शेअर मार्केट संबंधित डेरिवेटिव मार्केट म्हणजे काय? ।। याचा उपयोग काय? ।। जाणून घ्या अगदी सोप्प्या भाषेत !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

आज आपण डेरिवेटिव मार्केट म्हणजे काय? हे एकदम सोप्या भाषेत बघायचा प्रयत्न करणार आहोत. डेरिवेटिव या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीपासून तयार होणे म्हणजे डिराईव होणे. जसे लाकडापासून खुर्ची, टेबल फर्निचर तयार होते. म्हणजे खुर्ची, टेबल फर्निचर हे लाखडापासून डिराईव झाले आहेत. किंवा दूध या पासून दही, लोणी, तूप तयार होते. इथे सुद्धा दही, लोणी, तूप दुधापासून डिराईव झालेत.

ज्या मुख्य गोष्टी पासून बाकीच्या गोष्टी डिराईव होतात, त्या मुख्य गोष्टीला अंडर लाईंग असेट असे म्हणतात. आपण पाहिलेल्या उदाहरण मध्ये लाकूड आणि दुध हे अंडर लाईंग असेट आहेत. शेअर मार्केटमध्ये डेरिव्हेटीव्ह मार्केट हे इक्विटी मार्केट पासून तयार झालेले आहे.

म्हणजे डेरिवेटिव मार्केट मधले सगळे शेअर आधी इक्विटी मार्केट मध्ये असतात. आणि मग ते डेरिवेटीव मार्केटमध्ये येतात. तिथे इक्विटी मार्केट हे डेरिव्हेटीव्ह मार्केट चे अंडर लाईंग असेट आहे. इक्विटी मार्केट मध्ये असलेल्या शेअरच्या किमती वर-खाली झाल्या, त्याचा थेट परिणाम डेरिवेटिव मार्केटमधल्या शेअर्सवर दिसून येतो.

इक्विटी मार्केट मधून डेरिवेटीव मार्केट मध्ये येण्यासाठी शेअर साठी काही नियम असतात. जसं की शेअर निफ्टी फाइव हंड्रेड पैकिच असला पाहिजे. म्हणजे निफ्टीच्या टॉप‌ पाचशे शेअर पैकी तो शेअर असला पाहिजे. त्या शेअर च्या कंपनी चा टर्नओवर पाचशे करोड पेक्षा जास्त पाहिजे.

असे अनेक नियम असतात. या सर्व नियमात शेअर बसत असेल. तरच तो इक्विटी मार्केट मधून डेरिव्हेटीव्ह मार्केट मध्ये प्रवेश करतो. याचा अर्थ असा होतो की डेरिव्हेटीव्ह मार्केट मधले सगळे शेअर हे इक्विटी मार्केट मध्ये असतात. पण इक्विटी मार्केट मधले सगळे शेअर डेरिवेटीव मार्केटमध्ये नसतात.

डेरिवेटीव समजण्यासाठी अजून एक उदाहरण बघू यात. पेट्रोल आणि डिझेल हे क्रूड ऑइल, म्हणजे कच्च्या तेलापासून डिराईव झालेले आहे. इथं कृड ऑईल हे अंडर लाईंग असेट आहे. आणि पेट्रोल आणि डिझेल यांच्या डेरिव्हेटिव्हज आहे. इथं क्रुड ऑईल चा भाव कमी जास्त झाला, की त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती यांवर होतो.

डेरिवेटीव मार्केट हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर काम करते. म्हणून त्यामध्ये आपण एक दोन असे शेअर विकत घेऊ शकत नाही. किंवा विकू शकत नाही. इथे प्रत्येक शेअर ची लॉट साईज ठरलेली असते. त्याप्रमाणेच प्रत्येक शेअरचा लॉट विकत घ्यावा लागतो.

आणि प्रत्येक लॉटची एक्सपायरी डेट सुद्धा ठरलेली असते. एक्सपायरी डेट च्या आधी आपण घेतलेल्या शेअरचा लॉट विकला नाही, तर एक्सपायरी डेट ला तो ऑटोमॅटिक या दिवशीच्या किमतीला विकला जातो. एस बी आय शेअर ची लॉट साईज तीन हजार आहे. म्हणजे एस बी आयचे तीन हजार शेअर मिळून एक लॉट होतो.

आपल्याला एसबीआय शेअर डेरिवेटीव मार्केट मध्ये घ्यायचा असेल तेव्हा आपल्याला ते शेअर लॉटमध्ये घ्यावे लागतात. म्हणजे आपण एक लॉट विकत घेतो, तेव्हा आपण एसबीआयचे तीन हजार शेअर्स एक साथ विकत घेतो. प्रत्येक लॉटच्या तीन एक्सपायरी असतात.

नियर मंथ एक्सपायरी, म्हणजे ज्या महिन्यात शेअर्स विकत घेतला आहे त्या महिन्याच्या शेवटचा गुरुवार. मिडल मंथ एक्सपायरी म्हणजे ज्या महिन्यात शेअर्स लॉट विकत घेतला आहे. त्या महिन्याच्या पुढच्या महिन्याचा शेवटचा गुरुवार. आणि फार मंद एक्सपायरी म्हणजे ज्या महिन्यात शेअरचा लॉट विकत घेतला आहे. तो आणि त्याचा पुढचा महिना सोडून तिसर्या महिन्याचा शेवटचा गुरुवार.

आता शेअर मार्केट मध्ये डेरिवेटीव कसे काम करते त्याचे एक उदाहरण बघुया. रमेशला हापूस आंबे खूप आवडतात. आंब्याच्या पेटीत चा आजचा भाव चालू आहे दोन हजार रुपये पेटी. पण त्याला काळजी आहे की उन्हाळ्यात आंब्याच्या पेटी चे भाव वाढतील. रमेश आंबेवाल्याला म्हणतो की मला पुढच्या महिन्यात सुद्धा आंबा आजच्या कीमती मध्ये पाहिजे. आंबे वाला ही तयार होतो.

खात्री म्हणून आंबेवाला रमेश ला लिहून देतो. की पुढच्या महिन्यात तो रमेशला एका कागदावर असं लिहून देतो, की पुढच्या महिन्यात तो रमेश ला आंब्याची पेटी दोन हजार रुपयाला देईल. आता आंब्याच्या पेटीचा भाव कितीही वाढला तरी रमेश ला ती दोन हजार रुपयातच मिळणार हे निश्चित झाले. आता डेरिवेटीव मार्केट च्या दृष्टीने पाहिलं तर रमेश हा बायर आहे. आणि आंबे वाला सेलर आहे.

आणि जे लेटर आंबेवाल्याने रमेशला दिली आहे, ते त्या दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये डेट, लॉट साईड आणि प्राईस लिहिली आहे. आता आंब्याचा भाव कितीही वाढला तरी आंबे वाला रमेशला पेटी दोन हजार रुपये मध्ये देणार. समजा पुढच्या महिन्यात आंब्याच्या पेटीचा भाव अडीच हजार रुपये झाला.

तर त्यामध्ये पाचशे रुपये या चे प्रॉफिट होणार. कारण त्याने आधीच आंबे वाल्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेले आहे. पण चूकून आंब्याचा भाव कमी झाला. उदारणार्थ पुढच्या महिन्यात आंब्याच्या पेटीचा भाव दिड हजार वर आला. तरी हि रमेश ला ति पेटी दोन हजार रुपये मध्ये घ्यावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये रमेशला पाचशे रुपयांचा लॉस सहन करावा लागेल.

डेरिवेटीव मार्केट मध्ये चार महत्त्वाचे कॉन्टॅक्ट चे प्रकार आहेत. पहिला आहे फॉरवर्ड कॅंट्रॅक्ट. दुसरा आहे, फ्युचर कॉन्ट्रक्ट. तिसरा आहे, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. आणि चौथा आहे स्वॅप कॉन्ट्रॅक्ट. इथं आपल्याला महत्वाचे आहे फ्युचर आणि ऑप्शन कॉन्टॅक्ट. ज्याला एफ एन ओ कॉन्टॅक्ट सुद्धा म्हणतात. स्टॉक एक्सचेंज आणि डेरिवेटिव एक्सचेंज वर सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे सेबीचा कंट्रोल असतो. त्यामुळे एफ एन ओ मध्ये फ्रॉड होण्याचा धोका कमी असतो.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.