गहाणखत त्यालाच आपण रजिस्टर मोरगेज असे म्हणतो. रजिस्टर करत असताना काही कायदे आपल्याला माहित असणे फार गरजेचे आहे. 1) संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882. 2) नोंदणी अधिनियम 1908. 3) मुद्रांक अधिनियम पूर्वीचा मुंबई मुद्रांक अधिनियम 1958. आपण गहाणखत करत असताना या कायद्याच्या आधारे रजिस्टर मोरगेज केलं जातं.
गहाणखत म्हणजे काय : आपली शेती, जमीन, स्थावर मालमत्ता इत्यादी आपण गहाण ठेवून नोंदणीकृत करून त्यावर रक्कम घेतो व ती रक्कम मुदतीत परत करतो. आणि हे करण्यासाठी आपण जो करार करतो त्याला गहाणखत असे म्हटले जाते.
गहाणखताचे प्रकार: 1) साधे किंवा नजर गहाणखत 2) इंग्लिश गहाणखत 3) उपभोग्य गहणखत 4) सशर्त विक्रीद्वारे केलेले गहाणखत 5) हक्कलेख निक्षेपाद्वारे केलेले गहाणखत 6) विषम गहाणखत
1) साधे किंवा नजर गहाणखत: यामध्ये आपल्याला मालमत्तेचा कब्जा न देता स्वतःला बांधून घेणे होय. तसेच एका विशिष्ट कारणासाठी आपण गहाणखत करत आहे ते सर्व नमूद करावे लागते. 2) इंग्लिश गहाणखत: यामध्ये गहाण ठेवण्यात आलेली स्थावर मालमत्ता त्यांच्या ताब्यात देऊन रक्कम घेतली जाते म्हणजे त्यांना त्या स्थावर मालमत्तेचा कब्जा दिला जातो.
3) उपभोग्य गहाणखत: यामध्ये ताब्यात देण्यात आलेली स्थावर मालमत्ता किंवा जमीन त्यामधून मिळणारे भाडे व उत्पन्न तसेच मिळणारा फायदा हे रक्कमेवरील व्याजासाठी करणेत यावा असे नमूद केले जाते. 4) सशर्त विक्रीद्वारे केलेले गहाणखत: यामध्ये आपल्या मालमत्तेची तात्पुरती विक्री घेतलेली रक्कम फेडण्यास कसूर झाल्यास करणेत आलेली विक्री अबाधित राहील अशी सशर्त अट नमूद करणे होय.
5) हक्कलेख निक्षेपाद्वारे केलेले गहाणखत : अशा अन्य कोणत्याही नगरात एखादी व्यक्ती स्थावर मालमत्तेवर गहाण ठेवण्याची उद्देशाने त्या संबंधीचे हक्कलेख त्याच्या अभिकर्त्याकडे सुपूर्द करते तेव्हा त्या व्यवहारास हक्कलेख निक्षेपाद्वारे केलेले गहाणखत म्हणतात. 6)विषम गहाणखत : हे इतर नमूद केलेल्या गहाणखतापेक्षा समांतर नसेल व ते वेगळे म्हणजेच विषम असल्यास त्यास विशेष असे म्हणतात.
गहाणखताचा भंग: म्हणजेच रकमेची मुदतीत परतफेड झाली नसेल अशा वेळी गहाणखता मध्ये नमूद केलेल्या अटी शर्ती नुसार न्यायालयाच्या मार्फतीशिवाय विक्री करण्याचा व मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो. गहाणखत कोठे करावे : गहाणखत हे एक दस्तऐवज आहे ते करण्यासाठी आपल्या तालुक्या मधील दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे सब रजिस्टर ऑफिस या ठिकाणी करता येत.
गहाणखत अधिक माहिती : गहाणखत म्हणजेच आपल्या मालमत्तेवर बोजा चढविणे होय. मग तो कोणत्या प्रकारे आहे त्यानुसार आपला बोजा कमी करता येतो. आपल्याला गहाणखताबद्दल दिलेली थोडक्यात माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.