नोटरी विषयी १० प्रश्नांची थोडक्यात उत्तरे ।। नोटरी म्हणजे काय? ।। नोटरी वकील काय काय कामे करू शकतात? ।। साधी नोटरी अणि रजिस्टर नोटरी मध्ये काय फरक आहे? ।। सही करणारी एक व्यक्ती भारतात आणि दुसरी व्यक्ती भारताबाहेर असेल तर नोटरी कशी करणार? आणि असेच महत्वाचे प्रश्न !

नमस्कार आज आपण नोटरी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रहो आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी कुठल्यातरी डॉक्यूमेंट हे नोटरी करून घ्यावच लागते आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच कधी ना कधी कोर्ट कचेरी आवारात गेला असाल तर नोटरीबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत !

१.नोटरी म्हणजे काय?: मित्रांनो नोटरी करणारे हे वकिलच असतात. इच्छुक वकिल त्यांना नोटरी म्हणून काम करता यावं यासाठी सरकारला अर्ज करतात. आणि त्यासाठी पात्रता निकष सुद्धा पूर्ण कराव्या लागतात. सरकारने त्यांचा अर्ज मान्य केला कि सरकार त्यांना नोटरी म्हणून काम करण्यासाठी एक सर्टीफिकेट देते. जे पाच वर्षासाठी वैध असतं. दर पाच वर्षाने ते सर्टीफिकेट रिन्यू करावं लागते. मित्र वकील लोकांसाठी ऍडव्होकेट ऍक्ट आहे तसेच नोटरी लोकांसाठी नोटरी ऍक्ट आहे. नोटरी वकिलांना नोटरी ऍक्ट आणि नोटरी रूल्स अंतर्गता नुसारच काम करावं लागते.

२.नोटरी वकील काय काय कामे करू शकतात ?: नोटरी ऍक्ट अंतर्गत काय काय कामे करू शकतात याची एक यादीच दिलेली आहे. पण त्याच्या तपशीलात न जाता आपल्याला कुठल्या कामासाठी नोटरीची गरज पडते ते जरा आपण पाहून घेऊयात. – कागदपत्रांवर नोटरी करून घेणे.

रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत काही डॉक्यूमेंट चे आपल्याला रजिस्टर करणे गरजेचे असते. पण जे डॉक्यूमेंट रजिस्टर करणे गरजेचे नसते ती शक्यतो नोटरी केली जातात. आता कागदपत्र नोटरी करून घेणे म्हणजे नेमके काय करणे ती प्रोसेस काय आहे ते जरा आपण समजून घेऊयात आणि त्यासाठी अपण नहमी प्रमाणे उदा. घेऊयात. समजा तुम्हाला तुमची विवाहाची नोंदणी करायची आहे.

त्यासाठी नवरा आणि बायकोला अर्ज करावा लागतो आणि त्यासोबत त्यांना एक ऍफेडेव्हिट शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर करावा लागतो. या ऍफेडेव्हिट मधे त्यांना नवरा आणि बायकोचं नाव, त्यांचा पत्ता, त्यांचा रोजगार, त्यांची जन्मतारीख, त्यांचे लग्न कधी झाले, कुठे झाले हा सगळा तपशील द्यावा लागतो. त्याच बरोबर लग्नाचा फोटो सुद्धा जोडावा लागतो.

हे ऍफेडेव्हिट नोटरी करून घ्यावं लागतं. आता वकील तुम्हाला हे ऍफेडेव्हिट बनवून दर देईल. पण त्यानंतर या ऍफेडेव्हिट ला तुम्हाला नोटरी वकीलाकडे घेऊन जावं लागते. मग नोटरी वकीलांकडे तुम्ही ऍफेडेव्हिट घेऊन गेलात की नोटरी वकील त्यांचं रजिस्टर मध्ये या ऍफेडेव्हिट ची नोंद करतात. म्हणजे ते काय करतात.

ते हे ऍफेडेव्हिट कुठल्या तारखेला केला आहे, ते कुठल्या कारणासाठी आहे आणि हे ऍफेडेव्हिट कोण सही करणार आहे त्यांचे नाव, पत्ते आणि त्यांचे फोटो आयडी प्रूफ याच्या बद्दल सुद्धा लिहून घेतात. म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर किंवा तुमचा लाइसेंस नंबर किंवा तुमचा पासपोर्ट नंबर हे तपशील सुद्धा ते रजिस्टर मध्ये लिहितात.

मग त्या रजिस्टर वर ते नवरा बायकोची सही घेतात. आणि रजिस्टर मध्ये सही झाल्यानंतर ऍफेडेव्हिट वर सुद्धा नवरा बायकोची सही घेतात. हे सगळं नोटरी स्वतः च्या डोळ्यांनी पाहतात. त्यानंतर नोटरीचं काम चालू होतं. मग ते ऍफेडेव्हिट वर स्वतःचे शिक्के आणि स्टॅम्प चिटकवतात. यानंतर समक्ष मी (before me) असं लिहून ते ऍफेडेव्हिट वर सही करतात.

आणि यानंतर एक महत्वाचं काम मित्रांनो त्यांनी रजिस्टर मधे ही सर्व एंट्री केलेली आहेत. ती एंट्री त्याने कुठल्या पानावर केली आहे, कुठल्या सीरीयल नंबरवर केली आहे, तारीख काय आहे हे सगळे तपशील सुद्धा ते तुमच्या ऍफेडेव्हिट वर लिहितात. यालाच म्हणतात रजिस्टरड नोटरी करणे. ही सगळी प्रोसेस पूर्ण झाली की तुमचं ऍफेडेव्हिट रजिस्टरड नोटरी झाले असं म्हणले जाते.

-डॉक्यूमेंट च्या सर्टीफाईड ट्रू कॉपी देणं. मित्रांना कधीकधी आपल्याला डॉक्यूमेंट च्या सर्टीफाईड कॉपीज सबमिट कराव्या लागतात. मग अशावेळी नोटरी आपल्याला ही डॉक्यूमेंट ची कॉपी सत्यप्रत आहे असं सर्टिफाय करून देतात. -सर्टीफाईड थ्रू ट्रान्सलेशन म्हणजेच सत्य भाषांतर देणं. मित्रांनो कधी कधी काही कागदपत्रांचे भाषांतर तुम्हाला ऍथॉरिटी ला सबमिट करावे लागतात.

उदाः तुम्हाला जर वीजा करायचा असेल तर त्यासाठी बरेच डॉक्यूमेंट चे भाषांतर तुम्हाला द्यावे लागतात. अशा नोटरी चे ट्रान्सलेशन तुम्हाला करावे लागतात. अशा वेळी योग्य ते ट्रान्सलेशन करू शकतात आणि ते ट्रान्सलेशन ट्रू ट्रान्सलेशन मध्ये सत्य भाषांतर अशा प्रमाणे करू शकता.

३.साधी नोटरी अणि रजिस्टर नोटरी मध्ये काय फरक आहे?: मित्रांनो नोटरी ही कायम रजिस्टरच असते. साधी नोटरी असा काही वेगळा प्रकार नसतो. मी तुम्हाला नोटऱ्यांची पूर्ण प्रोसेस समजावली. ज्यामध्ये नोटरी वकील आपल्या रजिस्टर मध्ये सगळी एन्ट्री करतात आणि त्यानंतर डॉक्यूमेंट वर सुद्धा रजिस्टर या पान नंबर, सिरीयल नंबर, तारीख हे सगळे लिहून सही करतात.

ही असते रजिस्टर नोटरी आणि नोटरी करण्याची योग्य पद्धत. पण मग साधी नोटरी म्हणजे काय की साधा नोटरी मध्ये डॉक्यूमेंट वर नोटरीचा शिक्का, स्टॅम्प आणि सही असते पण रजिस्टर चे तपशील च नसतात. म्हणजे त्यावर रजिस्टर चे पान नंबर, सीरीयल नंबर, तारीख असे काहीही नसते.

मग या परिस्थिती मध्ये काय होते मित्रांनो माहिती आहे का .. ज्या व्यक्तीने सही केलेली आहे ना डॉक्यूमेंट वर ती व्यक्ती नोटरी समोर प्रत्यक्ष हजरच नाही आहे. त्यामुळे नोटरीच्या रजिस्टर मध्ये ती व्यक्तीने सही केलेली नाही म्हणूनच रजिस्टर चे तपशील नोटरी वकीलाने डॉक्यूमेंट वर दिलेले नाही. आणि याला साधी नोटरी असं म्हणटलं जातं. पण मित्रांनो अशी नोटरी पूर्णपणे चुकीची नोटरी आहे. त्यामुळे कधीही अशा प्रकारच्या नोटरीसाठी जाऊ नका. त्यानंतर नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे.

४.नोटरी वकील घरी येतात का?: हो. नोटरी वकील तुमच्या घरी येऊन सुद्धा डॉक्यूमेंट नोटरी करू शकतात. पण त्यासाठी त्यांचे जे काही ट्रॅव्हलिंग चार्जेस असतील ते तुम्हाला एक्सट्रा पे करावे लागतात . त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. ५.नोटरी करताना स्टॅम्प पेपर लागतो का?: तर मित्रांनो, तुमचा डॉक्यूमेंट कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे.

म्हणजे उदा :- काही डॉक्यूमेंट साठी स्टॅम्प पेपर आवश्यक असतो. आणि काहींसाठी नसतो. जसे की जर तुम्हाला बॉण्ड बनवायचा आहे तर त्यासाठी ५०० रू. चा स्टॅम्प पेपर हा लागतोच . जर ऍफेडेव्हिट बनवायचे असेल तर १०० रु . चा स्टॅम्प पेपर लागतो . पण समजा जर का तुमचं कागदपत्र कोर्टामध्ये दाखल करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला वेगळ्या स्टॅम्प पेपर ची गरज नसते कारण तुम्ही कोर्ट फी दिलेली असते. मग अशावेळी कोर्टामध्ये सबमिट करण्याचे कागदपत्र ही एका ग्रीन पेपरवर प्रिंट करून नोटरी केली जाते. त्यासाठी स्टॅम्प पेपर ची आवश्यकता नसते.

६.नोटरी करताना फोटो आणि अंगठ्याचा ठसा लागतो का?: याचे देखील तसेच आहे की तुमचे डॉक्यूमेंट कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. समजा तुम्ही वडिलोपार्जीत मालमत्ते मधला हक्क सोडत आहात. त्यासाठी तुम्हाला रिलीस डीड करावे लागते. अणि हे रिलीस डीड रजिस्टर करावे लागते.

त्यासाठी तुम्हाला एक लीगल वारसदार ऍफेडेव्हिट जोडावं लागतं. म्हणजेच कायदेशीर वारसदाराचे प्रतिज्ञापत्र. त्यासाठी सुद्धा जे कोणी तुमचे लीगल हेअर म्हणजे वारसदार आहे, त्याचा फोटो, अंगठ्याचा ठसा आणि सही घेतली जाते. अशा प्रकारे तुमचा डॉक्यूमेंट कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून असतं की तुम्हाला फोटो अणि अंगठ्याचा ठसा लागेल का नाही.

७.ज्या व्यक्तीला कागदपत्रावर सही करायची आहे ती व्यक्ती भारताबाहेर असेल तर तिथे नोटरी करता येते का? अशी नोटरी भारतात गाह्य धरली जाते का?: तर मित्रांनो याचे उत्तर स्पष्टपणे हो असे आहे. ज्या पद्धतीने भारतामध्ये नोटरी पद्धत आहे तसेच बाकीच्या देशांमध्ये सुद्धा नोटरी वकील आहे आणि तिथे केलेली नोटरी ही भारतामध्ये गाह्य धरली जाते.

यासाठी एका केसचं उदा घेऊ. यामध्ये आई ही मुंबईमध्ये राहत होती आणि मुलगी सिंगपूरला राहत होती. आईच्या मृत्युपशच्यात आईची मालमत्ता मुलीच्या नावावर करण्यासाठी बॉम्बे हाय कोर्टामध्ये दाखल केले. त्यासाठी पेटीशन इथे मुंबईत बनवून घेतलं आणि मग कुरीयर ने सिंगापूरला पाठवला.

सिंगापुरला राहणाऱ्या मुलीने तिथल्या नोटरी समोर सही केले आणि मग ते पुन्हा कुरीयर ने पाठवले जे बॉम्बे हाय कोर्टामध्ये सादर केले गेले. अशा पद्धतीने बाहेर नोटरी करता येते अणि भारतामध्ये ती गाह्य ठरली जाते. जसे आता हे नोटरीयल सर्टीफिकेट आहे जे सिंगापुरच्या नोटरी अडव्होकेट ने दिले आहे. भारतामध्ये असे वेगळे सर्टीफिकेट दिले जात नाही. पण सिंगापुरला तशी पद्धत आहे.

८.सही करणारी एक व्यक्ती भारतात आणि दुसरी व्यक्ती भारताबाहेर असेल तर नोटरी कशी करणार?: बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही की एकच डॉक्यूमेंट आपण दोन वेगवेगळ्या देशांमध्यो दोन वेळा नोटरी करू शकतो म्हणजे जर डॉक्यूमेंट वर सही करणाऱ्या काही व्यक्ती भारतात असतील तर ते भारतातील नोटरी समोर सही करतील ते डॉक्यूमेंट एकदा भारतामध्ये नोटरी होईल.

मग तेच डॉक्यूमेंट तुम्ही दुसऱ्या देशामध्ये पाठवू शकता. तिथे असणारे व्यक्ती तिथल्या नोटरी समोर सही करतील आणि ते डॉक्यूमेंट तिकडे दुसऱ्यांना नोटरी होईल मग ते पुन्हा भारतात आल्यानंतर, भारतामध्ये कोर्ट केसेस साठी तुम्ही ते डॉक्यूमेंट वापरू शकता.

९.नोटरी आणि रजिस्ट्रेशन मध्ये काय फरक आहे?: मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेला की रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत कोणते डॉक्यूमेंट रजिस्टर करावे लागतात ते दिलेले आहे. उदाः – तुमच्या स्थावर मालमत्तेचे डॉक्यूमेंट जसे की तुमच्या फ्लॅटचा अग्रीमॅट फॉर सेल किंवा सेल डीड किंवा बक्षीसपत्र हे सर्व तुम्हाला रजिस्टर करावं लागते.

त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस, स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. डॉक्यूमेंट रजिस्टर करून घेण्यासाठी तुम्हाला सब-रजिस्टर च्या ऑफिस मध्ये अपाँटमेंट घेऊन जावं लागते. आणि ही प्रोसेस तुम्हाला रजिस्ट्रेशन एजंट च्या मदतीने पूर्ण करावी लागते. नोटरीसाठी नोटरी वकीलांच्या कार्यालयात जावं लागते किंवा ते आपल्या घरी सुद्धा येतात. आणि नोटरी करून घेणे हे रजिस्ट्रेशन करण्यापेक्षा सहज आणि सोपं आहे. परंतु तरीसुद्धा जे डॉक्यूमेंट रजिस्टर करावे लागतात ते रजिस्टरच करावी लागतात. त्यांना नोटरी हा पर्याय असू शकत नाही.

१०.नोटरी करण्याला काही पर्याय आहे का?: याचे उत्तर तुमचं डॉक्यूमेंट कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे समजा तुमची कोर्ट केस पेंडींग आहे आणि तुम्हाला एखादा डॉक्यूमेंट कोर्टामध्ये सबमिट करायचे आहे. तर त्याला तुम्ही नोटरी करण्या व्यतीरिक्त अजून एक पर्याय म्हणजे अफेरमेशन करू शकता.

तर आता हे अफेरमेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. मित्रांनो अफेरमेशन काढण्यासाठी तुम्हाला त्या कोर्टामध्ये जावे लागते. म्हणजे हाय कोर्टात मॅटर असेल तर हाय कोर्टात आणि सिटी सिविल कोर्टात असेल तर तिकडे जावे लागते. प्रत्येक कोर्टामध्ये काही सेक्शन ऑफिसर किंवा असोसिएट ऑफिसर असतात. त्यांच्या समोर जाऊन तुम्हाला सही करावी लागते.

जे काम नोटरीवरती बाहेर करतात तेच काम सेक्शन ऑफिसर कोर्टामध्ये करतात. आणि अफेरमेशन करून घेणे निःशुल्क असते. पण तुम्हाला तुमचा फोटो आयडी प्रूफ जसे की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसंस नंबर किंवा पासपोर्ट नंबर हे तुम्हाला त्या सेक्शन ऑफिसर ला सुद्धा दाखवायला लागणार.

हा पर्याय तुम्हाला फक्त कोर्टमध्ये पेपर दाखल करायचा आहे यासाठीच आहे. दुसरे ऍफेडेव्हिट किवा बॉंड साठी नाही. तर मित्रांनो आपण आज नोटरीविषयी १० अशा गोष्टी पहिल्या कि ज्या प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात नेहमी असतात. तुम्हाला आम्ही देत असलेली माहिती कशी वाटते ते कमेंट मध्ये कळवा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

3 thoughts on “नोटरी विषयी १० प्रश्नांची थोडक्यात उत्तरे ।। नोटरी म्हणजे काय? ।। नोटरी वकील काय काय कामे करू शकतात? ।। साधी नोटरी अणि रजिस्टर नोटरी मध्ये काय फरक आहे? ।। सही करणारी एक व्यक्ती भारतात आणि दुसरी व्यक्ती भारताबाहेर असेल तर नोटरी कशी करणार? आणि असेच महत्वाचे प्रश्न !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *