विदेशात जायचे स्वप्न आहे मात्र पैशाचा विचार करून स्वप्न सत्यात उतरवता येत नाही? तर आजचा लेख तुमच्यासाठीच आहे. जाणून घ्या कमी खर्चात फिरता येण्यासारखे देश जिथे भारतीय रुपया जास्त मौल्यवान आहे !

प्रवास लोकप्रिय शैक्षणिक

मित्रांनो आपण भारतीयांची नेहमीच एक स्वप्न असते. की एक ना एक वेळेस विदेशी सफर जरूर करू. मग ते बायको सोबत फिरायला जाणे असो किंवा मित्रांसोबत फिरायला जाणं असो. परंतु पैशाची कमी म्हणा किंवा कमी खर्चाची सवय आपण सर्व विदेशी फिरायला जाण्याच्या नावाने घाबरतो. कारण त्या ठिकाणी जाणं आणि त्याचा विचार करणं ही एक गोष्ट आहे. आणि तेथील खर्च सांभाळणं, ही दुसरी गोष्ट.

मित्रांनो आपण सर्व जण जाणतो, की बाहेरचे देश अत्यंत महागडी आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू शकतो की दुनियेत काही असे देश सुद्धा आहेत ज्यांचा रुपया भारतीय चलन या पेक्षा खूप कमी आहे आणि या देशांची चलने इतकी कमी आहेत की तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर करोडपती असल्याचा अनुभव येईल. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला दुनियेतील सर्वात स्वस्त आणि सुंदर देशाबद्दल माहिती देणार आहोत. जिथे भारताचा एक रुपया सुद्धा तेथील हजारो रुपयांच्या समान आहे. मित्रांनो सर्वात प्रथम आपण ज्यात देशाबद्दल बोलणार आहोत तो आहे.

व्हियेतनाम: मित्रांनो व्हिएतनाम मध्ये भारतीय मुद्रा राज्य करते. कारण भारतीय शंभर रुपयांची किंमत त्या ठिकाणी एकतीस हजार पाचशे व्हिएतनाम मुद्रा इतकी आहे. म्हणजे एक रुपयाची तुलना तिनशे पंधरा डॉन एवढी आहे. मित्रांनो व्हिएतनाम हा देश साउथ इस्ट कोरियातील अतिशय सुंदर आणि शांत असा देश आहे. जास्त करून पर्यटक या ठिकाणी सुखद क्षण आणि आराम करायला येत असतात.

येथील हुवाई, होलॅंग्वे, हुची शहर यांना पर्यटक जास्त पसंती देतात. फेरफटका मारण्यासाठी हा देश एक उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो या देशाचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी तुम्ही अत्यंत कमी खर्चामध्ये येथील समुद्र, तलाव आणि पाण्यामधील सफारी करू शकता.

व्हिएतनाम मध्ये रूंद असे जंगल आहे. आणि असंख्य नद्या आहेत. त्यामुळे या देशाला पाण्याचा देश सुद्धा म्हटले जातं. मित्रांनो येथील एका महिन्याचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च हा केवळ वीस हजार इतका होऊ शकतो. जर तुम्ही सुद्धा स्वस्ता मध्ये काही वेगळे करू इच्छिता. तर मग तुम्ही व्हिएतनाम मध्ये जाऊ शकता.

पुढील देश आहे इंडोनेशिया: मित्रांनो इंडोनेशिया त्या देशांमधील एक देश आहे जिथे भारतीय मुद्रांची किंमत अधिक आहे. तेथे एक रुपया १९४ इंडोनेशियन मुद्रा एवढा आहे. या व्यतिरिक्त भारतीयांना या ठिकाणी फुकट प्रवेश परवाना व्हिसा दिला जातो. याचा अर्थ या ठिकाणी आपण खर्च कमी करून या देशांमध्ये फिरू शकतो. हा देश आपल्या सुंदर समुद्र किनारपट्टी साठी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.

समुद्रकिनारी असलेले आपले ऐतिहासिक मंदिरे, पारंपारिक नृत्य आणि संगीत, हे दूनिया भरातील पर्यटकांना आकर्षित करत असतात. इंडोनेशियाचा आयलँड बाली, दुनियेतील प्रसिद्ध आयलंड मध्ये एक आहे. आणि तो एक हॉटस्पॉट पर्यटन स्थळ आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. आणि मित्रांनो खर्चाबद्दल बोलणे झाले. तर येथे आठवड्याचा खर्च जेमतेम सव्वीस हजार रुपये इतका येऊ शकतो. आणि विमानसेवा तेरा हजारांपर्यंत उपलब्ध होऊ शकते.

पुढील देश आहे ईरान: मित्रांनो फक्त व्हिएतनाम, इंडोनेशिया देशातच नाही तर इराण सारख्या विकसनशील देशांमध्ये देखील भारतीय रुपया हा खूप मजबूत आहे. तेथे भारतीय एक रुपया पाचशे सत्याहात्तर इराणी यान इतका आहे. इराण ची राजधानी तेहरान सोडले तर येतील असे अनेक शहरे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही फिरू शकता.

जसं की पर्सपोलीस एक ऐतिहासिक वास्तू आहे. नफिरल अल मुलुख आणि अभ्याने. खाणे आणि पिने यामध्ये तुम्ही वीस ते तीस रुपयांमध्ये विश्व प्रसिद्ध इराणी चहा पिऊ शकता. आणि ४३ रुपयांमध्ये इराणी पिझ्झा खाऊ शकता. तुम्हाला ऐकुन आश्चर्य वाटेल. की तुमचा या ठिकाणी आठवड्याभराच्या हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च तीन हजार रुपये इतका येऊ शकतो.

पुढील देश आहे पेरुग्वे: मित्रांनो दक्षिणेकडील मध्यभागी बसलेला हा देश, दुनियातील त्या देशांमध्ये एक आहे. ज्याच्या सिमा समुद्रकिनारी शिवत नाहीत. पेरुग्वे देश प्रकृतीच्या अगदी जवळ आहे. येथे घनदाट जंगल, वर्षावण आणि जंगली जीव, यांचे अनेक प्रकार दुनिया भरातील पर्यटकांना आकर्षित करत असतात.

त्या देशाला दुनियेत खास बनवते अशा गोष्टी आहेत. म्हणजे येथील आयलंड आणि चर्च. या देशात तुम्ही ट्रिपल फ्रॅंटीयर जागेवर जाऊ शकतात. जेथून तुम्ही तीन देश. म्हणजे अर्जेंटिना, ब्राझील आणि पॅराग्वे हे बघू शकता. येथे हॉटेल खूप स्वस्त आहे. तुम्ही या ठिकाणी सात हजार रुपये देऊन एक आठवडा भर राहू शकता. येथील मुद्रा ग्वारानी आहे. आणि येथील भारतीय एक रुपया ९३ प्याराग्वे ग्वारनी इतकी आहे.

पुढील देश आहे कंबोडिया: थायलंड, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांच्या मध्यभागी असलेला हा देश आहे. हा देश आपल्या पारंपारिक वास्तूंसाठी अगदी प्रसिद्ध आहे. कंबोडिया एक अत्यंत सुंदर असा देश आहे. आणि आपल्या मन भारावून टाकणाऱ्या ठिकाणासाठी तो खूप प्रसिद्ध आहे. तेथील प्रसिद्ध स्थळांमध्ये अंघोर वाट मंदिर, न्हहोग, पेन्ह, कॅडमोम माउंटन आणि कोहरोग स्यमलोग हे समाविष्ट आहे.

येथे भरपूर लोक जात असतात. आणि त्यामध्ये सर्वात जास्त लोक हे भारतातून जातात. याचे सर्वात मोठे कारण आहे. की या ठिकाणी एक भारतीय रुपया पंचावन्न कंबोडियन यॉंग इतकं आहे. तुम्ही जर कंबोडिया फिरवू इच्छित आहात. तर मग तुम्ही अठावीस हजार रुपयांमध्ये याठिकाणी फिरू शकता. ज्यामध्ये तुमचे राहण्याचे, खाण्याचे आणि प्रवासाचे खर्च सर्व काही समाविष्ट आहे.

पुढील देश आहे मंगोलिया: मित्रांनो मंगोलिया चे नाव ऐकताच डोक्यामध्ये पहिलं नाव येतं, ते म्हणजे चंगेज खान. मित्रांनो या ठिकाणी भारतीय एक रुपयाची किंमत ३८ मंगोलिया ट्रॉलर एवढी आहे. चीन व रूस यांच्या सीमेवर हा देश आपल्या खानाबदोश परंपरा यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि मंगोलिया ची राजधानी उलांबतर सोबत गोरखी टेरेलज, खुवजसगील, नूर आणि खरखोरीन सारख्या ठिकाणी फिरू शकता.

हा देश फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथील जेवण सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे. तुम्ही या ठिकाणी फक्त तीस ते चाळीस रुपयांमध्ये पारंपारिक मंगोलियन जेवणाचा आनंद घेऊ शकता. आणि तुम्ही हे देखील जाणून घेऊ शकता की चंगेज खान च्या मुलुख मध्ये राहण्यासाठी किती खर्च येऊ शकतो. तर तो आहे चार दिवसाचा खर्च अगदी नऊ हजार रुपये. ज्यामध्ये हवाईसेवा समाविष्ट नाही.

पुढील देश आहे हंगेरी: मित्रांनो तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये कोणत्या युरोपियन देशाला भेट द्यायचे असेल. तर तुम्ही कमी पैशांमध्ये याठिकाणी करू शकता. तुम्हाला जानूनच धक्का बसेल की हंगेरी हा एक युरोपियन शहर असून या ठिकाणी भारतीय मुद्रा ही अगदी मजबूत आहे. येथे भारतीय एक रूपया चार हंगेरियन फोर्ट एवढा आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट जगातील सर्वात प्रेमळ देश मानला जातो.

हंगेरीमध्ये फिरण्यालायक खूप सारे ठिकाणं भेटतील. जसे की तलाव बालेटोन, इगर आणि अगतेलेक नॅशनल पार्क. त्यासाठी हा खूपच सुंदर देश आहे. आणि इथे एक आठवड्याचे राहण्यासाठी खाण्यासाठी आणि प्रवासातील ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. तर मित्रांनो जर तुम्ही कमी पैशांमध्ये कोणत्या युरोपियन देशांमध्ये फिरु इच्छित असाल तर हंगेरी हा तुमच्यासाठी एक उत्तम निवड आहे.

पुढील देश आहे उजबेकीस्तान: उजबेकीस्तान हा आशिया च्या मध्यभागी स्थीत एक सुंदर असा देश आहे. जो आपल्या प्राचीन इतिहास, सुंदर वास्तुकला आणि संस्कृतीसाठी अगदी प्रसिद्ध आहे. उजबेकीस्तान ची राजधानी ताश्कंद, प्रत्येक पर्यटकांची शुद्ध मनाने स्वागत करते. या देशात लोक पर्यटकांशी ताळमेळ बनवत असतात.

उजबेकीस्तान मध्ये तुम्हाला खूप प्राचीन संरक्षित मज्जित पाहायला मिळतील. आणि काही नामी तीर्थक्षेत्र सुद्धा जे समरकंद आणि बुखरा मध्ये स्थित आहे. उजबेकीस्तान मध्ये तुमचं रोजचा खर्च अडीच हजार रुपये एवढा होऊ शकतो. आणि हवाई सेवा पंचवीस हजारांमध्ये तुम्हाला येथुन प्रतीचं विमान मिळू शकतं. ज्या ठिकाणी एक रुपयाची किंमत १४४ उझबेकिस सोम एवढी आहे.

पुढील शहर आहे लाओस: थायलंड आणि कंबोडियाच्या जवळ स्थित लाओस एक छोटेसे शहर आहे. परंतु तुम्हाला लाओस मध्ये भारतीय असण्याचा गर्व होऊ शकतो. कारण की या ठिकाणी तुम्हाला मंदिरे आणि बुद्धिस्ट मॉनेस्ट्री पाहायला मिळतील. सोबतच येथील झरे आणि बगीचे हे खूप प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी भारतीय एक रुपयाची किंमत एक्शे सत्तावीस अलौशियन एवढी आहे.

तर तुम्ही या ठिकाणी मोकळ्या मनाने खर्च करू शकता. एक आठवड्याची सुट्टी या ठिकाणी तुम्ही वीस हजाराहून कमी खर्चात करू शकता. त्यांच्या किमतीत पंन्नास ते साठ हजारांपर्यंत सुद्धा जाऊ शकते. तर मित्रांनो हे होते काही कमी खर्चात विदेश फिरता येतील असे देश. जर तुम्ही येत्या काळात कमी खर्चात कुठे जाऊ इच्छित असाल. तर यातील काही देश तुम्ही तुमच्या यादीमध्ये समाविष्ट करू शकता.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.