बारावी सायन्स नंतर करिअर निवडीबाबत साशंक असाल तर पुढील पर्यायांचा जरुर विचार करा !

शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

तुम्ही बारावी परीक्षा सायन्स घेऊन पास झाला आहात का❓ मग आता बारावी सायन्स नी पास झालो पण आता पुढे काय करायचे याचा विचार करत आहात का ? मग आता बारावी सायन्स नंतर करिअरचे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत हे शोधत आहात का? तर बारावी सायन्स नंतर कोणकोणते करिअर ऑप्शन आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत. आणि त्यापैकी तुम्ही तुमच्या आवडीचा इंटरेस्टचा करिअर ऑप्शन निवडून एक ब्राईट फ्युचर बनवू शकतात.

📍पहिला ऑप्शन येतो इंजीनियरिंग इंजीनियरिंग मध्ये तुम्ही सिविल इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, कंप्यूटर इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग, या ब्रांच तर आहेत. पण या फिल्डमध्ये काही नवीन ऑप्शन आहेत. त्यामध्ये, मरीन इंजीनियरिंग केमिकल इंजीनियरिंग एरोनॉटिकल अंड एरोस्पेस इंजीनियरिंग टेक्स्टाईल इंजीनियरिंग मायनिंग इंजीनियरिंग हे ऑप्शन आहेत. त्यांनतर आहे आर्किटेक्चर. जर का तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉईंग या विषयांमध्ये आवड असेल तर तुम्ही आर्किटेकचा पर्याय निवडू शकतात. हा एक छान करिअर ऑप्शन बनू शकतो. तर मार्केटमध्ये जे इंजीनियरिंगचे वेगवेगळे प्रोजेक्ट होत असतात. मेघा स्ट्रक्चर होतात, बिल्डिंग उभ्या राहतात, तर त्याचे कुठे ना कुठे ब्ल्यू प्रिंट बनवण्याचे, डिझायनिंगचा पार्ट हा आर्किटेक्ट करत असतो. तर तुम्ही या क्षेत्रांमध्ये सुरुवातीला जॉब करून एक्स्पिरियन्स घेऊन नंतर स्वतःचा एक बिझनेस करू शकता.

📍 मेडिकल सेक्टर मेडिकल सेक्टरमध्ये पण तुम्ही छान करिअर करू शकतात. त्यामध्ये एमबीबीएस मुन्नाभाई एमबीबीएस वाला नाही, तर हा एमबीबीएस जरा टफ आहे. मग येत, “बीएमएस” “बीएचएमएस” “बीडीएस” तर या प्रकारचे कोर्सेस तुम्ही करू शकतात. असे तर हे कोर्सेसचा कालावधी पाच ते साडेपाच वर्षांचा आहे. पण जर का तुम्ही सलग पास होत गेला तर! नाही तर या कोर्सचा कालावधी 6 ते 7 वर्ष पर्यंत चालू शकतो.

यामध्ये फीज पण कमीत कमी चार लाख रुपये लागते. जास्तीत जास्त 10 ते 15 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त जाऊ शकते. तर त्यामुळे जर का तुमच्या मध्ये एवढी फिज भरण्याची कॅपॅसिटी असेल आणि मुळात हुशारी असेल तरच तुम्ही या कोर्सची निवड करावी. जर तुम्ही 90 %, 95% एवढा हुशार पण नाहीये. मी एवढी लाखोची फीज कुठून भरणार असं जर का वाटत असेल.

मेडिकल मध्ये करिअर करायची इच्छा असेल तर त्याचे सुद्धा करिअर ऑप्शन्स आहेत. BVSC and B.PHARM हे दोन पर्याय आहेत. आधीच्या पर्यायापेक्षा थोडे कमी खर्चिक आणि कमी कालावधीचे पर्याय आहेत.

▪️जर का तुम्हाला प्राण्यांबद्दल आवड असेल, तर तुम्ही BVSC हा कोर्स घेऊ शकता. हा कोर्स कम्प्लीट केलं तर तुम्ही प्राण्यांचा डॉक्टर होऊ शकतात. आणि BVSC कम्प्लीट केलं तर तुम्ही प्राण्यांचे डॉक्टर होतात. आणि प्राण्यांच्या डॉक्टरची संख्याही मार्केटमध्ये बरीच कमी असते. त्यामुळे तुम्ही हा एक युनिक करिअर ऑप्शनचा फायदा उचलू शकतात.
▪️ दुसरं म्हणजे आहे, B.PHARM हा कोर्स औषध गोळ्यान बद्दल आहे. आणि “बीफार्म” केल्यानंतर तुम्हाला फार्मा कंपनी मध्ये जॉब मिळतात. आणि तुम्ही स्वतः मेडिकल शॉप टाकून बिजनेस सुद्धा करू शकता.

▪️तुम्ही बीएससी करू शकतात. बीएससी मधे अनेस्थेशिया, रेडिओलॉजी, नर्सिंग, फॉरेन्सिक सायन्स, मध्ये आणि अनेक विषयात बीएससी करू शकतात. मग तुम्ही बीएससी पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये करू शकतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, नंतर तुम्ही त्यामध्ये मास्टर करून एमएससी करून एक सक्सेसफुल टीचर सुद्धा बनू शकतात.

📍जर का तुम्हाला कुकिंग आवड असेल तर हॉटेल मॅनेजमेंट हे तुमच्यासाठी एक छान करिअर ऑप्शन ठरू शकतो.

📍जर का तुम्ही क्रिएटिव्ह माइंडेड असाल तर थोडी क्रिएटिव्हिटी असेल तुमच्यामध्ये तर इंटेरियर डेकोरेशन हा तुमच्यासाठी छान करिअर ऑप्शन ठरू शकतो. तर तुम्ही यामध्ये डिप्लोमा, डिग्री कोर्स सुद्धा आहेत ते सुद्धा निवड करू शकतात. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये तर लोक घर सजावटीवर भरपूर पैसा खर्च करतात. तुम्ही या क्षेत्रामध्ये नोकरीपेक्षा स्वतःचा बिझनेस करून भरपूर पैसा या शहरांमध्ये कमवू शकता.

📍जर का तुम्हाला कॉम्प्युटर टेक्नोलॉजी या क्षेत्रात आवड असेल. तर तुम्ही “बीसीए” “बीसीएस” सारखे तीन वर्षाचे डिग्री करून सुद्धा या क्षेत्रामध्ये डिग्री करता करता ग्राफिक डिझाईनिंग, एसटीएमएल सीएसएस, जावा, पायथान यासारखे लैंग्वेज कोर्स करू शकता. आणि हे कोर्स करून तुम्ही डेटा अनालिटीक, वेब डेव्हलपमेंट क्षेत्रात सुद्धा करिअर करू शकता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा