दिवसातले फक्त २ तास देऊन हे ५ व्यवसाय करा आणि भरपूर पैसे कमवा ।। कुठलेही नेटवर्क मार्केटिंग नाही ।। सर्वांसाठी अतिशय महत्वाची माहिती जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नोकरी करता करता आपल्याला कुठले काम म्हणजे साईड बिझनेस करता येईल का? आपण पाच असे व्यवसाय पाहणार आहोत की जे नोकरी करता करता सुद्धा तुम्ही करू शकता. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला हे साईड बिझनेस करायचे असेल तर तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल.

कारण हे तूम्हाला नोकरी सुरु असताना करायचे आहेत. हे दिसायला जरी सोपे वाटत असले तरी सुद्धा जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा अनेक आव्हाने येतील. तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर यावे लागेल. तुम्हाला कदाचित तुमची झोप कमी करावी लागेल.

काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. कारण प्रामाणिकपणे पैसे कमावण्यासाठी शक्यतो कुठलाही शॉर्टकट उपलब्ध नाहीये.

१)पहिले आहे रेफरल बिझनेस: व्यावसायिकाला आणि ग्राहकाला जोडणारा दुवा बनून कमी वेळात तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. एक उदाहरण पाहूया. आमच्या सोसायटी मध्ये एक माणूस राहतो त्याचा मित्र रत्नागिरीमध्ये हापूस आंब्याचा व्यवसाय करतो.

आमच्या सोसायटी मध्ये ६०० च्या वर फ्लॅट्स तरी असतील. त्या माणसाने सोसायटीच्या सर्व व्हॉट्स ॲप ग्रुप वर मेसेज टाकला, की रत्नागिरी चा हापूस आंबा थेट तुमच्या दारात, बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये. तुम्हाला सांगतो या आंब्याच्या सीझनमध्ये शेकडो ऑर्डर्स मिळाल्या.

या माणसाने काय केले, आपल्या रत्नागिरीच्या मित्राकडून आंबे घेऊन आम्हाला विकले. आणि मधील प्रत्येक ऑर्डर मागे पन्नास ते शंभर रुपये कमिशन कमवले असेल असा आमचा अंदाज आहे. मी स्वतः कॉलेज मध्ये असताना अशाप्रकारे पैसे कमावले आहे. माझा एक मित्र होता, कम्प्युटर असेंबल करणारा.

मी कम्प्युटर सायन्स ला असल्यामुळे मला अनेक जण कंप्यूटर विकत घ्यायच्या आधी विचारायचे. मी त्या सगळ्यांना माझ्या मित्राकडे पाठवायचो. प्रत्येक कंप्युटर मागे तो मला हजार रुपये कमिशन द्यायचा. तेव्हा तुम्ही विचार करा तुमचा असा कुणी मित्र आहे जो व्यवसाय करतो.

नसेल तरी तुम्ही कोणत्या ही व्यावसायिक बरोबर ओळख काढू शकता. आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्यांना रेफर करू शकता. हा व्यवसाय तुम्ही नोकरी करता करता आरामशीर करु शकता.

२)दुसरे आहे कन्सल्टेशन: मित्रांनो तुम्ही कुठल्याही क्षेत्रांमध्ये एक्सपर्ट असाल तर त्या क्षेत्रासाठी तुम्ही कंस्लटेशन हा पार्ट टाईम व्यवसाय चालू करू शकता. उदाहरण द्यायचे झाले म्हणजे तुमच्याकडे फायनान्स चे ज्ञान असेल, तर लोकांना तुम्ही गुंतवणूक कशी करायची याचा सल्ला देऊ शकता.

तुम्हाला फिटनेस ची आवड असेल तर तुम्ही लोकांना वजन कमी करण्यासाठी, किंवा वाढवण्यासाठी सल्ला देऊ शकता. तुम्हाला पर्स्नॉलिटी डेव्हलपमेंट ची आवड असेल तर तुम्ही कौन्सिलर बोनू शकता. त्यांना सांगू शकता स्ट्रेस कसा मैनेज करायचा. रागावर कसे नियंत्रण ठेवायचे, आनंदी कसे राहायचे वगैरे वगैरे.

तुम्हाला पेरेंटींग म्हणजे चांगले पालक कसे बनावे याविषयीचे ज्ञान असेल तर तुम्ही पालकांना कंस्लटेशन देऊ शकता. जसे मुलांवर संस्कार कसे करायचे? मुलांचे संगोपन कसे करायचे? वगैरे वगैरे. सांगायचा मुद्दा काय कन्सलटेशन हा असा व्यवसाय आहे की दिवसातले दोन तास जरी तुम्ही दिले तरी महिन्याला चांगले पैसे कमवू शकता.

३)तिसरा आहे तुमचे प्रोडक्ट ऑनलाइन विका: मित्रांनो तुम्ही एमेझौन वर किंवा ओ. एल्.एक्स. वर तुमच्या वस्तू विकू शकता. मग या वस्तू तुम्ही घरी बसून मोकळ्या वेळेत बनवले असतील किंवा मग तुम्ही अशे प्रोडक्ट शेधा की जे फक्त तुमच्या शहरातच उपलब्ध आहे. पण देशाच्या अन्य भागात सुद्धा त्याची मागणी आहे.

किंवा तुम्ही जिथे राहता तीथे होलसेल मार्केट असेल तर तिथून सुद्धा तुम्ही प्रॉडक्ट घेऊन ऑनलाईन विकू शकता. पूर्वी वस्तू विकण्यासाठी तुम्हाला दुकानाची गरज लागत होती, पण आता तुम्ही सर्व काही ऑनलाईन विकू शकता. अमेझॉन किंवा कुठल्याही ओनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट वर रजिस्टर करण्यासाठी एक प्रोसेस असते. ती प्रोसेस तुम्हाला गुगल वर किंवा युट्यूब वर मिळून जाईल.

४)चौथे आहे ट्युशन घेणे: पुर्वी पासुन चालत आलेला हा व्यवसाय आहे. पण आता सुद्धा तेवढाच डिमांडमध्ये असलेला, पैसे कमवायचा मार्ग म्हणजे ट्युशन घेणे. तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील की सुरुवातीला पार्ट टाइम म्हणून लोकांनी ट्युशन घ्यायला सुरुवात केली आणि नंतर फुल टाईम या व्यवसायामध्ये उतरले आणि भरपूर पैसे कमावले.

तुम्ही कोणत्या विषयात एक्स्पर्ट आहात? गणित, इंग्लिश, संगीत आणि तुम्ही 100 पेक्षा जास्त लोकांच्या वस्तीत राहता मग तुम्ही ट्युशनला उत्पन्नाचा दुसरा मार्ग बनवू शकता. फक्त दिवसातले दोन ते तीन तास देऊन घरातून ट्युशन घेऊन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

५)पाचवे आहे ऑनलाइन कोर्स बनवून विकणे: मित्रांनो भविष्य काळ हा ऑनलाइन असणार आहे. पण परत प्रश्न तोच येतो, की तुमचे कौशल्य कानामध्ये आहे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात एक्स्पर्ट आहात? कारण तुमचे कौशल्य लोकांची समस्या सोडवत असेल तर तूम्ही ओनलाइन कोर्स बनवून भरपुर पैसे कमवू शकता.

मग ते योगा असेल, मायक्रोसोफ्ट एक्सेल असेल, गिटार वाजवणे असेल, प्रोग्रामिंग असेल, डान्स असेल, शेअर मार्केट असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, काही ही जे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कामात येत होते. तुम्ही त्याचा कोर्स बनवून विकू शकता. मित्रांनो हे होते ते पाच साईड बिजनेसेस जे तुम्ही नोकरी करता करता सुद्धा करू शकता. हे व्यवसाय करण्यासाठी प्रचंड चिकाटी आणि मेहनतीची गरज आहे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “दिवसातले फक्त २ तास देऊन हे ५ व्यवसाय करा आणि भरपूर पैसे कमवा ।। कुठलेही नेटवर्क मार्केटिंग नाही ।। सर्वांसाठी अतिशय महत्वाची माहिती जाणून घ्या !

  1. माझा कडे इंद्रायणी राईस मिळेल कोणत्या पन राईस मिळेल आता मला कसा बिझनेस करायचा आहे मग कसा करू हे तुम्ही सांगु शकता का

Comments are closed.