नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
टेलिव्हिजन किंवा टिव्ही तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. टेलिव्हिजनला कितीही इडियट बॉक्स म्हणोत, पण तुमचा आमचा दिवस या बॉक्सशिवाय अपुर्ण आहे हेच खरं. सध्या टि व्ही जगतावर वर्चस्व आहे ते प्राईम टाईमचं. त्यातही मालिकांच्या प्राईम टाईमने वरचं स्थान पटकावलं आहे. खरं तर मराठी मालिका हा चर्चेचा वेगळा विषय आहे. पण मालिकेतील कलाकारांना तर खुप प्रसिद्धी मिळते आहे. विशेषत: बाल कलाकार.
मालिकेची गरज किंवा कथानकातील ट्वीस्ट म्हणून अनेकदा बाल कलाकार पटकथेत येतात. पण हे बालकलाकार मालिकेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग बनून जातात. अनेकदा मालिकेला ओळखच या बालकलाकारांमुळे मिळाली. त्यामुळे मालिका संपली तरी या बालकलाकारांच्या अभिनयाची आठवण आवर्जुन काढली जाते. पुढील पैकी तुमचा लाडका बालकलाकार कोणता आवर्जुन सांगा.
लाडू (तुझ्यात जीव रंगला) :
ही मालिका संपली असली तरी गुटगुटीत गोड लाडूला कोण विसरेल बरं? छोट्या पैलवानाची व्यक्तिरेखा साकारलेल्या या लाडूने प्रत्येकाच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.
रमा (स्वामिनी) :
रमाबाई या पेशव्यांच्या सालस आणि त्यागी सुनबाईंच्या लहानपणीची व्यक्तिरेखा साकारणारी सृष्टी कुणाला आठवणार नाही? पहिल्यांदा रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सृष्टी पाहता पाहता मालिकेची नायिका झाली. निरागस पण चुणचुणीत रमाबाई सृष्टीने उत्तम साकारली.
परी (माझी तुझी रेशीमगाठ) :
सध्या लोकप्रिय असलेली बालकलाकार म्हणजे परी. कमी वयात कॅमे-याला समोर जाणा-या परी म्हणजेच मायरा वैकुळने तिचा खास प्रेक्षकवर्ग बनवला आहे. निरागस हावभाव असलेली मायराचा मोठे डायलॉग पाठ करण्याचा आणि ते बोलण्याचा आवाका प्रेक्षकांना थक्क करतो.
टोण्या (देवमाणूस) :
अतरंगी स्वभाव असलेल्या टोण्याची आठवण आली तरी अनेकांच्या चेह-यावर हसू उमटतं. विरल मानेने ही व्यक्तिरेखा अतिशय उत्तम साकारली यात तिळभरही शंका नाही. खोडकर स्वभाव आणि चेह-यावरचा निरागसपणा यामुळे विरल अनेकांच्या आवडीचा बनला आहे. आता तो देवमाणूस मालिकेच्या दुस-या भागातही तितकीच धमाल करेल अशी आशा आहे.
आनंदी (आनंदी हे जग सारे) :
सर्वसामान्य व्यक्तिरेखा साकारणं खुप सोपं असतं. पण एक ऑटिस्टीक (स्वमग्न ) मुलीची व्यक्तिरेखा साकारण्याचं अवघड काम राधा धरणेने सहज केलं. मालिकेतील राधाचा अभिनय अगदी कसलेल्या अभिनेत्रीप्रमाणे सहज होता.
बाळू ( बाळू मामाच्या चांगभलं) :
बाळूमामाच्या नावाने चांगभलं ही मालिका प्रेक्षकांच्या खास आवडीची आहे. समर्थ पाटील याने बाळूमामांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. बाळूमामांचा करारी बाणा समर्थने त्याच्या संयमित अभिनयात सहज साकारला.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.