डोक्यात विचारांचा गोंधळ चालू असेल, तर हे ५ उपाय करा ।। अति विचार करायची सवय म्हणजे ओव्हर्थिंकिंग कसे थांबवावे याबद्दल माहिती जाणून घ्या !

प्रवास लोकप्रिय शैक्षणिक

कोणतीही दुःख, कोणतीही समस्या कोणतेही संकट, एवढे मोठे नसते. पण ते तेव्हा मोठे होते, जेव्हा तुमचे मन त्यामध्ये अडकून राहते. जेव्हा तुम्ही सारखा सारखा एकाच गोष्टीचा विचार करता. तसे पाहायला गेले तर ती गोष्ट तुमच्या नियंत्रणाबाहेर असते. पण तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टीबद्दल अखंडपणे विचार करतच राहता. आणि जेवढे तुम्ही एखाद्या समस्या बद्दल विचार कराल ती समस्या तुम्हाला अजून मोठी वाटायला लागते.

आणि जी लोक एका समस्येचा प्रमाणापेक्षा जास्त विचार करतात. त्यांच्या आयुष्यातला सगळा आनंद संपून जातो. आणि काही लोकं तरी एवढी टोकाची भूमिका घेतात की त्यांना असे वाटते की आपण आपले आयुष्यच संपवावे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या गोष्टीवर तुमचे नियंत्रण नाही त्या गोष्टींचा विचार करणे सोडून द्या. या जगात जर कोणी तुम्हाला दुःख देऊ शकते तर ते तुमचे स्वतःचेच विचार आहे.

कोणत्याही गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे, तुमच्या प्रत्येक दुःखाचे मूळ आहे. त्यामुळे अतिविचार करणे थांबवा. तुम्ही सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळू शकत नाही. ज्या गोष्टीवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही त्या गोष्टींना डोक्यातून काढून टाका. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण लोकांना काही परिस्थिती बदलू शकत नाही.

तर आपण आपले विचार बदलू शकतो, आपण आपला दृष्टिकोन बदलू शकतो. ज्या लोकांना अति विचार करायची सवय आहे. जे सतत स्वतःच्या विचारांमुळे टेन्शनमध्ये असतात. त्यांच्यासाठी हे पाच उपाय आहेत, आणि याची पूर्ण खात्री आहे की जे कोणी हे पाच उपाय अमलात आणतील, त्यांचे पूर्ण आयुष्य सुखदायी होईल.

पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला बिझी ठेवा म्हणजे व्यस्त ठेवा: मनामध्ये अति विचार किंवा फालतू विचार त्याच लोकांना येतात जे रिकामे असतात. किंवा ज्यांच्याकडे करायला काहीच नसते. पण जर तुम्ही तुमच्या कामांमध्ये व्यस्त असाल तर तुमचे मन त्या विचारांमध्ये अडकनाराच नाही.

हो पण तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल. एवढे पण व्यस्त होऊ नका की तुमच्या आयुष्यापासून लांब जाल, नात्यापासून लांब जाल. आयुष्यामध्ये तुम्हाला संतुलन राखता आले पाहिजे. माणसाने एकदम रिकामे पण राहू नये, किंवा एकदम व्यस्त पण होऊ नये. म्हणून नेहमी स्वतःला बिझी ठेवा.

पण बिझी फक्त त्याच कामांमध्ये ठेवू नका, जी तुमची जबाबदारी आहे. तुम्ही त्या कामांमध्ये सुद्धा स्वतःला बिझी ठेवा जे करायला तुम्हाला आवडते, जे केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो. म्हणून अति विचार करणे थांबवायचे असेल तर स्वतःला बिझी ठेवा म्हणजे व्यस्त ठेवा.

दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या: ज्या लोकांना अति विचार करायची सवय असते. हळूहळू त्यांचे शरीर खराब व्हायला सुरुवात होते. कारण त्यांना कोणतेच काम करायला मजा येत नाही. त्यांना कोणतेच काम करायला रस वाटत नाही. ते हळू हळू डिप्रेशन मध्ये जातात. आरोग्य हे आयुष्यात सर्वात महत्त्वाचे आहे.

पण अनेक लोकांना ह्या गोष्टीचा अंदाज नसतो. त्यांना माहिती असते की आपल्या आयुष्यात शरीर महत्त्वाची आहे. पण तरीसुद्धा ते शरीराच्या आरोग्यासाठी काहीच करत नाही. पूर्ण दिवस आपण शरिराकडून काम करून घेत असतो. पण शरीरासाठी आपण काय करतो?, आपल्याला वाटतं जो पर्यंत चालल आहे तोपर्यंत चालल आहे. पण असे केल्याने तुमचे शरीर लवकर संपून जाईल.

तुम्हाला समजणार देखील नाही, की कधी तुमच्या शरीराला वेगवेगळे आजार जडतील. तुम्हाला समजणार पण नाही की कधी तुम्हाला एखाद्या मोठ्या आजाराने पकडले आहे. म्हणून आपण आपल्या शरीराच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि फक्त तेव्हाच नाही जेव्हा तुम्हाला काही चिंता आहे किंवा टेन्शन आहे. तुम्ही सवयच लावून द्या कि मला माझ्या शरीराची काळजी घ्यायची आहे, आणि नियमित घ्यायची आहे.

तिसरी गोष्ट आयुष्यामध्ये मोठे ध्येय ठेवा: तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही ध्येय ठेवा, मिशन ठेवा. आणि रोज त्याच्यावर काम करा. कितीही मोठे स्वप्न असू द्या तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न कराल तर तुम्ही नक्कीच ते पूर्ण करू शकाल. हळूहळू का होईना रोज दोन दोन पावले जरी तुम्ही तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न केले तरीही तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचू शकता.

आणि जो माणूस आपल्या ध्येयासाठी काम करतो, आपले लक्ष्य मिळविण्यासाठी काम करतो, त्याला चिंता करण्यासाठी, टेन्शन घेण्यासाठी, अति विचार करण्यासाठी, वेळच नसतो. त्याची सगळे लक्ष त्याच्या ध्येयावर असते. त्याच्या मिशनवर असते.

चौथी गोष्ट ध्यान धारणा करा. मेडिटेशन करा: तुम्हाला अति विचार करणे, चिंता, टेन्शन, यापासून लवकर मुक्ती पाहिजे असेल तर त्याला रामबाण उपाय म्हणजे ध्यान करणे, मेडिटेशन करणे. जो माणूस रोज फक्त दहा मिनिट ध्यान करतो, तो मानसिक दृष्ट्या एकदम कणखर असतो.

अशा लोकांच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले, दुःख आली, तरी ते समस्ये मधून दुःखामधून लवकर बाहेर येतात. कारण ध्यान केल्यामुळे त्यांचे मन स्थिर झालेले असते, शांत झालेले असते. त्यांचा मनावर पूर्ण ताबा असतो आणि कोणत्याही समस्येचे समाधान स्थिर मनाकडे असते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ध्यान धरलेला खूप महत्त्व आहे.

पाचवी गोष्ट कोणावरही कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून राहू नका: हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही कधीही कोणावर अवलंबून राहू नका. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर तुमच्या आयुष्यातल्या आनंदासाठी अवलंबून राहता. तेव्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्याला कंट्रोल करायला सुरुवात करते. कारण तुमचा आनंद आता त्याच्या हातात आहे, तो जेव्हा तुम्हाला आनंद देईल तेव्हा तुम्ही खुश व्हाल.

तो जेव्हा तुम्हाला रडवेल, तेव्हा तुम्ही रडाल. जेव्हा कधी तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहता तेव्हा तुम्ही दुर्बल होता. शक्तिशाली व्यक्ती कधीच कुणावर अवलंबून राहत नाही. आपल्या आयुष्यात नाती, रेलेशनशिप नक्कीच महत्वाचे आहे. त्यांचा तुम्ही मनापासून आदर करा. जर लोक तुमच्यावर अवलंबून असतील तर तुम्हाला कोणीच दुःखी करू शकत नाही.

पण जेव्हा तुम्ही लोकांवर अवलंबून राहायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही कधी आनंदी राहू शकत नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीला तुमच्या आनंदासाठी कारणीभूत म्हणू नका. तुमच्या आनंदाची तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या. परत एकदा त्या पाच गोष्टी आपण पाहुयात.

1. तुम्ही स्वतःला बिझी ठेवा म्हणजे व्यस्त ठेवा. 2. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या. 3.आयुष्यामध्ये मोठे ध्येय ठेवा. 4. ध्यान धारणा करा, मेडीटेशन करा. 5. कोणावरही कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून राहू नका. अति विचार करायची सवय म्हणजे ओव्हर्थिंकिंग कसे थांबवावे याबद्दल आज आपण माहिती घेतली. माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.