जे लोकं लहान लहान गोष्टींवर रडायला लागतात, खूप इमोशनल होऊन जातात. कधी कधी तर कारण नसतानाही ते रडायला लागतात. आणि कधी कधी तर आपल्याला समजतच नाही की हे रडत का आहे? आणि अशा काही कारणांमुळे आपला बर्याचदा गैरसमज होतो. की जे लोक खूप इमोशनल असतात. लहान लहान गोष्टी रडायला लागतात. ते विक असतात. कमजोर असतात पण नाही. अशा लोकांमध्ये खूप सार्या विशेषता असतात ज्या विशेषता जे व्यक्ती स्वतः कणखर समजतात खूप शक्तिशाली, ताकदवान समजतात त्यांच्यामध्ये ही अशा विशेषता नसतात.
इमोशनल लोकांमध्ये कोणत्या विशेषता असतात ? इमोशनल लोकांची पहिली विशेषता आहे, सिक्स सेन्स. हो म्हणजे ना जास्तीचं ज्ञान असतं. जर यांच्यासोबत एखादी घटना घडणार असेल. तर त्यांना ती आधीपासूनच समजून जाते. जर यांच्यासोबत काही तरी चांगलं घडणार असेल, तर आधीच त्यांना तशी फिलिंग व्हायला लागते. की काहीतरी चांगलं होणार आहे. आणि जर वाईट होणार असेल तर त्याची जाणीवही यांना होऊन जाते.
जर तुम्हाला एखादं काम करायचं असेल. आणि तुम्ही त्यात कन्फ्युज असाल, की करू की नको तर अशा लोकांना जाऊन विचारा. त्यांच्याकडून सल्ला घ्या. ते निश्चितच तुम्हाला योग्य पर्याय सांगतील. हा इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक इमोशनल व्यक्ती तुम्हाला बरोबरच सल्ला देईल असं नाही. कारण इमोशनल असण्या सोबत बुद्धिमान असनं ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
पुढची विशेषता आहे. जर तुम्ही या इमोशनल लोकांचं थोडं फार ही काहीतरी काम केलं. यांची थोडीफार मदत केली तर ते खूप खुश होऊन जातात. तुमच्या लहानशा कामाचे उपकार हे जीवनभर आयुष्यभर विसरत नाही. तुम्ही काहीतरी लहानशी केलेली मदत यांना खूप मोठी वाटते. कधीकधी तर तुम्हाला प्रश्न पडेल की मी असं काय केलं? की हा एवढा आनंद होतोय. तुमच्या केलेल्या मदतीचे उपकार ते आयुष्यभर विसरत नाही.
त्याच्या बदल्यात ते काहीही करायला तयार असतात. तुमची कुठलीही मदत करायला ते तयार असतात. पुढची विशेषता. जे लोक लहान-लहान गोष्टी वर रडतात. या लोकांची थोडीफार तुम्ही तारीफ करा. हे लगेच खुश होऊन जातील. तुम्ही यांना काही तरी बोला, की आज तू खूप सुंदर दिसत आहे. बस यांचा दिवस झाले समजा. त्यांना स्वर्गात गेल्यासारखे आनंद होतो. दिवसभर ते तेच विचार करत राहतील.
कि यार आज मी खरच सुंदर दिसतोय दिसतेय ! यांची जर कुणी तारीफ केली यांची वाहवा केली, प्रशंसा केली तर ते खूप आनंदित होतात. जर तुम्हाला कोणत्या ही इमोशनल व्यक्तीकडून तुमचं काम काढून घ्यायचा असेल. काम करून घ्यायचं असेल. तर तुम्ही त्याची फक्त तारीफ करा.
बस मग तुमचं काम झालं समजा. करण यांची जो तारीफ करतो, प्रशंसा करतो. ते त्या व्यक्तीला कधीच विसरत नाही. हा पण यामध्ये त्यांची एक निगेटिव्ह गोष्ट सुद्धा आहे. जर यांना कोणी निगेटिव्ह बोललं, चुकीचं बोललं. तर तेही ते खूप मनावर घेतात. त्या लहानशा गोष्टीवर ही ते खूप रडायला लागतात. खूप विचार करतात. आणि त्या व्यक्तीला सुद्धा ते कधीच विसरत नाहीत.
पुढची विशेषता आहे जे व्यक्ती इमोशनल असतात. त्यांना स्वतःबद्दल पूर्ण ज्ञान असतं. त्यांना सगळं माहीत असते, की ती स्वतः कसे आहेत. स्वतःचा स्वभाव कसा आहे आणि याच विशेषता मुळे ते कोणाचाही स्वभाव लगेच ओळखतात. तुम्ही अशा लोकांशी पाच मिनिटे बोलून बघा. ते तुम्हाला पूर्णपणे ओळखून घेतील. की तुम्ही कसे आहात? तुमचा स्वभाव कसा आहे? तुमची वागणूक कशी आहे? म्हणून अशा व्यक्तीशी बोलताना थोडासा विचार करूनच बोलायचं.
कारण जर तुम्ही या व्यक्तींना काही तरी ज्ञान देत असाल, किंवा त्यांच्याच विषयी काहीतरी सांगत असाल. की तू असं कर, असं करू नको. तर त्याचा काहीच फायदा नाही. कारण त्यांना आधीपासूनच त्यांच्याबद्दल सगळं ज्ञान असतं. ते त्या वेळेस तुमचं सगळं ऐकून घेतील. पण मनातल्या मनात विचार करत राहतील. की अरे राज्या माहिती मला सगळं टेल मी समथिंग आय डोन्ट नो. जे मला माहित नाही ते सांग. हा पण ते तुम्हाला काहीतरी वाईट वाटेल. असं काहीच आणि कधीच बोलणार नाहीत.
नेक्स्ट विशेषता आहे. या लोकांना दुसर्यासोबत वाईट होत असताना बघितलं जात नाही. ऐकलं सुद्धा जात नाही. घरी कुठे रस्त्याने जात आहेत. आणि काही तरी दिसलं की कोणासोबत अत्याचार होतोय. काही तरी कोणी तरी वाईट करते आहे. तर यांच्याकडून ते बघितलं जात नाही. कुणाची भांडण चालू असेल तर तेही त्यांच्याकडून बघितले जात नाही. शक्य असेल तर ती भांडणं, कोणाच्या किंवा कोणावरी होणारा अत्याचार ते थांबवण्याचा प्रयत्नही करतात.
पण त्यानंतरही ते खूप विचार करत असतात. दोन-तीन दिवस त्याच्या मनात ते विचार चालूच असतात. एकदाचं ज्या व्यक्तीवर अत्याचार होत होता तो आनंदित राहायला लागतो. पण हे अजूनही दुःखातच असतात. जर यांनी एखादा पिक्चर पाहिला. त्यात शेवटी एखादा हिरो मरून जातो. तरी त्याचा ही त्यांना खूप वाईट वाटतं. समजा यांनी बाहुबली पिक्चर पाहिला. त्यात शेवटी बाहुबली मरून जातो.
त्याचा ही ते खूप विचार करतील. की का मेला? मारायला नको होता. एवढा चांगला राजा होता. खूप दिवस त्याच गोष्टीचा विचार करून ते स्वतः ला दुःखी करत असतात. अक्षरशः बाहुबली म्हणजे प्रभास स्वतःहून येऊन जर यांना म्हणाला ना, की अरे मी जिवंत आहे. नको रडू एवढा. तो फक्त एक पिक्चर होता. तरी सुद्धा यांना ते खरे वाटणार नाही. तर बाहुबली पिक्चर मध्ये मेला आहे. तर तो पिक्चर मध्येच जिवंत व्हायला हवा. असं यांना वाटतं.
पुढची विशेषता आहे. तुम्हाला जर कधी कोणाकडून सल्ला घ्यायचा असेल ना. तर या इमोशनल लोकांकडून घ्या. कारण हे कधीही चांगला सल्ला देतात. सल्ला म्हणजे काय? जे आपल्यासाठी खरच योग्य असेल. असं कुणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणं. आपल्याला सांगणं. आणि हे काम हे इमोशनल व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने करतात. नाही तर बाकीचे आपले मित्र किंवा आपले ओळखीचे आपल्याला कसे सल्ला देतात.
फक्त आपल्याला छान वाटण्यासाठी. आपण आनंदी होण्यासाठी, आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी सांगतील. पॉझिटिव्ह गोष्टी सांगतील. वाईट गोष्टींशी आपली ते ओळख करूनच देणार नाही. पण याला सल्ला नाही म्हणत. सल्ला तो असतो ज्यात आपले चांगले गुणही सांगितले जातात. आणि आपल्यात काय वाईट गुण आहेत ते सुद्धा सांगितले जातात. आपल्याला एकच काम करायचं असेल, त्या कामातल्या पॉझिटिव्ह आणि त्याच सोबत नेगेटिव्ह साइड सुद्धा सांगितले जातात. याला खरे ऍडवाईज म्हणतात. आणि ही ॲडव्हाइस हे ईमोशनल खूप चांगल्या पद्धतीने देतात.
पुढची आणी खूप महत्त्वाची विशेषता म्हणजेच. इमोशनल व्यक्ती खूप क्रिएटिव असतात. लहान लहान गोष्टी मध्ये खूप काही विचार करतात. जी गोष्ट आपल्यासाठी खूप नॉर्मल असेल. त्यात त्यांना खूप काही मोठे वाटतं. उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही आणि तुमचा एखादा इमोशनल मित्र रात्री टेरेस वर बसले आहात. आणि चंद्राला बघत आहात. तर तुमच्यासाठी तोच चंद्र म्हणजे फक्त साधं चंद्र असेल.
पण त्या तुमच्या इमोशनल मित्रासाठी तो काहीतरी मोठा चमत्कार असेल. तो त्या चंद्राकडे बघून ही एवढे मोठे विचार करत बसेल. आणि तुमच्याशी चर्चा करत बसेल. तुम्ही विचार कराल की यात एवढं चर्चा करण्यासारखं काय होतं? चंद्र तर चंद्र असतो. पण नाही. त्यांच्यासाठी ते खुप काही मोठी गोष्ट असते. दोघांच्या विचारांमध्ये. हे कोणत्याही गोष्टीला लहान-सहान गोष्टींना एका वेगळ्या अँगलने बघण्याचा प्रयत्न करतात.
इमोशनल लोकांचा हाच क्रिएटिव्ह पणा त्यांना लोकांपेक्षा वेगळे करतो. आणि आयुष्यात त्यांना खूप पुढे घेऊन जातो. जे लोक इमोशनल असतात. ते कधीच काही बोलायला घाबरत नाही. त्यांचे जे मनात असतं ना, ते डायरेक्ट बोलतात. त्यांना काही फरक नाही पडत की समोरच्या व्यक्तीत काय विचार करेल. पण समोरच्याला वाईट वाटेल असते कधी बोलतच नाही. एकदा जर समोरचा व्यक्ती त्यांना वेड्यात काढेल. काहीतरी वाईट समजेल असं काहीतरी बोलतील. पण समोरच्याला त्रास होईल असं कधीच बोलणार नाही. आणि वागणार सुद्धा नाहीत.
आता सगळ्यात शेवटचा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट. म्हणजे जे इमोशनल व्यक्ती असतात, ते खूप खूप म्हणजे खूपच मेहनती असतात. हार्ड वर्किंग असतात. त्यांना आयुष्य जे काही बनायचं असतं. जे ही मिळवायचं असतं. ते मिळवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. खूप मेहनत घेतात. हो पण अडचणी खूप येतात त्यांच्या आयुष्यात. पण त्यांच्या मेहनती पुढे, त्यांच्या प्रयत्नांना पुढे ती अडचण, ते संकट हार मानतात.
म्हणून जर तुम्ही इमोशनस असाल ना, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी हार मान्य आधी तुम्ही हार मानू नका. आपल्याला खूपदा सांगितले जाते की इमोशनल असनं, म्हणजे कमजोर असनं. विक असनं. पण नाही. इमोशनल आणि कमजोर याचा काही संबंध येत नाही. इमोशनल म्हणजे इमोशन जास्त असणारा. आपल्यामध्ये संवेदना जास्त असणार. लहान-सहान गोष्टींना बघून आपल्यामध्ये इतरांपेक्षा जास्त संवेदना येतात.
जास्त इमोशन येतात. पण तेवढ्याच अर्थ आहे. याचा आणि कमजोरीचा विकणेस चा काहीच संबंध नाही. आणि उलट जो जास्त इमोशनल असतो. तो जास्त रडतो. आणि तो तेवढ्याच आतून हलका होत असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून जर तुम्ही इमोशनल असाल तर अभिमानाने सांगा की हो मी इमोशनल आहे. आणि स्वतःला शाबासकी द्या.
वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.