मुलांच्या विकासासाठी सोशल मिडियाचा करा असा वापर

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

खरं तर मुलं आणि सोशल मिडिया म्हटलं की पालकांच्या कपाळाला आठ्या पडतात. मुलांच्या सोशल मिडिया वापरण्याबाबत पालक आग्रही होताना दिसतात. अनेकदा पालकांमुळे मुलं सोशल मिडियाशी जास्तच फ्रेंडली होतात. पण कमी वयात सोशल मिडिया वापरणं पालकांसाठी चिंता वाढवणारं असतं.

अशावेळी सोशल मिडियाचा अशा पद्धतीने वापर करा की मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक विकास होईल. अनेकदा मुलांच्या संदर्भात सोशल मिडियाचा उल्लेख नकारात्मक येतानाच दिसतो. पण नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे सोशल मिडिया वापराच्याही दोन बाजू असतात.

मुलांचं सोशल मिडिया योग्य मॉनिटरिंग केलं गेलं तर त्याचा सकारात्मक उपयोग करुन घेणं शक्य आहे.

व्यक्त होणं – मुलं अनेकदा पालकांसमोर व्यक्त व्हायला बुजतात. अशा मुलांसाठी सोशल मिडिया हा उत्तम प्लॅटफॉर्म ठरु शकतो. समवयस्क किंवा समान आवडी- निवडीच्या मुलांमध्ये मिसळणं यामुळे मुलं योग्य आणि ठाम प्रकारे मत मांडू शकतात.

मैत्री – सोशल मिडियाचा मुख्य हेतूच इतरांसोबत असलेली कनेक्टिव्हीटी आहे. त्यामुळे मुलांना परिघाबाहेर जाण्यास उद्युक्त करा. देश विदेशातील मुलांसोबत मैत्री, माहितीची देवाण घेवाण हे करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करता येणं शक्य आहे.

वास्तविक जगाशी ओळख – मुलं साधारणत: कार्टून आणि खेळ यातच रमलेली असतात. अशा वेळी त्यांच्याशी संदर्भात विषयांबाबत, जगात घडत असलेल्या घडामोडींबाबत माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळू शकते. यातून मुलांच्या विचारांचा परिघ रुंदावण्यास मदत होते.

सोशल मिडियातून मदत – सोशल मिडियावर अनेकदा मुलांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करायला मदत करते. अनेकदा मुलं काही बाबी पालकांशी शेअर करायला कचरतात. अशा वेळी सोशल मिडियावर त्यांना समवयस्कांमधून आधार मिळू शकतो. अनेकदा समान आवडी निवडी असलेल्या मुलांचा ग्रुप बनू शकतो. मुलांच्या अनेक मुद्द्याला सोशल मिडियावर समर्थन मिळू शकतं. यातून मुलांचा कॉन्फिडन्स वाढण्यास मदत होते.

गॅजेट वापराच्या जबाबदारीचं भान – सोशल मिडियाच्या वापराने मुलांना फायदा होत असला तरी त्यावर वेळेचं बंधन घालणं पालकांसाठी मोठा टास्क होऊन बसतो. अशा वेळी त्यांच्या स्क्रीन टाईमबाबत काही नियम घालून देणं अतिशय गरजेचं ठरतं.

गुप्तहेराचं काम नको- अनेकदा मुलांच्या सोशल मिडियावापराबाबत पालक नको इतके संशयी बनतात. यातून वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असते. यामुळे मुलांच्या सोशल मिडिया वापराला मॉनटरिंग करताना पालकांनीही काहीसं सबुरीने घेण्याचं सुचवलं जातं.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा