नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
नाशिक हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर आहे. हे शहर मुंबईपासून 160 किलोमीटर तर पुणे पासून दोनशे दहा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील 10 अशी पर्यटन स्थळे ज्यांना भारतात प्रत्येक व्यक्तीने एक वेळेस तरी नक्की भेट दयायला पाहिजे.
क्र. 1 :- त्र्यंबकेश्वर मंदिर: नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. ज्यामुळे या ठिकाणी बारा वर्षांतून एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरवण्यात येतो. त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिकमधील ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी आणि गोदावरीच्या काठावर वसलेलं आहे. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी व भीमा नद्यांच्या उगमस्थळी बारा शिवमंदिरे बांधली.
त्र्यंबकेश्वर मंदिर हे त्यापैकीच एक शिवालय आहे. ज्यामुळे त्यांना बारा ज्योर्तिलिंग म्हणून ओळखलं जातं. पुढे नानासाहेब पेशवे यांनी हेमांडपती स्थापत्यशैलीत या मंदिराची पुर्नबांधणी केली होती. या मंदिराच्या चारी बाजुंना कोट बांधलेला असून पूर्वेकडे मुख्य दरवाजा आहे. मंदिरावर अतिशय सुंदर कोरिवकाम करण्यात आलेलं आहे.
क्र.2 पांडवलेणी : नाशिकमधील पांडवलेणीदेखील पाहण्यासारखी आहेत. या लेण्यांना बौद्धलेणी, त्रिरश्मी लेणी असंही म्हणतात. एका मोठ्या टेकडीवर ही प्राचीन लेणी असून ती जवळजवळ दोन हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पाली भाषेतील एक शिलालेख सापडतो ज्यावरून ही लेणी दोन हजार पूर्वीची असल्याचा दाखला मिळतो. या लेण्यामध्ये मुख्य चोविस लेणी असून त्यामध्ये बुद्धस्तूप, भिक्षूंची निवासस्थाने अनेक देवदेवतांच्या मुर्ती आढळतात.
सातवाहन आणि क्षत्रप राजवंशाने ही लेणी कोरण्यास मदत केल्याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. ज्यावरून नाशिकवर पूर्वी सातवाहन राजाचे अधिराज्य असल्याचा पूरावा मिळतो. यातील काही मुर्ती आता खंडीत स्वरूपात शिल्लक असल्या तरी त्यातून शिल्पकलेचं अप्रतिम दर्शन तुम्हाला मिळू शकतं. पांडवलेणी पाहण्यासाठी काही प्रमाणात फी आकारली जाते. ही लेणी पाहण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून तिथपर्यंत पोहचण्यासाठी अर्धा तास चालत जावे लागते. नाशिकरोडवरून बौद्धलेणी पाहण्यासाठी बसेस मिळतात.
क्र.3:- सोमेश्वर धबधबा : नाशिकमधील सोमेश्वर धबधबाही खूप प्रसिद्ध आहे. ज्याला या ठिकाणी सोमेश्वर धबधबा या नावानेही ओळखलं जातं. नाशिक बस स्टेशनपासून हा धबधबा साधारणपणे नऊ किलोमीटरवर आहे. दहा मीटर उंच असलेला हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची चांगलीच गर्दी होते.
पावसाळ्यात हा धबधबा पाहणं हा एक रोमांचक अनुभव असतो. कारण या काळात या ठिकाणी निसर्गाचे एक मनोहर दृश्य तुम्हाला पाहता येऊ शकते. हा धबधबा नाशिकमधील आंबेडकर नगरमध्ये वसलेला आहे. पावसाळ्यात कोणत्याही फी विना तुम्ही तो सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाहू शकता.
क्र.4:- कुंभमेळा : नाशिक हे शहर कुंभमेळ्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. कुंभमेळा हा भारतातील एक सर्वात मोठा धार्मिक उत्सव असतो. असं म्हणतात की, समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर पडला आणि देव आणि दानवांमध्ये या अमृतावरून युद्ध झाले. या युद्धात त्या अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातील एक हरिद्वार येथील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैनमधील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब प्रयागमधील गंगा, यमुना व सरस्वतीच्या संगमावर नदीत तर चौथा थेंब नाशिकमधील गोदावरी नदीत पडला होता.
ज्यामुळे या ठिकानांना धार्मिक स्थळांची मान्यता मिळाली आणि आजही येथे कुंभमेळा भरवण्यात येतो. हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो. नाशिकमध्ये या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून साधू, महंत आणि भाविक गोळा होतात. नाशिक फिरण्याचे ठिकाण तर आहेच पण इथे फिरता फिरता इथली संस्कृती, इतिहास बाजारपेठ, मंदीरे यांची ओळखही तुम्हाला होईल.
क्र.5:- काळाराम मंदीर : नाशिकमध्ये काळाराम मंदीर प्रसिद्ध आहे. भगवान रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्यास होते अशी आख्यायिका आहे. पुर्वी लाकडी बांधकाम असलेले मंदीर 1782 साली सरदार रंगराव ओढेकर यांनी पुन्हा काळ्या दगडात बांधले. ज्यासाठी बारा वर्षे दोन हजार कारागिर काम करत होते असं म्हटलं जातं.
पश्चिम महाराष्ट्रातील रामाच्या अनेक सुंदर मंदीरांपैकी हे एक मंदीर आहे. या मंदिराची रचना आणि कोरीवकाम पाहण्यासारखे असून त्यात प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण यांच्या काळा पाषाणातील मुर्ती आहेत. यातील रामाची मुर्ती काळ्या पाषाणातील असल्यामुळे या मंदिला काळाराम मंदीर असं म्हटलं जातं. या तीनही मुर्ती स्वयंभू असून त्या गोदावरीच्या पात्रात जिथे सापडल्या तिथे रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड अशी नावे पडली. चैत्र महिन्यामध्ये या मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
क्र.6:- भगुर : भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नाशिक पासून सतरा किलोमीटर एवढ्या अंतरावर असणारे हे ठिकाण स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या जन्मस्थान आहे. या ठिकाणी देवीचे मंदिर देखील आहे.
क्र.7:- मुक्तिधाम मंदिर : मुक्तिधाम मंदिर हे नाशिकमधिल सर्वात खास जागा आहे. असे म्हणले जाते या मंदिराच्या विशिष्ट वस्तू करणे हे मंदिर प्रसिद्ध आहे. मुक्तिधाम मंदिर पवित्र बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यामुळे हे मंदिर सर्वात जास्त पवित्र मानला जातो. या मंदिरात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मंदिराच्या सर्व भिंती शिलालेखांनी भरलेले आहेत.
क्र.8:- सुला वाईनयार्ड (Sula Vineyard) : नाशिकमधील सुला हे एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं वाईन गार्डन आहे. नाशिक जिल्हा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यामुळे नाशिकमध्ये अनेक लहानमोठ्या वाइनरी आहेत. मात्र या सर्वात सुला वायनरी मध्ये जाणं पर्यटकांना फार आवडतं. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट वाईनचं उत्पादन केलं जातं. या वायनरीमध्ये एक वाईन टेस्टिंग रूमदेखील आहे.
ज्या ठिकाणी पर्यटक वाईनची टेस्ट घेऊ शकतात. अत्यंत कमी खर्चात तुम्ही या वायनरीत फेरफटका आणि वाईनची टेस्ट चाखू शकता. या ठिकाणी तुम्हाला भव्य दिव्य द्राक्षांचे मळे फिरण्याची, उपहारगृहाची सोय मिळते. ज्यामुळे फिरण्यासाठी आणि मनसोक्त फोटोसेशन करण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे नाशिकमधील या बेस्ट वाईनयार्ड्सनां तुम्ही भेट देऊ शकता.
क्र 9. वणीची सप्तशृंगी देवी : नाशिकमध्ये प्रसिद्ध असे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. सदर मंदिर हे डोंगराच्या उंच भागात बांधलेले असून येथे प्रत्येकवर्षी अनेक भाविक दर्शनाला येतात. साडेतीन शक्तीपीठ पैकी अर्धे पीठ म्हणून वाणी ला गणले जाते.
क्र.10 :- हरिहर किल्ला (Harihar Fort) : नाशिकमधील हर्षवाडी या गावाजवळ असलेला हा किल्ला आहे. हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता पुढे शहाजीराजांनी तो त्र्यंबकगडासोबत जिंकून घेतला. पुढे मोगलांच्या ताब्यातून तो मोरोपंत पिंगळे यांनी जिंकून घेतला आणि स्वराज्यात आणखी एका किल्लाची भर पडली.
मात्र पुढे मराठ्यांकडून इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला अशा प्रकारे अनेकांनी या किल्लावर अधिराज्य गाजवलं. हरिहर किल्ला त्रिकोणी आकाराच्या सुळक्याप्रमाणे आहे. हा किल्ला चढण्यासाठी गिर्यारोहक आदल्या दिवशी गावात येतात आणि भल्या पहाटे किल्ला चढण्यास सुरूवात करतात. कारण चढण्यासाठी हा किल्ला अतिशय कठीण आहे. मात्र वर चढून गेल्यावर तुम्ही जेव्हा नाशिकचं विगंहम दृश्य पाहता तेव्हा तुमचे सर्व श्रम विसरून जाता.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.