आपण जर कोणताही आर्थिक व्यवहार करत असाल तर ही माहिती तुमच्या साठी खूप महत्त्वाची आहे. आपल्याला माहीत च आहे की कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करायला पॅन कार्ड ची गरज भासते पण त्याचा योग्य उपयोग आणि त्याचे नियम काय आहेत हे माहीत करून घेणे आवश्यक आहे.
तुम्ही व्यावसायिक असाल किंवा सरकारी नोकरदार असा, किंवा मग शेतकरी असाल तरी तुमच्या साठी पॅन कार्ड बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आयकर कायदा 1961 च्या सेक्शन 139 Aनुसार एक व्यक्ती एकच पॅन कार्ड काढू शकतो आणि जर तुमच्या कडे एक पेक्षा जास्त पॅन कार्ड असेल आणि ते आयकर विभागाच्या लक्षात आलं तर तुमच्या वर कायदेशीर कारवाई होऊ शकते तसेच 10000 रुपये दंड देखील होऊ शकतो.
महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती कडे एक पेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तो व्यक्ती ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने आयकर विभागाला जमा करू शकता. पॅन कार्ड हे एक युनिक ओळखपत्र आहे आणि ते सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी महत्वाचे मानले जाते. यावर दहा अक्षरी एक आकडा असतो जो आयकर विभागाकडून भेटतो.
पॅन कार्ड आयकर विभाग ऍक्ट 1961 नुसार भारतात पॅन कार्ड लॅमिनेटेड स्वरूपात बनते. जे आयकर विभाग सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांच्या देखरेखीखाली दिले जाते. हा दहा आकडी नंबर सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी महत्वाचा असतो. आता याचे नियम आणि उपयोग जाणून घेऊ: 1.जर तुम्ही एका वर्षात अडीच लाखापेक्षा जास्त व्यवहार करत असाल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
2.एखादा व्यवसाय, संस्थान किंवा कंपनी जिचा टर्न ओवर 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पॅनकार्ड अनिवार्य आहे. 3.10 लाखांपेक्षाही अचल संपत्ती च्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात पॅनकार्ड देणे गरजेचे आहे. 4.2लाखापेक्षा जास्त कुठल्याही वस्तू किंवा सेवांसाठी पॅनकार्ड देणे गरजेचे आहे. 5.आयकर विभागानुसार बँक ड्रॉफ्ट च्या खरेदी साठी, पे ऑर्डर किंवा एक दिवसात 50000 किंवा त्यापेक्षा जास्त बँकर्स चेक देण्यासाठी देखील पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे.
6.आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी पॅन क्रमांकाला बंधनकारक केले आहे. आणि आता रिटर्न भरण्यासाठी आधार आणि पॅनकार्ड लिंक करणे गरजेचे आहे असे केले नसल्यास रिटर्न भरता येणार नाही. 7.जर बाजारपेठेत एखादी गुंतवणूक करायची असेल किंवा एखाद्या कंपनीचे शेयर्स विकत घ्यायचे असल्यास त्यासाठी पॅनकार्ड ची गरज असते. विशेष करून तेव्हा जेव्हा आपण त्या कंपनीला शेयर्स च्या बदल्यात 50000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम द्यायची असते.
8.कंपनीचे डिबेचर आणि बॉण्ड खरेदी साठी देखील पॅनकार्ड बंधनकारक आहे. 9.पोस्ट ऑफिस च्या सेविंग अकाउंट मध्ये 50000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करायची असल्यास पॅन कार्ड बंधनकारक आहे. 10.क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या आवेदनासाठी देखील पॅनकार्ड गरजेचे आहे. 11.1 लाख रुपये पेक्षा जास्त सिक्युरिटीज किंवा म्युच्युअल फंड युनिट खरेदी साठीपॅन कार्ड अनिवार्य आहे. 12.वित्तीय संस्थांमध्ये फिक्स डिपॉझिट किंवा टाइम डिपॉझिट योजनेमध्ये 50000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करायची असेल तर पॅनकार्ड गरजेचे आहे.
13.बँकेतील फिक्स डिपॉसीट, सेविंग अकाउंट, आर डी यातून वार्षिक 10000 पेक्षा जास्त व्याज मिळतअसेल तर बँक त्यावर टी डी एस कापते. जो तुमच्या नावे सरकार जमा होतो, तुमच्याकडे जर पॅनकार्ड असेल तर बँक 10% टी डी एस कापते आणि नसेल तर 20% टी डी एस कापते. 14.कोणत्याही बँकेतून होम लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन घेत असाल तर पॅनकार्ड देणे गरजेचे आहे.
15.दोन चाकी वाहन सोडलं तर चारचाकी व इतर वाहनांच्या खरेदीसाठी पॅनकार्ड देणे गरजेचे आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंट च्या नियमानुसार 2 लाखापेक्षा जास्त किमतीच्या वाहनांच्या खरेदी व विक्री साठी खरेदीदार व विक्रीदार दोघांनीही पॅनकार्ड नोंदवणे बंधनकारक आहे. 16.जर तुम्हाला विदेशदौरा करायचा असेल तर भारतीय करन्सी विदेशी करन्सी मध्ये बदलावी लागते त्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे.
17.परदेशी प्रवासादरम्यान कुठल्याही वेळी 25000 पेक्षा जास्त पेमेंट केल्यास पॅनकार्ड नंबराचा उल्लेख करणे गरजेचे आहे. 18.पॅनकार्ड पुरावा म्हणून भारतात कुठेही वापरू शकतो. 19.त्याचप्रमाणे 5लाख किंवा त्यापेक्षा जास्त कुठल्याही लेन देन साठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. यामध्ये सोन्याचा देखील समावेश होतो. तर ही होती पॅनकार्ड संबंधित माहिती आणि नियम, तुम्ही पण जर असा कोणता व्यवहार करत असाल आणि तुमच्या कडे पॅनकार्ड नसेल तर आत्ताच अर्ज करा आणि पॅनकार्ड काढून घ्या.