नवीन ‘मेरा रेशन’ ॲप आले।। आता रेशनकार्ड संदर्भातील ‘ही’ कामे तुम्ही घरबसल्या करू शकता ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातून जर तुम्ही दुसर्‍या राज्यामध्ये गेला तर तिथे ही तुम्ही रेशन घेऊ शकता अणि जर दुसर्‍या राज्यातून काही माणसं आपल्या राज्यात महाराष्ट्रात येतात तर ते सुद्धा आपल्या इथे रेशन घेऊ शकतात. तर ही जी योजना आहे ती म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड.

या योजनेत आता एक ॲप्लिकेशन लाँच झाल त्या ॲप्लिकेशन च नाव आहे ‘मेरा रेशन’. मेरा रेशन या ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही कोण कोणती कामे करू शकता, त्यामध्ये काय माहिती पाहू शकता, तसेच तुमचा मेंबर आयडी कसा पहायचा त्यानंतर तुम्हाला जर महाराष्ट्रातून

दुसर्‍या राज्यात किंवा दुसर्‍या राज्यातून महाराष्ट्रात येणार असतील तर मायग्रेशन कस करायच रेशन घेण्यासाठी ही माहिती देणार आहे. प्ले स्टोअर वरील ‘मेरा रेशन’ हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. सेंट्रल एईपीडीएस टीम ने हे ॲप्लिकेशन बनवलेल आहे .

12 मार्च रोजी लाँच झाल आहे. या ॲप्लिकेशन मध्ये हिंदी किंवा इंग्लिश या भाषा तुम्ही सिलेक्ट करू शकता. होम पेज वर तुम्हाला रजिस्ट्रेशन हा पहिला ऑप्शन दिसेल या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर टाकायचा आहे.

हे सबमिट केल्यानंतर सगळे घरातले सदस्याची नाव दिसतील, तुमचं कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा राज्य मध्ये येत ही संपूर्ण माहिती मिळेल. तर इथेच तुम्हाला मेंबर आयडी अणि घरातल्यांची नाव दिसतील. जर तुम्ही महाराष्ट्र राज्य सोडून दुसर्‍या राज्यात गेला अणि तुम्हाला तिथे रेशन घ्यायच असेल तर रजिस्ट्रेशन तुम्हाला करावा लागत यालाच ONORC रजिस्ट्रेशन असं म्हणतात.

जर तुम्हाला स्थलांतर होयच असेल तर खाली असलेल्या मेंबर चा लिस्ट मधून जे घरातले व्यक्ति स्थलांतर होणार आहे त्यांची नावे सिलेक्ट करून खाली राज्यात, डिस्ट्रिक्ट यानंतर मायग्रेशन फ्रॉम म्हणजे कोणत्या महिन्यात अणि वर्षी तुम्ही स्थलांतर होणार आहात ते सिलेक्ट करायचे आहे,

त्यानंतर मोबाईल नंबर अणि मायग्रेशन चा रिमार्क की तुम्ही का स्थलांतर होताय त्याच कारण आहे तुम्ही सिलेक्ट करून हा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. दुसरा ऑप्शन आहे ‘know your entitlement’, तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे रेशन कार्ड नंबर अणि आधार कार्ड नंबर तुम्ही टाकून सबमिट करू शकता.

सबमिट केल्यावर तुम्हाला कोणते कोणते धन्य मिळत हे दिसेलआणि ते किती किलो मध्ये किती रुपयांच आहे, किती रुपयांनी तुम्हाला मिळत ही माहिती खाली दिसेल आणि अलोटमेंट अणि बॅलेंस देखील तुम्हाला दिसतो. इथे तिसरा ऑप्शन आहे

‘know your nearest ration shop’म्हणजे तुमचा जवळ कोणते रेशन शॉप आहे याच रजिस्ट्रेशन म्हणजे इथे ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे रेशन आहेत त्या रेशन दुकानदाराची नाव ऑनलाईन पाहू शकता.

इथे त्यांचा एफपीएस आयडी, डीलर नेम म्हणजेच जवळ च्या रेशन दुकानाची नाव तुम्हाला मॅप वर दिसतील. चौथा ऑप्शन आहे ONORC म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड ची योजना आहे ती कोण कोणत्या राज्यात राबवण्यात आलेली आहे ती पाहू शकता.

त्यानंतर चा ऑप्शन आहे ‘my transaction ‘यात तुमचे व्यवहार पाहू शकता. त्यानंतर आहे ‘eligibility criteria’ यात रेशन कार्ड नंबर टाकून सबमिट करायचे आहे यात तुम्हाला रिमार्क अणि स्टेटस दिसतील यात दुसरा आणि चौथा ऑप्शन yes पाहिजे.

पुढचा ऑप्शन आहे आधार सिडींग तर इथे तुम्ही तुमचा घरातल्या कोणत्या व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्ड शी लिंक आहे ते पाहू शकता. खाली सगळ्या मेंबर्स ची नाव अणि आधार सिडींगच स्टेटस दिसेल जर yes असेल तर काही करायची आवश्यकता नाही.

जर no असेल तर तुम्हाला रेशन दुकानातून लिंक करावे लागेल. हे अशे बरेच ऑप्शन तुम्ही होम स्क्रीन वर ऑप्शन आहे जिथे माहिती पाहू शकता. इथे तुम्हाला हेल्पलाइन नंबर जर काही प्रॉब्लेम येत असेल तर हेल्पलाइन नंबर 14445 ला कॉल करू शकता.

वन नेशन वन रेशन कार्ड ची योजना आपल्या राज्यात सुरू झालेली आहे या योजने अंतर्गत मेरा रेशन हे ॲप्लिकेशन लाँच झाल आहे या ॲप्लिकेशन मध्ये संपूर्ण काम अणि माहिती मिळवू शकता.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.