अशा प्रकारे लोथल बनलं सिंधू संस्कृतीच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

लोथाल हे प्राचीन सिंधू संस्कृतीच्या दक्षिणेकडील शहरांपैकी एक होते, जे आधुनिक गुजरात राज्यातील भाल प्रदेशात आहे. लोथाल शहराचे बांधकाम सुमारे २२०० ईसापूर्व मध्ये सुरू झाले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या सरकारी संस्थेने जे उत्खनन केले, त्यात लोथाल शहर सापडले होते.

लोथालचा शब्दशः अर्थ ‘मृतांचे ठिकाण’ असा आहे आणि डॉ एस आर राव या प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञाने १९५५ ते १९६२ या कालावधीत या जागेचे उत्खनन करून अनेक वस्तू आणि जागा शोधून काढल्या. लोथाल हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे आणि भरभराटीचे व्यापारी केंद्र होते, जिथले मणी, रत्ने आणि मौल्यवान दागिन्यांचा व्यापार पश्चिम आशिया आणि आफ्रिकेच्या दूरच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता. लोथाल मधील मणी बनवण्‍यासाठी तयार केलेली आणि धातूविज्ञानातील तंत्रे आणि साधने ४००० वर्षांपासून काळाच्या कसोटीवर टिकून आहेत.

उत्खननात इतर महत्त्वाच्या जागांमध्ये एक मोठे कोठार, एक किल्ला, लोथाल शहराचा खालचा भाग, एक मणी बनवण्याचा कारखाना आणि एक स्मशान आहे. लोथाल शहराचे स्ट्रक्चरल डिझाईन आणि टाउन प्लॅनिंग किंवा शहर रचना खरोखरच असामान्य आहे. लोथाल हे जगातील सर्वात जुने बंदर म्हणून ओळखले जाते जे विटांनी बांधले गेले होते. लोथाल शहराला पुराच्या पाण्याचा धोका असल्यामुळे तिथली घरं, व्यापार करण्याच्या जागा इत्यादी उंच फलाटावर बांधण्यात आली होती. विटांनी बांधलेले स्नानगृह, भूमिगत गटार आणि पिण्याच्या पाण्यासाठी विहीर अशा नागरी सुविधा ही तर लोथाल शहराचे वैशिष्ट्य होते.

लोथाल हे सिंधू संस्कृतीमधील एकमेव बंदर शहर आहे. वरचे आणि खालचे शहर असे दोन भाग असलेल्या शहराच्या उत्तरेला उभ्या भिंती, इनलेट आणि आउटलेट चॅनेल असलेले खोरे होते ज्याला भरती-ओहोटीचे डॉकयार्ड म्हणून ओळखले जाते. भरतीच्या वेळी पाणी मोठ्या प्रमाणात आंत येत असेल ज्यामुळे खोरे भरत असेल आणि बोटींना वरच्या दिशेने प्रवास करणे सुलभ झाले असेल.

लोथाल मधील लोकांनी शहर नियोजन, कला, स्थापत्य, विज्ञान, अभियांत्रिकी, मातीची भांडी आणि धर्म या क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय योगदान दिले. दागिने हा त्यांच्या समृद्धीचा आधार होता.

लोथाल मधील लोक अग्निदेवतेची उपासना करत. एका सीलवर चित्रित केलेली शिंग असलेली त्यांची देवता असावी असा अंदाज लावला जातो. परंतु हडप्पातील इतर वसाहतींमध्ये देवी मातेच्या पूजेचा पुरावा नाही – तज्ञांच्या मते धार्मिक परंपरांमधील विविधतेच्या अस्तित्वाचे हे लक्षण आहे. तथापि असे मानले जाते की सामान्य सिंधू-युगीन माता देवीशी साधर्म्य असणाऱ्या समुद्र देवीची पूजा काही ठिकाणी केली जात असे.

जेथे धार्मिक समारंभ आयोजित केले जात होते, तिथे खाजगी आणि सार्वजनिक अग्नि-वेदींमध्ये देखील त्याचा पुरावा सापडतो. पुरातत्व शास्त्रज्ञांनी सोन्याचे पेंडंट, टेरा-कोटा आणि मातीची भांडी यांची जळलेली राख, मणी आणि इतर चिन्हे शोधून काढली आहेत जी प्राचीन वैदिक धर्माशी संबंधित यज्ञाची प्रथा दर्शवतात. उत्खननात पशुपूजेचाही पुरावा सापडला आहे.

आज स्थानिक गावकरी वानूवती सिकोतारीमाता नांवाच्या समुद्र देवीची पूजा करतात, जे प्राचीन परंपरा आणि ऐतिहासिक भूतकाळाशी संबंध सूचित करतात. परंतु पुरातत्वशास्त्रज्ञांनी हे देखील शोधून काढले की ख्रिस्तपूर्व २००० पर्यंत ही प्रथा सोडून देण्यात आली होती. असे देखील मानले जाते की सापडलेली काही थडगी लक्षात घेता – अंदाजे १५,००० लोकसंख्येतील केवळ १७ – लोथालच्या नागरिकांनी मृतांचे अंत्यसंस्कार देखील केले. हडप्पा, मेही आणि डंब-भूती यांसारख्या इतर सिंधू संस्क्रृतींमध्ये अंत्यसंस्कारानंतरच्या दफनाची नोंद आहे.

लोथालमध्ये बनलेले तांबे अत्यंत शुद्ध आहे, त्यात ॲसिडिक घटकांचा अभाव आहे जे सामान्यतः सिंधू खोऱ्याच्या उर्वरित भागातील तांब्याच्या वस्तू बनवणारे वापरत. लोथालमध्ये शस्त्रास्त्रांचे उत्पादन खूपच कमी प्रमाणात होत असे. बाण, छिन्नी, बांगड्या, अंगठी, आणि भाल्याच्या निर्मितीसाठी कामगार तांब्यामध्ये कथील मिसळत, तरी त्यांनी कास्टिंग किंवा ओतकामासाठी प्रगत धातू शास्त्र देखील वापरले आणि पक्षी आणि प्राणी कास्ट करण्यासाठी एकापेक्षा जास्त साचे वापरले. त्यांनी नवीन साधने शोधून काढली जसे की वक्र आरे आणि त्यावेळच्या इतर संस्क्रृतींना अवगत नसलेले ट्विस्टेड ड्रिल.

भूतकाळातील प्राचीन सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणांचा पुरावा आजच्या काळात देखील सापडतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा