रिअल लाईफ सिरिअल किलर्सवर बेतलेले हे सिनेमे पाहून उडेल तुमच्याही काळजाचा थरकाप

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

क्राईम स्टोरी टिव्हीवर किंवा मोठ्या पडद्यावर पाहणे अनेकदा मनोरंजनाचा भाग असतो. असे क्राईम थ्रिलर पाहणं आणि सोडून देणं इतकंच आपण नेहमी करत असतो. पण तुम्हाला सांगितलं तर की ही घटना एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडली आहे तर तुमचा त्या कलाकृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून जाईल.

भारतात अनेक सिरिअल किलर्सनी गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून दिली आहे. विशिष्ट मोटीव्ह मनात ठेवून किंवा विकृत लालसेपायी मनात आकस ठेवून खुनासारखा गंभीर गुन्हा करणे हे सदैव निंदनीयच आहे. सिरिअल किलिंगच्या अनेक घटना, गोष्टी गप्पांमधून रंगवून सांगितल्या जातात.

पण सिरिअल किलिंगच्या मागची पार्श्वभूमी समजून घेणं हे अनेकदा थरकाप उडवणारं असतं. अनेकदा या सिरिअल किलर्सची गोष्ट पडद्यावर आणायची इच्छा दिग्दर्शकाची असते. बॉलिवूडनेही असे अनेक सिनेमे दिले आहेत ज्यात या सिरिअल किलर्सचा कारनामा आपला थरकाप उडवतो.

पाहुयात कोणकोणते सिनेमे आहेत हे….

पांच : पुण्यात गाजलेल्या ‘जोशी-अभ्यंकर’ खुन खटल्यावर बेतलेला हा सिनेमा. दिग्दर्शक अनुराग कश्यपने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. पण सेन्सॉरच्या कचाट्यात सापडल्याने हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. या सिनेमात के के मेनन, तेजस्विनी कोल्हापुरे, आदित्य श्रीवास्तव यांच्या मुख्य भूमिका होत्या.

Paanch'

पोशम पा : अंजना गावित, सीमा गावित आणि रेणुका यांनी केलेल्या बालहत्यांमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता. या तिघींच्या क्रुरकृत्यांवर आधारित सिनेमा म्हणजे पोशम पा. माही गिल, सयानी गुप्ता आणि रागिनी खन्ना यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

Posham Pa (2019) - Review, Star Cast, News, Photos | Cinestaan

 

रमन राघव 2.0 : या यादीतील सगळ्यात नवा सिनेमा म्हणजे रमन राघव. रामण्णा या विकृत सिरिअल किलरवर आधारलेला सिनेमा म्हणजे रमन राघव. जवळपास 23 हत्या केल्याचं रामण्णा ने आपल्या जबाबात म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात या हत्यांचा आकडा 40 असल्याचं बोललं जात आहे. रामण्णाची हत्या करण्याची पद्धत इतकी वाईट होती की त्याच्या हत्यांचा कोणीही ठोस साक्षीदार जिवंत नव्हता.

4 Years of Raman Raghav 2.0: Nawazuddin Siddiqui and Vicky Kaushal's spine  chilling act is a winner even today | PINKVILLA

द स्टोनमॅन मर्डर्स: 80 च्या दशकात मुंबईतील हत्याकांडावर हा सिनेमा आधारला आहे. फुटपाथवर झोपलेल्या लोकांची दगडाने ठेचून हत्या या सिरीअल किलरने केली होती. या सिनेमात के के मेनन, अरबाझ खान, विक्रम गोखले यांच्या मुख्य भूमिका होत्या.

The Stoneman Murders Full Movie Online In HD on Hotstar

मै और चार्ल्स : ‘बिकीनी किलर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या चार्ल्स शोभराजच्या जीवनावर हा सिनेमा बेतला आहे. विदेशी पर्यटकांना नशेच्या अंमलाखाली ठेवून त्यांच्या हत्या चार्ल्सने केल्या आहेत. जवळपास 24 लोकांची हत्या चार्ल्सने केली आहे. या सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डा चार्ल्सच्या भूमिकेत दिसतो आहे.

Watch Main Aur Charles Full HD Movie Online on ZEE5

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.