हिंडणबर्ग रिसर्च कंपनी काय करते? सेबी बद्दल त्यांनी काय म्हटलंय ?

आंतरराष्ट्रीय

 

हिंडणबर्ग नावाचा एक भलं मोठं हवाई जहाज होत. तो 6 मे 1937 याचं हवेत स्फोट झाला आणि 36 लोक मारले गेले. याला म्हटलं गेलं हिंडणबर्ग डीजास्टर. या दुर्घटनेच्या अनेक वर्षांनंतर हेच नाव मुद्दामून घेत एक कंपनी स्थापन झाली, ती सध्या चर्चेत आहे.
अदाणी समूहाबद्दलच्या बातम्यामुळे हिंडणबर्गची भारतात भरपूर चर्चा झाली. त्यांचं नाव एका दुर्घटनेची संबंधित का आहे? ही कंपनी नेमकं काय करते? आणि त्यांनी आदानी आणि सेबीविषयी ताजा रिपोर्टमध्ये काय म्हटलेल आहे? हे समजून घेऊया..
भारतामधले शेअर बाजारांचे नियमन करणाऱ्या सेबीच्या सध्याचे अध्यक्ष आहेत माधवी पुरी भोज आणि त्यांचे पती धवल भोज. या दोघांवर हिंडणबर्ग रिसर्च कंपनीने त्यांच्या ताज्या रिपोर्टमध्ये आर्थिक अनियमितता यांचे आरोप केलेले आहेत.
झालं असं की, जानेवारी 2023 मध्ये हिंडणबर्गने अदानी उद्योग समुहा बद्दल एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्यामध्ये कंपनीच्या कथित आर्थिक अनियमितता मांडण्यात आल्या होत्या. हा रिपोर्ट आल्यानंतर भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आणि या समूहाच्या कंपन्यांचा 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झालं. या अहवालानंतर गौतम आदानी अशा दहा दिवसांमध्ये गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 श्रीमंत लोकांच्या यादीतून बाहेर पडलेले होते आणि समूहाच्या बधिर आर्थिक अनियमितता याची चौकशी करायची जबाबदारी देण्यात आली होती सेबीला आणि याच सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी भोज.
ज्या कंपन्यांचा वापर अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततासाठी करण्यात आला त्या कंपन्यांमध्ये सेबीचे अध्यक्षांची देखील गुंतवणूक होती, असा आरोप हिंडणबर्गने त्यांच्या नवीन रिपोर्टमध्ये केलेला आहे. सेबी अध्यक्षांच्या या हितसंबंधांमुळे बाजार नियामकच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले? असे हिंडणबर्गने म्हटलेले आहे. मात्र, माधवी भोज आणि त्यांचे पती धवल यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
अमेरिकेत असणारी ही हिंडणबर्ग कंपनी स्थापन केली 2017 साली निथल अँडरसन यांनी स्थापन केली. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठात इंटरनॅशनल बिझनेसची पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी एका डेटा कंपनीमधून करिअरला सुरुवात केली. एका बातमीनुसार त्यांनी इजराइलमध्ये काही काळ रुग्णवाहिका देखील चालवलेली आहे.
लोकांनी बेसावध लोकांना फसवू नये म्हणून आम्ही या गोष्टी उघड करतो असा हिंडणबर्गच्या वेबसाईट वरती म्हटलेले आहे. आपली कंपनी सखोल सहजासहजी उपलब्ध नसलेली माहिती मिळते असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. कंपन्यांच्या अकाउंटिंग म्हणजे लेखापरीक्षणाचे अनियमितता, मानजमेंट मधल्या किंवा महत्त्वाच्या पदावर त्या व्यक्तीची भूमिका आणि निर्णय तसेच जाहीर न करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहार, उद्योग आणि अर्थव्यवहारात मधल्या बेकायदेशीर किंवा अनेक पद्धती किंवा प्रक्रीया, जाहीर न करण्यात आलेले नियमबद्दलचे किंवा आर्थिक मुद्दे या सगळ्याचा अभ्यास करून आपण अहवाल तयार करतो, असं हिंडणबर्गने म्हटलेले आहे.
2017 ते 2023 या काळात हिंडणबर्गने जगभरातील 16 कंपन्यांच्या गैरव्यवहारात बद्दलची माहिती उघडकीला आनलेली आहे. इलेक्ट्रिक ट्रक बनवणारे अमेरिकेची कंपनी निकोला कॉर्पोरेशन यांच्या गुंतवणूकदारांना तांत्रिक विकासाबद्दल फसवी माहिती देत असलेला रिपोर्ट हिंडणबर्गने सप्टेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध केला होता. त्यानंतर या कंपनीचे संस्थापक मिल्टन यांना अमेरिकन कोर्टाने दोषी देखील जाहीर केलं होतं. आपण करत असलेल्या फंडामेंटल रिसर्चच्या आपण कंपनीच्या गुंतवणुकीबद्दलचे निर्णय घेण्यासाठी वापरत असल्याचं हिंडणबर्ग कंपनी सांगते.
हिंडणबर्ग कंपनी शॉर्ट सेलींग करते आणि यामधून अनेकांनी हिंडणबर्गच्या हेतूवरती आणि कामावरती शंका उपस्थित केलेल्या आहे. सहसा शेअर बाजारात नफा कमावण्याचा एक मार्ग असतो तो म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स कमी किमतीला विकत घ्यायचे आणि भाव धरल्यानंतर ते विकून टाकायचे, म्हणजे 100 ला घेऊन 150 ला विकायचा.यांच्या उलटी प्रक्रिया शॉर्ट सेलींगमध्ये होते.
गुंतवणूकदाराला वाटत असतं की, कंपनी आजचा भाव हे काही कारणाने जास्त आहे आणि तो पडणार आहे. हा गुंतवणूकदार आणि चढ्या भावाने शेअर्स विकून टाकतो आणि घसरणीनंतर कमी दराने विकत घेतो आणि त्यातून त्यांना नफा होतो. आता मुळात आपल्याकडे नसलेले शेअर्स कसे विकता येतात? हा व्यवहार कसा होतो? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर शॉर्ट सेलींग बद्दलच्या तपशीलवार लेख तुम्हाला गुगलवरती पाहायला मिळेल.
हिंडणबर्ग कंपनीत यांच्या संशोधनानंतरचा अहवाल प्रसिद्ध करायच्या आधी बोर्ड ऑफ इन्वस्टरसना देते आणि त्यानुसार शेअर बाजार शॉर्ट पोझिशन्स घेते. आदानी समूहाबद्दल जानेवारी 2023 मध्ये अहवाल जाहीर केल्यानंतर आणि या समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मध्ये खूप मोठी घसरण झाली आणि या घसरणीचा फायदा शॉर्ट सेलींग हिंडणबर्गला झाला. या व्यवहारात 4 मिलीयन डॉलर्स कमावले असल्याचे त्यांनी एका बातमीमध्ये म्हटले आहे.