यायचे आहे तर नक्कीच तुम्हाला मॅटर्निटी खर्च येणारच आहे. तर अशावेळी तुम्ही बघा की तुमच्या पॉलिसी मध्ये मॅटर्निटी खर्च आहे, की नाही. जर तुमची पॉलिसी मॅटर्निटी एक्सपेंस कवर करत आहे तर त्यासाठी वेटिंग रेट किती आहे? त्याचबरोबर तो खर्च किती, किती लिमिट पण तुम्हाला खर्च कंपनी देणार आहेत ते एकदा तुम्ही तपासून पहा. आणि जी कंपनी मॅटर्निटी कवर देत आहे. आणि जी कंपनी मॅटर्निटी मध्ये जास्तीत जास्त कवर तुम्हाला देत आहे. ती पॉलिसी तुम्ही निवडू शकता.

पुढील मुद्दे जे तुम्हाला बघायचे आहेत. ते म्हणजे तुमच्या पॉलिसीमध्ये वॅक्सिनेशन कवर आहे की नाही आहे. त्याचबरोबर ओपीडीचा खर्च तुम्हाला तुमचे पॉलिसी देते की नाही. तसेच ग्लोबल कवर तुमच्या पॉलिसी मध्ये आहे की नाही. ग्लोबल कवर चा फायदा हा होतो की एखाद्या व्यक्तीला आजार झाला आणि जर त्याला भारताच्या बाहेर जाऊन ट्रीटमेंट द्यायची असेल. तर भारताच्या बाहेर ट्रिटमेंट चा देखील पूर्ण खर्च तुम्हाला तुमची पॉलिसी देते. मात्र अशावेळी तुमच्या पॉलिसीमध्ये ग्लोबल कवर असणं अत्यंत आवश्यक आहे. तर पॉलिसी घेताना एकदा नक्की तपासा की तूम्हाला जी पॉलिसी आवडले आहे. त्या पॉलिसीमध्ये ग्लोबल कवर आहे की नाही.

पुढील गोष्टी जी तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी मध्ये बघाल ती म्हणजे तुमची मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट किंवा टी डी, म्हणजे पर्मनंट टोटल डिसॉबिलिटी बेनिफिट देत आहे की नाही. तर पॉलिसी घेण्याआधी. हा ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट आणि पी टी डी तुमच्या पॉलिसी मध्ये आहे की नाही हे तपासून पहा.

पुढील गोष्ट आहे जी तुम्ही तपासाल, ती म्हणजे तुम्ही निवडलेली मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला हेल्थ चेकप बेनिफिट देत आहे की नाही. अनेक कंपन्या चार क्लेम इअर नंतर, तुम्हाला हेल्थ चेकअपसाठी वाऊचर देतात. तर अनेक कंपन्या दोन वर्षांनंतर देतात. तर अनेक कंपन्या एक वर्षानंतर वाऊचर देतात. शक्यतो जी कंपनी तुम्हाला दरवर्षी हेल्थ चेकअपसाठी वाऊचर देत असेल. असे कंपनी तुम्ही निवडू शकता.

पुढचा मुद्दा येतो हॉस्पिटल कॅश बेनिफिट. आता हॅस्पिटल कॅश बेनिफिट ही प्रत्येक पॉलिसी तुम्हाला देत नाही. अनेक टोपेंड पॉलिसीमध्ये हा बेनिफिट इन बिल्ड असतो. तर काही पॉलिसीमध्ये तुम्हाला हा ऑप्शनल कवर म्हणून घ्यावा लागतो. हॉस्पिटल कॅश बेनिफिट म्हणजे काय? ते आपण समजून घेऊया. एखादा व्यक्ती ज्या वेळी हॉस्पिटलाईज होतो. त्यावेळी तो जॉब लेस होतो.

म्हणजे त्या हॉस्पिटल च्या वेळे मध्ये त्याला जॉब वर जाता येत नाही. त्याला त्या दिवशी चा पगार मिळत नाही. अशा वेळी तुमच्या पॉलिसीमध्ये जर हॉस्पिटलाईझेशन कॅश बेनिफिट असेल. तर एक ठराविक रक्कम तुम्हाला ठरावीक दिवसांपर्यंत तुमच्या हॉस्पिटल खर्चाच्या वरती दिली जाते. जॉबलॉस झाल्यामुळे, जे आपलं नुकसान झालेला आहे. ते हॉस्पिटल कॅश बेनिफिट मधून भरून निघते. त्यामुळे जी पॉलिसी तुम्हाला हॅस्पिटलाईज कॅश बेनिफिट देत असेल. आणि जास्त देत असेल. ती पॉलिसी तुम्ही निवडू शकता.

त्यानंतर तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी मध्ये चेक करा की तुमच्या पॉलिसीमध्ये रिस्टोर बेनिफिट आहे की नाही. जर असेल तरी किती आहे. अनेक कंपन्या शंभर टक्के, दोनशे टक्के, तीनशे टक्के पर्यंत रिस्टोर बेनिफिट देतात. रिस्टोर बेनिफिट म्हणजे काय? ते आपण समजून घेऊया. रिस्टोर बेनिफिट मधे तुम्हाला तुमचा सम इन्श्युर पुन्हा रिस्टोर होऊन मिळतो. म्हणजे नक्की काय मिळते? नक्की कसा मिळतो? समजा एखाद्या व्यक्ती ने पाच लाख रुपयांची पॉलिसी घेतली. आणि पॉलिसी च्या सुरुवातीला त्याला एखाद्या आजारामुळे हॅस्पिटलाईज व्हावे लागलं.

आणि त्याचे पाच लाख रुपये पॉलिसी चे पूर्ण संपले. तर अशा वेळी तुम्हाला कंपनी पाच लाख रुपये पुन्हा रिस्टोर करून देते. तेव्हा तुम्ही अजून पाच लाख रुपये पॉलिसी मध्ये वापरू शकता. याला बोलतात रिस्टोर बेनिफिट. फक्त रिस्टोर बेनिफिट असून चालणार नाही. तर त्या रिस्टोर बेनिफिट मध्ये काही अटी आहेत का.

हे देखील तुम्हाला एकदा चेक करावे लागेल. कारण अनेक कंपन्यांच्या रिस्टोर बेनिफिट मध्ये अशी अट असते, की तुम्ही पॉलिसी च्या सुरुवातीला ज्या कारणासाठी क्लेम घेतलेला आहे. त्याच कारणासाठी तुम्ही पुन्हा क्लेम रिस्टोर बेनिफिट मधून घेऊ शकत नाही. तर शक्यतो अशा पॉलिसी अवॉईड करा. ज्या पॉलिसीमध्ये रिस्टोर बेनिफिट तुम्हाला कोणत्याही आजारासाठी वापरता येतो. त्या पॉलिसी तुम्ही निवडू शकता.

पुढचा मुद्दा जो तुम्हाला बघायचं आहे, तो आहे एन सी बी. म्हणजे नो क्लेम बोनस. तुमची पॉलिसी किती एनसीबी, किती नो क्लेम बोनस देते, ते नक्की चेक करा. नो क्लेम बोनस मध्ये नक्की होते काय? जर एखादा वर्षांमध्ये तुम्ही कोणताही क्लेम घेतला नाही. तर त्याच्या पुढील वर्षात तुम्हला तुमचा सम इन्श्युर पुढे वाढून मिळतो. तो किती वाढून मिळतो हे तुमच्या पॉलिसी वर डिपेंड आहे. अनेक पॉलिसीमध्ये १०%, २०% ते ५० टक्के पर्यंत एनसीबी असतात. आणि हा एनसीबी अप टू शंभर टक्के. कप टू दोनशे टक्के पर्यंत वाढत जातो. तर ज्या पॉलिसी मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एन सी बी मिळते, ती पॉलिसी तुम्ही निवडू शकता.

नंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वेटींग पिरेड चा. आपण मेडिक्लेम पॉलिसी का घेतो? की आपल्याला जर हॉस्पिटलाईज व्हावे लागलं, किंवा आपल्या फॅमिली मेंबरला जर हॅस्पिटलाईज व्हावे लागलं. तर त्या हॉस्पिटल चा खर्च आपल्याला कंपनीद्वारे मिळेल. पण पॉलिसी घेताना एकदा नक्की चेक करा, की पॉलिसी मध्ये वेग वेगळा आजारासाठी वेटिंग पिरेड किती आहे? जर तुम्ही फ्रेश पॉलिसी घ्याल. तर प्रत्येक पॉलिसी च्या आय आर डी ए च्या रूल नुसार तीस दिवसाचा ईनिशियल वेटींग पिरेड असतो. तीस दिवसाचा वेटींग पिरेड म्हणजे, या तीस दिवसा मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एक्सीडेंट मुळे आलेले क्लेम मिळतील. इतर कोणतेही आजाराचा क्लेम मिळणार नाही.

त्यानंतर येतं पी इ डी. म्हणजे प्री एक्झिस्टींग डिसीज. जर तुम्हाला एकदा आजार असेल. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशर चा त्रास आहे. तर ह्या गोष्टी त्याच्यात पि ई डी मध्ये गणल्या जातात. पी इ डी आणि त्याच्यापासून असलेला काही कॉम्प्लिकेशन साठी काही वेटींग पिरेड दिला जातो. तर तुम्ही जी पॉलिसी निवडली आहे, त्यामध्ये पि ई डी साठी किती वेटिंग पिरेड आहे? ते नक्की तपासा. ज्या पॉलिसीमध्ये पि ई डी चा वेटींग पिरेड कमी असेल ती पॉलिसी तुम्ही निवडू शकता.

सध्या अनेक कंपन्या तुम्हाला पि ई डी बाय बॅक करण्याचं ऑप्शन देखील देतात. आता पि ई डी बाय बॅक म्हणजे नक्की काय? एखाद्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये समजा तीन वर्षे पि ई डी चा पिरेड असेल. तर तुम्हाला कंपनी ऑप्शन देतं की थोडं अधिकचं प्रीमियम भरून तो पिरेड कमी करु शकता. म्हणजे पी इ डी साठी जे क्लेम आहे. जे तुम्हाला पाच ते सहा वर्षांनंतर लागू होणार होते, ते तुम्ही एका वर्षा नंतर घेऊ शकता. वेटींग पिरेड मध्ये तीसरा महत्वाचा मुद्दा असा, तो म्हणजे स्पेसिफिक डिसीज. प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीमध्ये स्पेसिफिक डिसीज साठी वेगवेगळा वेटींग पिरेड आहे. काही कंपन्या मध्ये तो दोन वर्षे आहे, तीन वर्षे आहे. चार वर्ष आहे.

स्पेसिफिक डिसीज मध्ये तुमचे डोळ्यांचे आजार, किंवा नाक, कान, घसा, या संबंधीत आजार. थायरॉईड सोबत संबंधीत आजार. तसेच स्नायू सोबत संबंधीत आजार येतात. हे सर्व जे स्पेसिफिक डिसीज आहे, त्या डिसीज साठी येणारे क्लेम, हे तुमच्या पॉलिसीमध्ये जो वेटींग पिरेड, स्पेसिफिक डिसीज साठी आहे. तो वेटींग पिरेड संपल्यानंतर दिले जातात. त्यामुळे तुमच्या पॉलिसी मध्ये स्पेसिफिक डिसीज साठी वेटींग पिरेड किती आहे? ते हे एकदा नक्की चेक करा. पॉलिसी मध्ये नक्की कोणत्या स्पेसिफिक डिसीज मेंशन केलेला आहे? त्यासाठी तुम्हाला एकदा पॉलिसी वर्डींग, पॉलिसी घेण्याआधी चेक करावी लागेल. ज्या पॉलिसीमध्ये स्पेसिफिक डीसीज चा पिरेड कमी असेल. ती पॉलिसी तुम्ही निवडू शकता.

पुढचा मुद्दा जो तुम्हाला बघायचा आहे. तो म्हणजे तुमच्या पॉलिसी मध्ये कोणते परमनंट एक्सक्लुजन किंवा जनरल एक्सक्लुजन आहेत. तुम्हाला ह्या एक्सक्लुजन बद्दलची माहिती तुमच्या पॉलिसी वर्डींग मध्ये मिळेल. जनरल एक्सक्लुजन या दोन प्रकारचे असतात. एक मेडिकल आणि नॉन मेडिकल एक्सक्लुजन.

मेडिकल एक्सक्लुजन मध्ये तुमची कॉस्मेटिक सर्जरी किंवा असे आजार जे तुम्हाला जन्मापासून आहेत. किंवा अल्कोहोल आणि ड्रग्स मुळं आलेले क्लेम. तर नॉन मेडिकल एक्सक्लुजन मध्ये येतात मिस्लेनियस चार्जेस. उदाहरणार्थ ऍडमिशन चार्जेस. त्याचबरोबर क्लेम ड्यू टू सेल्फ इंज्युरी, किंवा अटेंप्ड टू सुसाईड. त्याच बरोबर शेवटी तुम्ही चेक कराल की ज्या कंपनीची पॉलीसी तुम्ही घेत आहात. किंवा ज्या कंपनीची पॉलीसी घेण्याचं तुम्ही फायनल केलं आहे.

त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे? ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो सर्वात जास्त असेल. ती कंपनी, त्या कंपनीचि पॉलिसी तुम्ही निवडू शकता. तसेच ती कंपनी क्लेम सेटल करण्यासाठी, टी पी ए चा वापर करत आहे. की त्या कंपनीमध्ये ईन हाऊस क्लेम सेटलमेंट आहे. हे चेक करा. ज्या कंपनीमध्ये इन हाऊस क्लेम सेटलमेंट असेल. ती कंपनी ची पॉलिसी घेणं मी प्रेफर करेल. तर तुम्हाला आता कळलं असेलच की मेडिक्लेम पॉलिसी घेणे आदी तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी तपासून पाहायचे आहेत. आणि त्यानुसार तुम्हाला मेडिक्लेम कोणता घ्यायचा? ते डिसीजन घ्यायचा आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.