आपल्या जागेवरून तसूभरही न हलणारा अवाढव्य दगड, वाचा सविस्तर

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

तुम्ही कधी शीर्षासन केलं आहे कां? म्हणजे खाली डोकं वर पाय अशा स्थितीत कधी स्वतःच्या शरीराला फक्त डोक्यावर तोलून धरण्याचा प्रयत्न केला आहे कां? किंवा एखाद्या साधू सारखं एका पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे कां? नसेल तर करून बघायला हरकत नाही, पण तुम्हांला स्वतःचा तोल मात्र संभाळावा लागेल. उभं असताना किंवा चालत असतानां आपला तोल जात नाही, कारण पृथ्वीवर असलेलं गुरूत्वाकर्षण हे तुम्हांला माहित असेल.‌ पण २५० टन इतक्या अगडबंब वजनाचा दगड केवळ काही फुटांच्या पायावर न गडगडता उभा राहू शकतो, ते देखील जवळपास ८व्या शतकापासून आतापर्यंत? हे मात्र नक्कीच अतर्क्य आणि आश्चर्यकारक आहे.

“कृष्णाचा लोण्याचा गोळा”, ज्याला तमिळ भाषेत ‘वान इराई कल’ किंवा कृष्णाचा महाकाय बटरबॉल देखील म्हणतात, भारतातील तामिळनाडू राज्यातील ममल्लापुरम म्हणजेच महाबलीपुरम या ऐतिहासिक शहरामध्ये अगदी लहान पायावर विसावलेला एक अवाढव्य ग्रॅनाइट बोल्डर किंवा दगड आहे.

हा अवाढव्य ग्रॅनाइट दगड ममल्लापुरम येथील अनेक प्राचीन स्मारकांपैकी एक आहे. ७व्या-आणि ८व्या शतकामध्ये पल्लव राजवंशाने जी हिंदू धार्मिक स्मारके बांधली, त्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले, त्या वारसा स्थळांपैकी हा एक.

हा दगड अंदाजे ६ मीटर (२० फूट) उंच आणि ५ मीटर (१६ फूट) रुंद आहे आणि त्याचे वजन सुमारे २५० टन (२५०,००० किलो) आहे. हा दगड अधांतरी असल्यासारखा वाटतो आणि एका १.२ मीटर (४ फूट) उंच छोट्या टेकडीच्या उतारावर जेमतेम उभा आहे आणि कोणत्याही क्षणी खाली पडेल असा भास होतो. हा दगड १२०० वर्षांपासून त्याच ठिकाणी असल्याचे म्हटले जाते. दगडाच्या पाठीमागील काही भाग चपटा झाला आहे, ज्यामुळे तो मागच्या बाजूने अर्ध-गोलाकार खडकासारखा दिसतो, तर इतर तीन बाजूंनी तो गोल आकाराचा दिसतो.

प्राचीन युगात पल्लव राजा नरसिंहवर्मन (६३० – ६६८) यांनी हा दगड हलवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय तमिळ राजा चोल (९८५ – १०१४) याला या अवाढव्य दगडामुळे प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे ‘तंजावर बोम्मई’ नांवाच्या कधीही न पडणाऱ्या मातीच्या बाहुल्या तयार झाल्या, ज्याचा तळ अर्ध-गोलाकार आहे. प्रत्येक वेळी ह्या बाहुलीला हलकासा धक्का मारला की ती बाहुली न पडता तिच्या मूळ स्थानावर पुन्हां उभी रहात असे.

१९०८ मध्ये जेव्हां भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हां मद्रासचे गव्हर्नर सर आर्थर हॅवलॉक यांनी त्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी तो दगड त्याच्या जागेवरून हटवण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी त्यांनी सात हत्ती मागवले आणि जाडजूड दोरखंडानी तो दगड त्याच्या जागेवरून हटवण्याचा प्रयत्न केला, पण तो दगड त्याच्या मूळ जागेपासून तसूभर देखील हलला नाही.

सर आर्थर हॅवलॉक संपूर्णपणे अयशस्वी ठरले असं मात्र म्हणता येत नाही. कमीतकमी त्यांनी हे सुनिश्चित केले की कितीही शक्ती वापरली, तरीही तो दगड सहजपणे हलविला जाऊ शकत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत तो खाली घरंगळणार नाही, तसंच टेकडीच्या खालच्या बाजूस रहाणारे लोक आणि घरांना कोणताही धोका नाही.

पण त्यामुळे आणखी एका शंकेला जन्म दिला. तो दगड खरोखरच टेकडीवर उभा आहे, की त्यावर घट्ट चिकटलेला आहे? अर्थात तो दगड टेकडीवर खरोखरच उभा आहे हे लवकरच स्पष्ट झालं.

हा अवाढव्य दगड संपूर्ण जगातील पर्यटकांचे आकर्षण आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित राष्ट्रीय स्मारक म्हणून सूचीबद्ध आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा