मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना माहिती असेल की, आपल्या भारत देशामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. यामध्ये सध्या 27 राज्यांची राजधानी अस्तित्वात आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की आपल्या भारत देशामध्ये असे राज्य आहे ज्याला ज्याला राजधानीच नाही. चला तर मग आपण या राजाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
आपल्या भारत देशामध्ये आंध्रप्रदेश हे असे राज्य आहे ज्याला राजधानी नाही. 2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर येथील राजकीय आणि प्रशासकीय निर्णयामुळे आज आंध्रप्रदेश या राज्यावर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती आंध्र प्रदेशचे विभाजन यानंतर तेलंगणा हे नवे राज्य अस्तित्वात आले. त्यावेळी या दोन्ही राज्यांची राजधानी हैदराबाद होती.
प्रशासकीय निर्णय असा होता की, हैदराबाद हे शहर 10 वर्षाच्या या कालावधीसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात दोन राज्यांची संयुक्त राजधानी असेल आणि हा 10 वर्षाचा कालावधी 2 जून 2024 रोजी संपलेला आहे. त्यामुळे हैदराबाद हे शहर फक्त या राज्याची अधिकृत राजधानी बनलेले आहे.
मागच्या 10 वर्षात आंध्र प्रदेश या राज्याला आपली स्वतःची राजधानी बनवायची होती, मात्र यावर आंध्र प्रदेश सरकारने आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. ज्यामुळे आंध्र प्रदेश हे राज्य आता भारतातील राजधानी असलेले राज्य बनले आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू हे पुन्हा सत्तेवर आलेले आहेत त्यामुळे अमरावती या राज्याची राजधानी असेल अशी घोषणा त्यांनी केली आहे.
तसेच विशाखापटनम या शहराला आर्थिक राजधानी आणि प्रगत असा दर्जा दिला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. 2024 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये आंध्र प्रदेश या राज्यांचा 8 वा क्रमांक लागतो. या राज्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. जिथे 65 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या शेती उद्योगांशी जोडलेली आहे.
2024 मध्ये आंध्रप्रदेश या राज्याच्या एकूण जेडीपी 14. 49 लाख करोड रुपये इतका आहे. तर आज आपण भारतातील राजधानी नसलेल्या एका राज्य बद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर अशाच प्रकारची माहिती जाणून घ्यायला आवडेल? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.