स्वामी विवेकानंद म्हणतात या जगाला आता पर्यंत जेवढे काही ज्ञान मिळाले आहे, ते मनातून निर्माण झाले आहे. या ब्रम्हांडातील असीम अभ्यासिका आपल्या मनामध्ये आहे. उठा, जागे व्हा, तुमचे ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबू नका. आपल्या भारत देशामध्ये जे संत होवून गेले प्रत्येकाने मनाचे महत्व सांगितले आहे.
पण दुर्दैवाने अनेक लोकांना या मनाचा वापर करून आपले आयुष्य सुखकर आणि यशस्वी कसे बनवायचे हेच माहिती नाहीये. मनाची शक्ती वाढविण्याचे, मन मजबूत करण्याचे 4 मार्ग आपण पाहुयात, यापैकी कोणत्याही मार्गाचा तुम्ही फक्त 8 दिवस जरी प्रयोग केला तरी तुमच्यामध्ये बदल घडेल.
1.कुतूहल व्हा, चिकिस्तक बना:- कोणतीही गोष्ट किंवा बातमी जशी आहे तशी स्वीकार करू नका. त्याऐवजी जास्तीत जास्त प्रश्न विचारायची सवय लावून घ्या. अनेक अशी लोक आहेत व्हॉट्सअप किंवा फेसबुक वर एखादी पोस्ट वाचली की लगेच त्यावर विश्वास ठेवतात.
आणि कोणतीही शहानिशा न करता दुसऱ्यांना फॉरवर्ड करतात. अशाने तुमची फसवणूक तर होईलच, पण नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण अशी कोणतीही पोस्ट वाचून किंवा कोणत्या व्यक्तीने सांगितले म्हणून तुम्ही समजा चुकीचा प्रयोग केला तर ते तुम्हाला किती हानिकारक असते.
त्यामुळे लगेच विश्वास न ठेवता जास्तीत जास्त प्रश्न विचारायला सुरुवात करा. म्हणजे की जे मी वाचलं ते कशावरून खर आहे? त्याला पुरावा काय आहे? तेव्हा तुमची बुद्धी आपोआप तीक्ष्ण होते. कारण तुमचे चिंतन वाढते. अशा प्रकारे चिंतन करण्याऱ्या व्यक्तीला या जगात कोणीही सहज फसवू शकत नाही.
2. कंफर्ट झोनच्या बाहेरच्या गोष्टी करा:- आपल्या मनाला नेहमी कंफर्ट झोन मध्ये राहायची सवय झालेली असते. त्यामुळे त्याची प्रगती होत नाही. आता आपल्याला अस वाटेल की कंफर्ट झोनच्या बाहेरील गोष्टी करायच्या म्हणजे नक्की काय करायचं? तर आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते त्यापैकी रोज एक गोष्ट करायचा प्रयत्न करायचा.
उदाहरण तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते, मग घरातल्या 4, 5 लोकांसमोर रोज बोलण्याची प्रॅक्टिस करा. किंवा मग नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. जसे की डान्स, गिटार, तबला, किंवा एखादी नवीन भाषा असेल, असे केल्याने तुमच्या मेंदूमध्ये नवीन नवीन न्युमरल पाथवे निर्माण होतात. ज्यामुळे तुमच्या मेंदूची आकलन शक्ती वाढते.
3. ब्रेन गेम्स खेळा, कोडी सोडवा :- मोकळ्या वेळात फालतू मध्ये टीव्ही पाहण्यापेक्षा किंवा मोबाईल वर दुसरे गेम्स खेळण्यापेक्षा बुध्दीला चालना देणारे गेम्स खेळा. किंवा कोडी सोडवा. प्ले स्टोवर वर ब्रेन एक्सेरसाईज गेम टाकले तरी आपल्याला प्रचंड गेम मिळतात. अशा गेम्स मुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमच्या मेंदूची क्षमता वाढते. तुमची निर्णय क्षमता वाढते.
4. पुस्तकांचे वाचन करा:- वाचन केल्याने तुमची कल्पना शक्ती वाढते. कारण वाचन करताना तुम्ही वेगवेगळी लोक, वेगवेगळी ठिकाणे, निरनिराळ्या वस्तू, आयडिया यांची मनामध्ये कल्पना करत असता. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडते. ह्या जगामध्ये जी श्रीमंत आणि यशस्वी लोक आहे, त्यांच्यामध्ये एक कॉमन सवय आहे, ती म्हणजे पुस्तकांचे वाचन करण्याची.
याच बरोबर तुम्हाला नोट्स काढायची सवय लावायची आहे. कारण संशोधन असे सांगते तुम्ही जेव्हा नोट्स काढता, तेव्हा वाचलेले तुमच्या जास्त लक्षात राहते. आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी त्याची क्षमता वाढविण्यासाठी या गोष्टींचा नक्कीच आपल्याला फायदा होईल.
वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.