२०२१ मध्ये नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर ऑनलाईन नवीन वोटर पोर्टल वरून कसे काढावे ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो सरकारने वोटर पोर्टल बीटा (voter portal beta) नावाचे एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मतदान कार्ड संबंधित चार ते पाच प्रकारची कामे करू शकतात. आज आपण वोटर पोर्टल बीटा या पोर्टल द्वारे विनामूल्य मतदान कार्ड घरबसल्या कसे काढू शकतो हे पाहणार आहोत.

त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला voterportal.eci.gov.in या लिंक वर जायचे आहे, ही लिंक ओपन झाल्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुम्ही ट्विटर, फेसबुक, गुगल, लिंकडीन यापैकी कोणत्याही अकाउंटचा वापर करू शकता. जर तुमचे अकाऊंट नसेल आणि तुम्हाला नवीन अकाऊन्ट उघडायचे असेल तर creat an account या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचे नवीन अकाऊंट उघडू शकता

create an account या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक बॉक्स येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे किंवा तुम्ही फेसबुक द्वारे देखील लॉगीन करू शकता फेसबुक द्वारे लॉगीन करताना तिथे तुम्हाला तुमचा फेसबुक चा लॉगइन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे,

असे टाकल्यावर तुमच्यापुढे एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये continue हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे असे केल्यानंतर तुमच्यापुढे congratulations चा मेसेज येईल तिथे दिलेल्या नियम मान्य करायचे आहेत आणि welcome या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

असे केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमच, नाव राज्य आणि लिंग टाकायचे आहे त्यानंतर सर्वात पहिल्या पर्यायावर म्हणजेच new voter id या पर्यायावर क्लिक करायचे आहे, त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेल्या let’s start या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तिथे तुम्हाला दोन पर्याय विचारले जातील

ज्यामध्ये तुम्ही पहिल्यांदाच मतदान कार्डसाठी अर्ज करत आहात का असा प्रश्न विचारला असेल त्यापैकी yes I am applying for the first time जर तुम्ही याआधी मतदान कार्ड काढलेले असेल तर No, I already Have voter id या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही भारताचे रहिवासी आहात का असा प्रश्न विचारला जाईल त्यामध्ये पहिला पर्याय निवडायचा आहे,

त्यानंतर येणाऱ्या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकायचा आहे आणि verify या बटणावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर तुमचा फॉर्म भरायला चालू होईल.तिथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे,

तसेच तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुमच्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही कागदपत्रांपैकी एक कागद पुरावा म्हणून जोडायचा आहे, तो तुम्हाला दिलेल्या यादीतुन निवडायचा आहे आणि खाली दिलेल्या upload या पर्यायावर क्लिक करून तो कागद अपलोड करायचा आहे.तसेच त्या कागदपत्रांचा नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे.

त्यानंतर ज्यांचे वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना age declaration form भरायचा आहे.त्यासाठी तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि भरून अपलोड करायचा आहे.आणि त्यानंतर save and continue या बटनावर क्लिक करायचे आहे.पुढच्या पेज वर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहेत,

ज्यात तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि तुमचे लिंग निवडायचे आहे.तिथे तुमचे जे नाव आले आहे ते तुम्हाला तपासून घ्यायचे आहे जर काही बदल करायचा असेल तर तिथे आलेल्या कीबोर्ड च्या साहाय्याने तो करता येईल.त्यानंतर जर तुम्ही अपंग असाल तर खाली दिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे.

आणि पुन्हा save and continue या बटनावर क्लिक करायचा आहे.यानंतर तुम्हाला पुढे कौटुंबिक माहिती भरायची आहे.तिथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील मुख्य व्यक्तीकडे जर मतदान कार्ड असेल तर त्याचा नंबर टाकायचा आहे.तसेच त्यांच नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि खाली तुम्ही ज्यांचे नाव टाकले आहे ते तुमचे कोण आहेत तो पर्याय निवडायचा आहे.

आणि save and continue या बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर तुमचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे जो पत्ता आधार कार्ड वर असेल तोच टाकायचा आहे.आणि पिनकोड टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या find your constituency in the map या बटनावर क्लिक करायचे आहे किंवा enter your constituency manual या बटनावर क्लिक करायचे आहे.

तिथे तुम्हाला तुमच राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे.त्यानंतर assembly मध्ये तुम्ही कुठल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात मतदान करता ते निवडायचे आहे.यानंतर पुढे पुरावा म्हणून तुम्हाला तुमचा पत्ता असलेलं कोणतही एक कागदपत्रे तिथे अपलोड करायचं आहे.आणि दिलेल्या यादीतून ते निवडायचं आहे.तसेच दिलेल्या कागदपत्राचा नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि परत save and continue या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

पुढच्या पेज वर तुम्हाला declaration येईल तिथे तुम्हाला तुम्ही आधार कार्ड वर असलेल्या पत्त्यावर कधी पासून राहत आहे ते वर्ष आणि महिना टाकायचा आहे.खाली गावाचे नाव आणि अर्जदाराचे नाव टाकायचं आहे.आणि save and continue या पर्यायावर क्लिक करायचे आहे.आता तुमच्या पुढे फॉर्म 6 दिसेल ज्या मध्ये तुमची माहिती भरलेली असेल.

डाव्या कोपऱ्यात फॉर्म दुरुस्ती साठी edit form हा पर्याय आहे, जर काही चूकलं असेल ते दुरुस्त करता येईल आणि बरोबर असेल तर submit या बटणावर क्लिक करायच आहे.आता तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा मॅसेज येईल तसेच reference id /acknowledgement id तुमच्या ईमेल वर येईल.

तो आयडी वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.त्यासाठी home या बटणावर क्लिक करून track status ह्या पर्यायातील application हा पर्याय निवडायचा आहे आणि तिथे तुम्हाला ईमेल वर आलेला reference आयडी टाकायचा आहे.आणि track your status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.तिथे तुम्हाला तुमचा अर्ज कुठे आहे हे नक्की समजेल.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.