डोनल्ड ट्रम्प यांना तुरुंगवास झालं तर ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतील का? अशी चर्चा अमेरिकेत सुरू आहे आणि इथे भारतात लोकसभा निवडणुकीत 2 उमेदवार तुरुंगवास भोगत असताना निवडून आले आहेत. असे विजयी उमेदवारांचं पुढे काय होतं? ते शपथ घेऊ शकतात का? चला तर मग समजून घेऊया..
भारतात तुरुंगात असलेल्या व्यक्तीला मतदान करता येत नाही, पण उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येते. कट्टरता वादी शीख धर्म प्रचारक म्हणून ओळखले जाणारे अमृतपाल सिंह पंजाबच्या खडूर सहिब मधून 1 लाख 97 हजार 120 च्या मताधिक्क्याने निवडून आले तर शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद जम्मू-काश्मीरमधल्या बारामुल्ला मधून निवडून आले आहेत. सध्या हे दोघेही दहशतवाद्यांच्या आरोपांखाली तुरुंगवास भोगत आहेत.
अमृत पाल सिंग यांना एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत अटक करण्यात आली होती आणि आसाम मधील एका तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले आहे. तर टेलर फंडिंग म्हणजे दहशतवादासाठी पैसे पुरवल्याचा आरोपांखाली इंजिनियर रशीदना ऑक्टोबर 2019 मध्ये अटक करण्यात आली आणि ते तिहार जेलमध्ये आहेत.
संसद सदस्य किंवा खासदार म्हणून शपथ घेणं हा निवडणुकीतल्या उमेदवाराला घटनेने दिलेला हक्क आहे आणि तो रशीद आणि अमृत पाल या दोघांनाही असेल. हे दोघेही सध्या कैदी असल्यामुळे त्यांना या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यासाठी तुरुंग प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि ती मिळाली तर त्यांना तुरुंगातून संसदेत शपथविधीसाठी बंदोबस्तात आणला जाईल.
पण त्यांना कामकाजात मात्र भाग घेता येणार नाही किंवा हजेरी लावता येणार नाही. शपथ घेतल्यानंतर त्यांना तुरुंगात परत जावे लागेल. आपण सदनाच्या कामकाजासाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांना शपथ घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्ष यांना लेखी कळवा लागेल.
लोकसभा अध्यक्ष मग त्यानंतर हा मुद्दा सभागृहाच्या समितीसमोर मांडतील, या सदस्याला अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी किंवा नाही यावर समिती त्यांच्या सूचना देईल.
त्यानंतर हा प्रस्ताव मतासाठी लोकसभा अध्यक्ष मांडतील. लोकसभा संसदेच्या दोन्ही सदस्यांच्या सभासदांच्या अनुपस्थिती विषयीचे नियम भारतीय घटनेच्या कलम 101/ 4 मध्ये नमूद करण्यात आले आहेत. एखाद्या गुन्हाचे आरोप असलेल्या व्यक्तीने तुरूंगातून निवडणूक लढवून जिंकली तर त्याला खासदारकी मिळते. पण हे आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली तर मात्र ही खासदारकी संपुष्टात येते.
अमृतापाल सिंह किंवा इंजिनिअर राशिद त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होऊन त्यांना किमान 2 वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावण्यात आली तर त्यांची खासदारकी संपुष्टात येईल. अशा परिस्थितीमध्ये खासदार आणि आमदार अपात्र ठरतील असे सुप्रीम कोर्टाने 2023 मध्ये दिलेल्या निकालात म्हणलं होतं.
तुरुंगातून निवडणूक लढवून जिकल्याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जॉर्ज फर्नांडिस होय. आणीबाणीच्या काळात त्यांच्यावर बडोद्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. 1977 ते तुरुंगात असताना निवडणुकांची घोषणा झाली. त्यांनी निवडणूक तुरुंगातूनच लढवली आणि मुजफ्फरपुर मधून निवडून आले. खासदारकीची शपथ घेण्यासाठी त्या वेळी त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं होतं.