तुम्ही-आम्हीच नव्हे तर मोठ्या कंपन्याही पैसे वाचवण्यासाठी ही युक्ती करतात ।। जाणून घ्या अशाच काही युक्त्या ज्या वापरून विमान कंपन्यांनी लाखो डॉलर ची केली बचत !

आंतरराष्ट्रीय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

पैसे कसे वाचवायचे हे स्त्रियांना अधिक चांगल्या प्रकारे माहीत असतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अर्थात पैसे वाचवण्यात काही पुरुष देखील मागे हटणार नाहीत हे वास्तव आहे. पण पैसे वाचवण्यात कंपन्या देखील आघाडीवर असतात. एखादं उत्पादन बनवताना कंपन्या उत्पादनाचा कमीतकमी खर्च होईल याकडे काटेकोरपणे लक्ष देतात. जितकं जास्त उत्पादन तितका कच्च्या मालाचा खर्च कमी हे ओघानेच आलं.

पैसे वाचवण्यात काही विमान कंपन्या देखील आघाडीवर आहेत. त्या जरी उत्पादन करत नसल्या, तरी आपली कंपनी अधिकाधिक फायद्यात रहावी यासाठी ‘काॅस्ट कटिंग’ ची एकही संधी त्या सोडत नाहीत. आतां आपण पहाणार आहोत अशा काही ‘काॅस्ट कटिंग’ च्या किंवा पैसे वाचवण्याच्या कल्पना ज्या काही विमान कंपन्यांनी अंमलात आणल्या आणि यशस्वी करून दाखवल्या.

ते १९८० चे दशक होते आणि रॉबर्ट क्रँडल अमेरिकन एअरलाइन्सचे प्रमुख होते. ते मुळातच अतिशय कंजूष आणि जमेल तेव्हां कमी खर्च करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या जागी कुत्र्याच्या भुंकण्याचा टेप लावून सुरक्षा रक्षकांचा खर्च वाचवला होता याची चर्चा झाली होती. एकदां त्यांना एक अत्यंत साधी कल्पना सुचली. जर आपण विमानात देत असलेल्या प्रत्येक सॅलडमधून एक ऑलिव्हचे पान काढून टाकले तर? प्रवाशांना कळणार देखील नाही की त्यांच्या जेवणातून ऑलिव्हचं एक पान काढून टाकलं आहे, आणि कंपनीचे पैसे वाचतील ते वेगळेच. त्या वर्षी ऑलिव्हचे फक्त एक पान कमी करून अमेरिकन एअरलाइन्सने $४०,००० ची बचत केली. कुणी कल्पना तरी केली असेल कां, की एखादी छोटी गोष्ट इतकी मोठी बचत करू शकेल?

युनायटेड एअरलाइन्स ह्या प्रसिद्ध विमान कंपनीने तर कमालच केली. पेयपान सेवेसाठी यापुढे कॉकटेल स्टिक द्यायची नसल्याचा मेमो फ्लाइट अटेंडंटना पाठवण्यात आला होता. खरं तर त्या प्लॅस्टिकच्या काड्या जवळपास निरुपयोगी असतात आणि पेय हलवण्यापेक्षा अधिक त्यांचा विशेष उपयोग नसतो. कॉकटेल स्टिक न दिल्यामुळे युनायटेड एअरलाइन्सने प्रति वर्ष सुमारे $८०,०००ची बचत केली.

नॉर्थवेस्ट एअरलाइन्स डेल्टा एअरलाइन्समध्ये विलीन होण्यापूर्वी त्यांच्या लक्षात आले की लिंबाच्या सर्वसाधारण किंमती वाढल्या आहेत. त्यांनी असं ठरवलं की सॉफ्ट ड्रिंक्स आणि मिश्रित पेयांसाठी लिंबाच्या कमी फोडी देऊन ते डेल्टाच्या तुलनेत वर्षाकाठी $५००,००० ची बचत करू शकतात. त्या सोप्या बदलाचा अर्थ असा होतो की त्यांना डेल्टाच्या तुलनेत ६०% कमी लिंबं विकत घ्यावी लागणार होती, आणि कंपनी वर्षाला अर्धा दशलक्ष डॉलर्सची बचत करणार होती.

एका एअरलाईन्सने विमानातील बसण्यासाठी ज्या खुर्च्या असतात त्यांचा आकार थोडा कमी करून खुर्च्यांची संख्या वाढवली. अधिक खुर्च्या म्हणजे अधिक पॅसेंजर, अर्थात अधिक कमाई. झाला की नाही कंपनीचा फायदा?

करोना पश्चात अनेक विमान कंपन्या तोट्यात चालत आहेत ह्याबद्दल तुम्ही वाचलं असेल. इतकंच नव्हे, तर ग्राहक सर्वाधिक नाराज असलेल्या कंपन्यांमध्ये विमान कंपन्या अग्रस्थानी आहेत. त्यामुळे प्रवाशांची नाराजी न पत्करता आपण कशा प्रकारे पैसे वाचवू शकतो याबद्दल विमान कंपन्या गंभीरपणे विचार करत आहेत. येत्या काळामध्ये करोना काळात झालेलं नुकसान भरून निघावं आणि आपली विमान कंपनी फायद्यात रहावी यासाठी पैसे वाचवण्याच्या नवनवीन कल्पना राबवण्यात येतील ह्यांत शंका नाही.

तोट्यात गेलेली एअर इंडिया टाटांनी चालवायला घेतली आहे आणि पैसे वाचवण्याच्या अशा काही क्रांतिकारक कल्पना त्यांना देखील राबवाव्या लागतील हे नक्की.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा