लग्नासाठी फुटवेअर खरेदी करताय? या गोष्टींची काळजी जरुर घ्या !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

लग्नाची तयारी सुरु झाली अनेक ग़ोष्टी एकावेळी अंगावर येऊन पडल्याची फिलींग यायला सुरुवात होते. अनेक तयारी यावेळी करायच्या असतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब असते ती खरेदीची. लग्नाची खरेदी जणू एक मिनी सोहळाच असतो.

ज्यात अनेकजण सहभागी होत असतात. बरेचदा अशामुळे खरेदीसाठी आलेली वधू अधिकच गोंधळून जाण्याची शक्यता जास्त असते. वधूसाठी खरेदी करताना कपड्यांइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ती फुटवेअर. लग्नात पेहराव, दागिने, मेक अप या गोष्टींसोबतच वधूच्या लूकमध्ये चार चांद लावतात म्हणजे फुटवेअर. पण लग्नासाठीचे खास फुटवेअर खरेदी करताना काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. लग्नासाठी फुटवेअर खरेदी करत असाल तर या टिप्स जरुर विचारात घ्या.

खरेदीपुर्वी विचार – सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लग्नाच्या विधींसाठी खरेदी करत असलेल्या पादत्राणांच्या निवडीबाबत विचार करा. प्रत्येक विधीसाठी कोणत्या पद्धतीचं, कलरचं पादत्राण निवडाल याबाबत शांतपणे विचार करा. मगच खरेदीला जा.

कंफर्टही महत्त्वाचा– लग्नात स्टायलिश दिसणं महत्त्वाचं आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते त्या पेहरावात कंफर्टेबल असणं. लग्नाचा पेहराव हेवी वर्क वाला असतो. त्यात ज्वेलरी आणि मेक अपचीही भर असते. अशा वेळी फुटवेअर कंफर्टेबल नसेल तर पावलांना अतिशय त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्टाईलसोबत कंफर्टलाही प्राधान्य द्या.

लेहंग्याचा रंग विचारात घ्या- लग्नाच्या फुटवेअरमध्ये अनेकदा गोल्डन वर्क असलेल्या फुटवेअरलाच प्राधान्य दिलं जातं. पण शक्यतो असं फुटवेअर निवडा ज्याने तुमचा वेडिंग लूक कंप्लीट होईल आणि ते लेहंग्याला, साडीला मॅचिंग असेल.

ट्रायल जरुर घ्या – अनेकदा नवीन फुटवेअर कोणतीही ट्रायल न घेता थेट लग्नादिवशीच वापरली जाते. पण लग्नाच्या दिवशी घालण्यापुर्वी त्याची ट्रायल जरुर घ्या. म्हणजे ऐनवेळी त्याचा त्रास होणार नाही. व्हेन्युचा विचार करा– लग्न कोणत्या ठिकाणी आहे याचा विचार फुटवेअर निवडताना आवर्जुन करा. डेस्टिनेशन वेडिंगच्या ठिकाणानुसार तुम्हाला फुटवेअर निवडायला लागेल.

लेहंग्याची उंची जरुर विचारात घ्या – ब्रायडल लेहंगे हे अनेकदा हेवी असतात. अशा वेळी लेहंग्याची उंची, वजन या बाबी जरुर विचारात घ्या. फुटवेअरवर फार हेवी वर्क नसेल तर त्यावर हेवी बॉर्डरचा लेहंगा खुलून दिसेल. याउलट फुटवेअर हेवी वर्कवालं असेल तर त्यावर बारीक बॉर्डर असलेला लेहंगा निवडा. लग्नासाठी प्लॅटफॉर्म हिल्स, किटन हिल्स, वेजेस, मोजडी, कोल्हापुरी चप्पल हे फूटवेअर ऑलटाईम फेव्हरेट आहेत.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.