पोती, बारदान, गोनी निर्मिती उद्योग ।। ग्रामीण भागात कमी खर्चात करण्यायोग्य व्यवसाय ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शेती

ज्युट म्हणजे ताग, या तागापासून बनवलेले पोते किंवा बारदाना हा प्रामुख्याने  कांदा भरने, साखर व  धान्य साठवणुकीसाठी  लाखोंच्या  संखेने लागतात. शेतकरी तसेच कारखानदार तयार माल बाजारपेठेत पाठवताना या बॅगचा पॅकेजींग मध्ये वापर करतात. सध्या सरकारने प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध आणल्यापासून ताग उत्पादनाला मागणी वाढत आहे. हे उत्पादन पर्यावरण पुरक असल्याकारणाने यास बाहेरच्या देशात हि मोठी मागणी असते.

आज आपण पोते किंवा बारदान निर्मिती उद्योग, पोते निर्मिती उद्योग याविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागणारी वस्तू शेतकऱ्यांसाठी हि बारदान आणि पोटे हि आहे. कारण खास टारगेट मार्केट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज त्या विषयी पूर्ण माहिती सांगणार आहे. बारदान किंवा पोते निर्मिती उद्योग.

आपल्याकडे कित्येक वर्षांपासून या ज्यूट पासून तयार होणारी पोते किंवा बारदान असेल. ज्याला आपण कांद्यासाठी, बटाट्यासाठी मधल्या काळात साखरेसाठी, शेंगदाणे असेल या सगळ्या आइटम साठी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ग्रामीण भागात या पोत्याचा वापर केला जातो.

अगदी सेकंड चॉईसस मध्ये. मग तुमचं तूर डाळ, मूग डाळ असेल. हरभरा डाळ असेल. म्हणजे दाळींचे सगळे प्रकार असतील काही भागात तांदूळ असेल. ती सुद्धा पॅकिंग साठी आपल्याकडे, या पोत्यांचा वापर केला जातो. निश्चितच मधल्या काळात याची मागणी कमी जास्त अशी होते. असं कधीही प्रकार घडलेला नाही.

म्हणजे उगाच डिफ्रेन्स येतो का? तर नाही. तर प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा सीझन असतो. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याकडून जेवढे उत्पादन होतं. तेवढ्या प्रमाणात या सगळ्या प्रोडक्ट ची खरेदी केले जाते. मग असं जर आपण सुरु केले. हा उद्योग जर आपण आपल्या ग्रामीण भागांमध्ये जर सुरू केला. तर निश्चितच एक वेगळी अपॉरच्युनिटी आपल्याला सुरू करता येईल.

आपल्या भागामध्ये आपण जिथे राहतो त्या भागांमध्ये. हा उद्योग करताना आपल्याला एक चांगली गोष्ट करता येईल. की महिलांना रोजगार देता येईल. म्हणजे ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत. त्यांना आपल्याला रोजगार निर्मितीच साधन देता येईल. निश्चितच ज्यूट याचं प्रोडक्शन महाराष्ट्रात आता होत नाही.

त्यामुळे रॉ मटेरियल आपल्याला बाहेरच्या भागातून आपल्याला मागवाव लागेल. भारतातल्या ज्या पट्ट्यांमध्ये जिथं पश्चिम बंगाल असेल किंवा बांगलादेश असेल. असा तुमचा काही बेल्ट असेल. बिहार असेल. जिथे अस्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होते. तिकडून आपल्याला जरी रॉव मटेरियल मागवावे लागत असलं. तरीसुद्धा आपल्याकडे याची मागणी प्रचंड असल्याने आपल्याला इथे हा बिझनेस करायला चांगला स्कोप आहे.

एकतर मॅन्युअली किंवा सेमी ऑटोमॅटिक. किंवा पूर्ण ऑटोमॅटिक अशा दोन्ही तिन्ही प्रकारांमध्ये हा उद्योग करता येईल. अगदी खूप मॅन्युअली नको. म्हणजे अगदी हाताने न करता, काही मशीनचा जर का आधार घेतला. साधारणतः दोन ते तीन लाख रुपयाचे छोटा इन्वेस्टमेंट मध्ये, साधारण दिवसाला आठ ते दहा हजार बॅग तयार होतील. एवढे सुंदर सुंदर छोट्या प्रकल्प सुरू होऊ शकतो.

यामध्ये निश्चितच थोडा कच्चा मालासाठी आपल्याला इन्वेस्टमेंट लागेल. कारण कच्चा माल आपल्याला लांबून आणायचं आहे. तो आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये आणावं लागेल. पण जर का प्रोजेक्ट सुरू केला. तर मागणी आपल्या जवळपास असल्याने किंवा मार्केट आपल्या जवळपास असल्याने, व्यापारी आपल्या जवळपास असल्याने मग ते कांद्याचे शेतकरी असू देत. इतर कोणते शेतकरी असूदे.

हे सगळे आपल्या जवळच्या भागात असल्याने, आपल्याला जरी रॉ मटेरियल लांबून आणावं लागत असेल. तरी मार्केट चं अप्रोच खूप सोपे होईल. जर नवीन उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करताय. एक सुशिक्षित बेरोजगार आहात. तर निश्चितच शासनाच्या काही योजना सुद्धा वेळोवेळी आपल्याकडे डिक्लेर होतात. ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक सहाय्य सुद्धा केलं जातं.

मला असे वाटते की ग्रामीण भागासाठी हा उद्योग जास्त सुटेबल असू शकतो. अर्बन बिझनेस नाही आहे. खरं तर ग्रामीण भागात जिथे या पिकाची प्राबल्य आहे. तिथे पिकांची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्या भागात जर हा बिझनेस केला. तर याचं आपल्याला एक नवीन रोजगार निर्मिती साधन करता येईल. महिला बचत गटांच्या आठ ते दहा महिलांना एकत्र करून आपण जर हा बिझनेस सुरू केलं.

तर दिवसाला जर आठ ते दहा हजार लक्ष ठेवलं. महिन्याला साधारण दोन लाख बॅग प्रोडक्शन च स्टार्टअप ठेवले. तर दोन ते अडीच लाखात प्रोजेक्ट छान पैकी सुरू होईल. मशिनरी इन्व्हेस्टमेंट आहे, जागा आपल्याला लागेल. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे आपल्याला लेबर खूप महत्त्वाचे लागतील. तर मुळातच आपल्याकडे सध्या नोकरीची किंवा याची चणचण आहे. आपल्याकडे अन्स्किल्ड लेबर जरी असले. तरी हा प्रोजेक्‍ट सुरू करता येईल.

भांडवल गुंतवणूक: ३ ते ५ लाख. लागणार कच्चा माल: ज्या प्रकारच्या गोण्या किंवा पोती तयार करायचे तसे हलके, मध्यम किंवा जाड कापड व ते शिवण्यासाठी सुतळी.

कच्चा माल मिळण्याचे ठिकाण: हा कच्चा माल प्रामुख्याने समुद्र किराऱ्यालगतच्या राज्यात मिळतो जसे पश्चिम बंगाल (कोलकत्ता) तामिळनाडू, मुंबई इ.आपण इंडिया मार्ट च्या वेब साईट वरून माल पुरवणाऱ्याचे पत्ते व फोन नंबर घेऊ शकता .

मशीनरी: कापड कापण्यासाठी कटिंग मशीन आणि गोणी शिवण्यासाठी शिलाई मशीन, यामध्ये आपण कांदा गोणी हाताने शिवू शकतो त्यामुळे सुरवातीचे मशीन विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल वाचेल.

विक्री कशी कराल: शेतकरी, कारखानदार यांना डायरेक्ट सप्लाय. रिटेल दुकानांना पोहच माल देऊन त्याच्या माध्यमातून विक्री करावी.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “पोती, बारदान, गोनी निर्मिती उद्योग ।। ग्रामीण भागात कमी खर्चात करण्यायोग्य व्यवसाय ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

Comments are closed.