असा भरा MHADA LOTTERY 2021-22 Application Form Online ।। म्हाडा लॉटरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, PM आवास योजना बद्दल महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

म्हाडा अंतर्गत 4222 घरांची लॉटरी निघालेली आहे. ही लॉटरी पुणे जिल्ह्यात आहे. या लॉटरी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जी लोक आहे ती अर्ज करू शकतात. सामान्य लोकांसाठी ही घरांची लॉटरी असते. या लॉटरी मध्ये आता आपल्याला प्रश्न पडेल की म्हाडा लॉटरी नक्की काय आहे तर म्हाडा योजने अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र शासना अंतर्गत घरे बनवली जातात आणि ती घरे तुम्हाला स्वस्त दरामध्ये दिली जातात. ही घरे अत्यंत चांगली असतात. तर आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि त्यात अत्यंत महत्वाची काय काय माहिती असते, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, पात्रता नक्की काय आहे ह्याची संपूर्ण माहिती घेवूयात.

फॉर्म भरण्या अगोदर काही गोष्टींची माहिती करून घेणं हे अत्यंत गरजेचे आहे ती माहिती तुम्ही समजून घ्या. ती जी जाहिरात आहे महाराष्ट्र शासनाने दिलेली त्यांच्या वेबसाईट वरून ती डाउनलोड करून घ्या. म्हाडाचा जो प्रोजेक्ट आहे तो अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्हाला यातील पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. कारण काही प्रॉब्लेम झाले तर कोणी मदत करत नाही. 4222 घरे या प्रकल्पात आहेत त्याला आपण फ्लॅट्स देखील म्हणू शकतो.

पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणताही की जो महाराष्ट्रात 15 वर्ष झाले राहिलेला लाभार्थी असेल ॲपलिकंट असेल तो अर्ज करू शकतो. स्त्री किंवा पुरुष कोणीही अर्ज करू शकतो. ज्याला पुण्यात घर पाहिजे आहे असे सर्व अर्ज करू शकतात. अतिशय स्वस्त दरात घर मिळतात. त्यासाठी जी जाहिरात आलेली आहे तिची पिडीएफ डाउनलोड करून घ्या आणि त्यात काय काय पहायचं हे समजून घ्या. ऑनलाईन अर्ज आणि रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे.

अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती म्हणजे 16/12/2021. पुर्णत: खूप असा हा कालावधी आहे. ऑनलाईन पेमेंटचा देखील ऑप्शन तिथे आहे. ऑनलाईन पेमेंट आहे ते म्हणजे बुकिंग अमाऊंट आहे. आता बुकिंग अमाऊंट ही तुमचा उत्पन्नाचा गट आहे, त्या इन्कमच्या दरामध्ये बुकिंग अमाऊंट ही कमी जास्त आहे. 5हजार पासून ते 20 हजार पर्यंत अशी ही अमाऊंट असते, आणि ही अमाऊंट तुम्हाला भरायची असते. परंतु तुमचा जर लॉटरी मध्ये नंबर नाही लागला तर ती तुम्हाला परत सुध्दा मिळते. आणि जर नंबर लागला आणि लागल्यानंतर जर तुम्हाला वाटल की ही लॉटरी आपल्याला नको आहे तरी सुध्दा तुम्हाला 50% अमाऊंट ही रिटर्न मिळू शकते हे.

बुकिंग अमाऊंट भरण्याची शेवटची तारीख आहे 17/12/ 2021 पर्यंत तुम्ही करू शकता. ऑनलाइन पद्धतीने भरू शकता. आरटीजीएस आणि एनएफटीए तुम्हाला काय करायचे असेल किंवा बँके द्वारे तुम्ही जे आहे ते करू शकता. तिथे हे ऑप्शन देण्यात आलेले आहे. त्यानंतर जर तुम्हाला येथे आरटीजीएस, एनएफटीए करायची असेल तर 22/12/2021 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर सोडतीचा प्रारूप यादी आहे, प्रारूप यादी मध्ये ज्यांनी ज्यांनी ऑनलाइन सगळे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचा फॉर्म बरोबर आहे तर त्याचे प्रारूप यादी लागणार आहे, यादी 28/12/2021 ला लागणार आहे.

त्यानंतर एक अंतिम यादी लागणार सोडती स्वीकृत अर्जाची. अंतिम यादी अशी असणारे की ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती बरोबर आहे आणि तुम्ही लॉटरीसाठी एलिजिबल आहात. तर ती यादी 04/01/2022 ला लागणार आहे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर लॉटरीचा रिझल्ट ज्याला सोडदिवस असे म्हणतात. 07/01/2022 ला लॉटरी लागणार आहे. लॉटरी लागणार म्हणजे काय होणार तर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे त्यामध्ये सगळे फॉर्म चेक होणार. आणि लॉटरीमध्ये म्हणजे कम्प्युटर द्वारे असते. ज्यांचं नाव लागेल त्यांना फक्त घरे भेटणार.

लॉटरी लागे पर्यंत आपण काय काय प्रोसेस करायची ती आपण पाहुयात. सर्वात पहिल्यांदा आता या लॉटरीमध्ये तुम्हाला घरे आहे. घरांमध्ये तुम्हाला येथे अ,ब,क,ड, हे चार ऑप्शन आहेत. तर या चार ऑप्शन मध्ये तुम्ही कोणत्या ऑप्शन मध्ये येता कोणत्या गटांमध्ये येतात ते लक्षात ठेवा. आता या गटामध्ये पहिला गट आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये तुमचे कमी होणार आहेत. अडीच लाख रुपये प्रधानमंत्री योजना अंतर्गत तुम्हाला मिळतात ते तुमच्या घर असेल किंवा फ्लॅट असेल त्याच्या मधून कमी होणार आहे.

तरी यामध्ये इडब्ल्यूएस गट येतो तर त्याला आपण अत्यल्प उत्पन्न गट म्हणतो. तर यामध्ये लक्षात ठेवा ज्यांचं उत्पन्न 25 हजारांपर्यंत आहे मासिक ते इथे येणार आहेत. ईडब्ल्यूएस गटामध्ये तर त्यांच्यासाठी बुकिंग अमाऊंट आहे 5 हजार आणि फार्मची फी आहे 590 असे एकूण 5590 रुपये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. पहिला गट आहे ज्यांचं उत्पन्न महिना 25000 आहे. दुसरा गट आहे ज्यांचं मासिक इन्कम 25 ते 50 हजार आहे याला एलआयजी गट म्हणतो. तिसरा गट आहे ज्यात एमआयजी गट आहे त्यात 50 हजारच्या पुढचे येतात. आता पहिला जो गट आहे त्यांचं मासिक इन्कम रुपये 25000 आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत.

25 ते 50 हा एलआयजी गट आहे. तिसरा जो गट आहे सर्वसमावेश गृहनिर्माण योजना 20%. त्यात सुध्दा 2 गट केले आहे. एक म्हणजे म्हाडा गृहनिर्माण योजना आणि दुसर म्हणजे सर्वसमावेश गृहनिर्माण योजना. यात योजनेअंतर्गत सांकेतिक क्रमांक, योजनेचं नाव दिलेलं आहे. सदनिकेची किंमत दिलेली आहे. सदनिका म्हणजे घर. घरांची सर्व माहिती दिलेली आहे, त्या घराचा सर्व्हे नंबर दिला आहे, त्याचा स्कीम कोड दिला आहे, तर त्यात योजनेचं नाव आणि माहिती तुम्ही पाहून घ्या त्या वेबसाईट वर. आणि त्यावर आपल्याला समजेल कोणकोणती घरे आहेत, कोणकोणत्या ठिकाणी आहेत, तुम्ही कोणत्या गटामध्ये येता हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल.

तुम्ही पाहिलं तर कमीतकमी सात लाखापासून प्रधानमंत्री आवास योजनेत घरे आहेत. आणि त्यानंतर जी घरे आहे तुम्हाला कमी दरात भेटतात. सात लाखपासून पुढे एलआयजी, एमआयजी मध्ये ही घरे आहेत. यामध्ये 7 लखापासून ते 15 लाख, 10 लाख, 12 लाख, 16 लाख, 17 लाख, 18 लाख, अशा प्रकारची किंमत आहे. जे की तुमच्या उत्पन्न वरती तुमचं महिन्याला उत्पन्न किती आहे? त्यानुसार घरे तुम्हाला ही दिली जातात. तर त्याचे लोकेशन कुठे कुठे आहे ते पहा. तो स्किन कोड पहा तो तुम्हाला आवश्यक आहे. फॉर्म भरताना हा कोड अत्यंत महत्वाचा आहे.

दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. तुम्हाला एक फॉर्म भरताना ऑप्शन आहे “एफसीएफएस” (फर्स्ट इन फर्स्ट सर्व्ह) यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मिळतं. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य का मिळत? तर तुमच्या नावावरती आधीच एखादं घर असेल, तरीसुद्धा तुम्ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मध्ये अर्ज करू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा. पण ज्यांच्या नावावरती गाळा नाहीये, ज्यांच्या नावावरती घर नाहीये, अशा व्यक्ती साठी येत ते म्हणजे, म्हाडा गृहनिर्माण योजना असे दोन ऑप्शन तुम्हाला येतात.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यात कोणीही अर्ज करू शकत. यामध्ये लोकेशन कोठे आहे, फ्लॅटची किंमत किती आहे, कोणत्या गटासाठी जे आरक्षण आहे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती आहे, त्यानंतर भटक्या जमाती, विमुक्त जमातीसाठी, पत्रकारासाठी, गोवरमेंट एम्प्लॉय असतील त्यांसाठी, ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. कोणासाठी किती घरे आहेत हे त्यावरून आपल्याला समजेल तसेच तिथं त्याची संख्या ही दिलेली आहे. आता आपण पाहुयात ऑनलाईन अर्ज कसा करायचा व त्याचे पात्रता निकष. तसेच नक्की पात्र कोण आहे? कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ही माहिती आपण समजून घेणं गरजेचं आहे.

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचा पॅन कार्ड लागेल, तुमचा आधार कार्ड लागेल, आणि बँकेचा अकाउंट व कॅन्सल चेक लागेल. बँकेचा चेकबुक किंवा पासबुक तुम्हाला अपलोड करावे लागेल हे बेसिक माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे कारण फॉर्म भरताना तुम्हाला हे सर्व लागणारे आहे. आणि एक पासपोर्ट साईज फोटो. त्यांनतर फॉर्म भरले नंतर एक महिन्याने लॉटरी आहे मग त्यावेळी कोणकोणते डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत ते तुम्ही समजून घ्या.

तर इथे आवश्यक कागदपत्रे पाहू कोणकोणती आहे. आवश्यक कागदपत्रे आहेत तर, डोमासाईल सर्टिफिकेट लागणारे म्हणजे पंधरा वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहता तेच फक्त यासाठी अर्ज करू शकतात या योजनेसाठी या घरांसाठी. त्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्षे महाराष्ट्राचा अधिवास दाखला लागणारी आपण डोमासाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे. दुसर जे आहे ते म्हणजे उत्पन्नाचा पुरावा(इन्कम सर्टिफिकेट). तुम्हाला तुमच्या गटानुसार तुम्ही जे उत्पन्न फॉर्म मध्ये टाकलेल आहे, कोणता गट सिलेक्ट केलेला आहे त्यानुसार तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणारे.

जर तुम्ही शेतकरी असाल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखल(इन्कम सर्टिफिकेट) ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या कंपनी कडून इन्कम सर्टिफिकेट काढून घ्lयाचे आहे. तुम्ही वर्षभर किती कमवता त्याचे इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत. ज्यावेळेस तुमच लॉटरी मध्ये नाव लागत त्यावेळी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय होतात. डॉक्युमेंट व्हेरिफय झाल्यानंतरच तुमची पुढची प्रोसेस असते, नाहीतर अन्यथा कॅन्सल होतो तुमचा अर्ज. त्यानंतर पुढचे राखीव गट असतील म्हणजे अपंग असतील किंवा गव्हर्मेंट एम्प्लॉय असतील, एक्स-सर्व्हिसम्यान असतील, त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये गट आहेत.

ते सुद्धा तुम्ही डाउनलोड केलेल्या पीडीएफ फाईल मध्ये पाहू शकता. त्यानंतर अर्जदार किंवा अर्जदाराची पत्नी असेल, किंवा पती असेल किंवा मुले असतील. त्यांच्या नावे घर नसले पाहिजे, गाळा नसला पाहिजे. जर तुम्ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मधून अर्ज करत असाल तर याची गरज नाही. म्हणजे तुमच्या नावावर काही घर वैगरे असेल तर तुम्ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मधून अर्ज करू शकता. आता महत्वाचं म्हणजे पात्रता काय आहे? पहिली पात्रता म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या व्यक्ती पाहिजे.

पूर्ण महाराष्ट्र मधून तुम्ही पुणे जिल्ह्यासाठी जे सदनिका आहे तिथे अर्ज करू शकतात. हे झाल्यानंतर 18 वर्ष कमीत कमी कम्प्लीट पाहिजे हे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे इथे मात्र ते संबंधित संकेतस्थळावर ती जारी केलेली सर्व माहिती देण्यात आलेली आहे की तुम्ही पाहून घ्या. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे असतील त्यांच्या कडे जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्यानंतर अजून इतरत्र जी माहिती तुम्हाला हवी असेल ती तुम्ही डाउनलोड केलेली पीडीएफ आहे त्यातून समजून घेवू शकता.

तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण पाहुयात. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम (lottary.mhada.gov.in) या वेबसाईट वर जायचं आहे. त्यांनतर वेबसाईट वर तुम्हाला पुणे, कोकण, औरंगाबाद असे लॉटरी दिसतील. तर यातली पुणे लॉटरी 2021 या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यांनतर तुम्हाला वेब वर तुमच अकाऊंट बनवणे गरजेचे आहे. तर रजिस्टर ऑप्शन वर क्लिक करायचे आहे व तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. तुमचं जर ऑलरेडी अकाऊंट असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता.

हे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाले नंतर रजिस्ट्रेशन, लॉटरी ॲप्लिकेशन आणि पेमेंट अशा 3 गोष्टी तुम्हाला करायचे आहे. पहिला स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं लोगिन आयडी बनवायचा आहे. पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. युजरनेम तयार करा पासवर्ड तयार करा. जी जी माहिती फॉर्म मध्ये रजिस्टर करताना विचारली आहे ती अगदी योग्य पद्धतीने भरा आणि सर्व बेसिक माहिती भरून झाले नंतर सबमिट बटण वर क्लिक करायचे आहे. सबमिट केले नंतर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला एकदा कन्फर्म करणेसाठी विचारतात.

जी माहिती तुम्ही टाकली आहे ती बरोबर टाकली आहे का हे पाहून पुढे स्टेप करा. नाही तर तुम्ही बॅक ऑप्शन करून काही बदल (एडिट)करायचे असतील तर ते करू शकतात. जर तुमची माहिती बरोबर आहे तर तुम्ही सबमिट करून तिथे जो कॅप्चा(captcha) कोड येईल तो टाकून कन्फर्म ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यांनतर तुम्ही जो मोबाईल नंबर फॉर्म मध्ये टाकलं होता त्यावर एक व्हेरिफिकेशन कोड (OTP) येईल. तो 5 मिनिट व्ह्यालिड राहील तो otp तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि ओके ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. Otp व्ह्यालिडेट झाले नंतर तुम्हाला एव्हरेज मंथली इन्कम टाकायचा आहे.

तो तुम्ही फॅमिली इन्कम किंवा घरातील जी कमावती व्यक्ती आहे तिचा मंथली इन्कम भरू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन नंबर टाकून नंतर तुम्हाला पुन्हा तो व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय झाल्या नंतर तिथे ऑटोमॅटिक तुमच नाव येवुन जाते. नाव आल्यानंतर ते चेक करून तुम्हाला एक पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर खाली जी काही बेसिक माहिती विचारली आहे ती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. जस की, तुमचा आधार कार्ड नंबर, मॅरेज स्टेटस, जेंडर, वैगरे हे सिलेक्ट करायचा आहे. त्यांनतर तुम्हाला विचारलं असेल तो ऍड्रेस टाकायचा आहे.

त्यानंतर कंट्री बरोबर आहे का चेक करायची. स्टेट चेक करायचा आहे. जिथे तुम्ही राहता ते जिल्हा तुम्हाला येते टाकून द्यायचा आहे. त्यांनतर तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचा तालुका तिथे सिलेक्ट करायचा आहे. त्यांनतर तुमच्या गावाचे नाव विचारले जाईल ते तुम्ही तिथे सिलेक्ट करा. त्यांनतर कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मोबाईल नंबर चेक करायचा बरोबर आहे का, त्यानंतर तिथे टेलीफोन नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकु शकता. आणि त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकायला विसरायचं नाही. त्यांनतर तुम्हाला तुमच्या बँकेच्या डिटेल द्यायचे आहे. सर्वप्रथम लक्षात ठेवा. बँक अकाउंट ऑफ ॲप्लिकॅन्ट चेक.

म्हणजे इथे तुम्ही चेक अपलोड करू शकता. किंवा पासबुक अपलोड करू शकता. चेक अपलोड करताना कॅन्सल चेक अपलोड करा त्याच्यावरती कॅन्सल लिहा. आणि त्यानंतर तुम्हाला जे अकाउंट नंबर विचारले आहे ते तुम्ही तिथे टाका. कारण जर लॉटरी मध्ये तुमच नाव नाही आल तर ती अमाऊंट रिफंड मिळणार आहे. आयएफसी नंबर, अकाऊंट नंबर, ही सगळी माहिती टाका. तर ही सर्व बेसिक माहिती, ऍड्रेस, बँकेचे डीटेल्स हे सर्व भरून झाले नंतर तुम्हाला आता चेक किंवा बँक पासबुक अपडेट करून कन्फर्म करायचे आहे.

आणि कॅप्तचा (Captcha) टाकून तुम्हाला ही माहिती सबमिट करायचे आहे. सबमिट केल्या नंतर सगळी माहिती तुम्हाला पुन्हा एकदा तपासून पहायची आहे व कन्फर्म करायची आहे. कन्फर्म ऑप्शन वर क्लिक केले नंतर आपला फॉर्म कन्फर्म होईल व आपला फॉर्म हा पेंडींगला जाणार आहे. पेंडिंग वेरिफिकेशन म्हणजे जे पॅन कार्ड नंबर आणि तुमचं बँक अकाऊंट असेल आणि फोटो असेल हे सगळं तुमच ॲप्रूवला जाणारे. आणि चोवीस तासाच्या आत मध्ये तुमचं ॲप्रूवल पूर्ण होणारे. तर आपण चोवीस तासानंतर येथे लॉगिन करणार आहोत. लॉगिन करण्यापूर्वी त्या स्लाईड वर खाली स्क्रोल करून “स्कीम फॉर पुणे बोर्ड लॉटरी 2021 व्ह्यू ऑल स्कीम” या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

कारण कोणकोणत्या स्कीम आहेत व त्यात काय माहिती आहे हे माहीत असणे तुम्हाला गरजेचे आहे. स्लाईड ओपन झाले वर तिथे उजव्या बाजूला स्कीम वर क्लिक करायचे आहे. हे स्कीम कोड अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्कीम कोड येथे दिलेले आहे. आता या स्कीम कोड वर क्लिक केले नंतर तुम्ही पाहू शकता की तिथे स्कीमच नाव, लोकेशन, इकॉनॉमिक्स ग्रुप, आणि इतरत्र सर्व माहिती आलेली दिसेल. हे चेक केले नंतर तुम्ही त्या लोकेशन वर जावून एकदा चेक करून घेवू शकता. तो फ्लॅट कसा आहे, एरिया काय आहे अशी सर्व माहिती तुम्ही घेवू शकता.

तिथे गेल्यानंतर तुम्हाला फ्लॅट दाखवला जाईल. तिथे जे कोणी असेल ते तुम्हाला फ्लॅट दाखवतील तर डायरेक्ट तुम्ही त्या फ्लॅटमध्ये जाऊ शकतात. तर तुम्ही पाहून घ्या. आता 24 तासानंतर लॉगिन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते आपले प्रोफाईल असेल, पॅन कार्ड असेल, बँक अकाउंट असेल, सर्व ॲप्रूवल झालेला आहे. तुम्हाला येते लिहून सुद्धा आलेला असेल की तुम्ही आता ॲपलाय करू शकता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहे. त्यांनतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील.

पहिला ऑप्शन आहे “एफसीएफएस” प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. यामध्ये कोण ॲपलाय करू शकतो, तर ज्यांच्याकडे अगोदर काही घर वगैरे नावावर असेल तर ते त्यावर ॲपलाय करू शकता. पण जे नॉर्मल लोक आहे ज्यांच्या नावावरती घर वैगरे नाहीये तर ते दुसऱ्या ऑप्शन वर क्लिक करू शकतात. ज्यांना घराची आवश्यकता आहे ज्यांच्या नावावर अगोदर कोणतेही मालकीहक्काचा गाळा नाही. त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे. दुसरी स्टेप आहे आपली लॉटरी ॲप्लिकेशन यामध्ये तुम्हाला स्कीम दिसेल ॲटोमॅटीकली. जो तुमचा इन्कम ग्रुप असेल एलआयजी, एमआयजी जे काही असेल ते तुम्हाला इन्कम ग्रुप इथे दिसेल.

दुसरा ऑप्शन तुम्हाला स्किम कोड सिलेक्टवकरायला विचारेल. तर तुम्हाला तिथे की सर्च ऑप्शन दिलेलं आहे. तर आपण जो इन्कम ग्रुप सिलेक्ट केलेलं आहे त्यावरून आपल्याला तिथे ऑप्शन हा येतो. त्यातील कोड चे लोकेशन, सदनिका पाहून तुम्ही कोड सिलेक्ट करा आणि ओके वर क्लिक करायच आहे. तुमचं लोकेशन इथे सीलेक्ट झाले आहे. त्यानंतर कॅटेगरी हा ऑप्शन येतो. तर आपली जी कोणती कॅटेगरी आहे आपण ती सिलेक्ट करावी. त्यानंतर खाली प्रधानमंत्री आवास योजना स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे का? जर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल असेल तर तुम्हाला “येस” ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.

आणि प्रधानमंत्री आवास योजनाचा जो नंबर आहे त्या ठिकाणी टाकायचे आहे. आणि रजिस्टर नसेल केलं तर “नो” ऑप्शन वर क्लिक करू शकता. काही अडचण नाही नंतर सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन बँकेतर्फे करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही लोन घेणार आहात तर तिकडे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना रजिस्ट्रेशन करू शकता. नंतर तुम्हाला डिटेल्स विचारले जातील. की आता तुम्ही जिथे राहत आहे ते तुमच्या स्वतः चे घर आहे का भाड्याने राहता ते टाकायचं आहे.

तुम्ही मालक असला तर तुमच नाव टाकायचं आहे. आणि भाड्याने राहत असाल तर तुमच्या मालकाचे नाव टाकायचं आहे. त्यांनतर अर्जदार किती वर्षांपासून महाराष्ट्रात राहतो ते वर्षे ते किती टाकायचे. त्यानंतर तुम्हाला पुढचा मुद्दा विचारला जाईल की जो अर्जदार आहे त्याने किंवा त्याच्या कुटुंबाने दुसऱ्या कोणत्या स्कीम साठी अर्ज केला आहे का. केलं असेल तर “येस” या बटनवर क्लिक करा, अन्यथा “नो” वर क्लिक करा. त्यांनतर फॅमिली मेंबरचे नाव आणि पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. हे नाही टाकलं तरी चालून जात. जर तुम्ही एकटे व्यक्ती असेल तर हे सोडुन द्या. त्यांनतर ॲप्लिकंट डिटेल्स मध्ये म्हाडा काय करत तर बँकेला तुमची डिटेल्स पाठवत आणि त्यानंतर तुम्हाला जर बँकेकडून कॉल हवा असेल बँकेकडून लोन हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन आहेत.

लोन फेवर करायचं असेल तर “येस” ऑप्शन वर क्लिक करा. आणि तुमचे कॉन्टॅक्ट डीटेल्स हे बँकेला जाणार आहेत. तर तुम्ही हे ऑप्शन “येस” करू शकता किंवा “नो” करू शकता. तुम्ही “येस” केलं तर तुम्हाला कॉल वैगरे येतील. “नो” केलं तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही बँकेतून लोन करू शकता. त्यानंतर एग्ग्री वर क्लिक करायचे आहे आणि प्लेस टाकायचे आहे. आणि त्यांनतर तुम्ही यकधी ॲपलाय केलं असेल लॉटरी साठी तर तिथे एक ऑप्शन येईल तुम्हाला “वॉन्ट टू प्रोसेड” जर आधी लॉटरी साठी ॲपलाय केलं असेल तर त्यावर क्लिक करा. नसेल केलं तर तो ऑप्शन सोडून द्या. त्यांनतर कॅप्तचा(captcha) कोड आहे तो तुम्हाला टाकायचं आहे.

आणि सबमिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. सबमिट केले नंतर संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायला येईल ती संपूर्ण माहिती चेक करून कन्फर्म करा. कन्फर्म केले नंतर एक एसएमएस बॉक्स येईल तो स्किप करायचा आहे तुम्हाला. स्कीप केले नंतर तुमचा फॉर्म ओपन होईल आणि तिथे दिसेल की तुमचा फॉर्म कंप्लीट भरून झालेला आहे तुम्ही प्रिंट सुध्दा काढू शकता. त्यांनतर तीसरी स्टेप येते ते म्हणजे पेमेंटचा ऑप्शन येतो. तर तिसरी कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला “पे”(Pay) हा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला पेमेंट दिसेल तुम्ही जो स्कीम कोड निवडलेला आहे, जे लोकेशन निवडलेला आहे त्याचा किती आहे, जीएसटी किती आहे, रजिस्ट्रेशन फी किती आहे, आणि बुकिंग अमाऊंट हे सर्व असते.

जर तुमचा नंबर नाही लागला तर यातली अमाऊंट जी आहे ती माघारी भेटती. तर “कन्फर्म पे ऑनलाइन” या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचे. ऑनलाईन करू शकता, ऑफलाइन आरटीजीएस, एनएफटी ने करायच आहे तर ते देखील करू शकता. जर ऑनलाईन ने करताय तर तुमचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, जे काही असतील त्याचे डिटेल्स असतील ते तुम्हाला येथे टाकायचे आहेत आणि त्यानंतर “मेक पेमेंट” ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. तुमचे पेमेंट असेल त्याच्यावर ती (otp) येईल तुमची बँक अकाउंट वरती पाठवण्यात येईल. त्यांनतर तुमचे जे पेमेंट आहे ते तुम्हाला सक्सेसफुल करायचे आहे. तर otp टाकून व्हेरीफाय करा.

आणि जर पेमेंट अडकले तर 24 तास थांबा काही प्रॉब्लेम नाही. ऑटोमॅटिकली नंतर ते सक्सेसफुल होत. तर पेमेंट सक्सेसफुल झाले नंतर तुमचा फॉर्म पूर्ण भरून कंप्लीट सक्सेसफुल झालेला आहे. आता तिथे तुम्हाला पेमेंट रिसिव्ह अस दिसेल आणि पेमेंटची जी स्लीप आहे ती प्रिंट करून घायची आहे. तर तुम्ही इंग्लिश किंवा मराठी यापैकी एक सिलेक्ट करून तुम्ही प्रिंट घेवू शकता. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. तर अशा प्रकारे आपल्या फॉर्म च्या पूर्ण स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत, संपूर्ण फॉर्म, पेमेंट, आणि माहिती पूर्ण झालेलं आहे.

तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरून घेवू शकता आणि फॉर्म भरल्यानंतर पेमेंट करा. त्यांनतर आपल्याला प्रतीक्षा करायचे आहे लॉटरीची. लॉटरीचा दिनांक आहे 07/01/2022. रोजी तुमची लॉटरी लागेल. ही लॉटरीच आहे ते तुम्हाला सकाळी दहा वाजता ऑनलाईन लाईव्ह च्या माध्यमाने सुद्धा बघू शकता. किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. तर तुम्ही सर्व ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला वेट करायचा आहे म्हणजे 07/01/2022 ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन लॉटरी लागेल.

लागल्यानंतर तुम्हाला एसएमएस येईल. तुमचं नाव लागला असेल तर एसएमएस येईल, ईमेल सुद्धा तुम्हाला येईल. आणि त्या ईमेल मध्ये सर्व माहिती दिलेली असेल तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या स्कीमला, ज्या सदनिकेला फॉर्म भरलाय त्याठिकाणी जावून भेट देवून या. भेट दिल्यानंतर ते लोकेशन पहायचं आहे, तो फ्लॅट पहा, ते तुम्हाला आवडत आहे का नाही हे चेक करा, आणि त्यानंतरच तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. लॉटरी मध्ये नाव लागेल. नाव लागल्या नंतर तुमच्याकडे काही दिवस असतील ज्यामध्ये तुम्हाला 10 ते 20% अमाऊंट असते 1 ते 2 लाख रुपये जे असतील ते तुम्हाला पहिल्यांदा भरावे लागतील. म्हणजे तुम्हाला एक कन्फर्मेशन लेटर भेटत. म्हणजे तुम्ही या सदनिकेसाठी या घरासाठी तुम्ही पात्र आहात.

तुम्ही आता कन्फर्म झालेले आहेत, तर कन्फर्म करायला तुम्हाला एक ते दोन लाख रुपये तुम्हाला भरावे लागतात. हे पैसे भरल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन कराव लागत. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होतं तुम्हाला सगळे डॉक्युमेंट घेऊन पुण्याचे जे म्हाडाचे ऑफिस आहे तिथे जावे लागते. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स दाखवावी लागतात. सगळे डॉक्युमेंट व्हेरिफाय होतात. व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कॅन्सल होऊन जातात.

आणि तुम्ही जे बुकिंग अमाऊंट असेल ते आणि ते 10 टक्के रक्कम ते तुम्हाला भेटून जात. बुकिंग अमाऊंट 50 टक्के भेटते. आणि हे 2 ते 3लाख रुपये भरले असतील ते संपूर्ण तुम्हाला भेटून जातात. पण जर तुमचा नंबर लागेल डॉक्युमेंट बरोबर असतील व्हेरिफाय होतील तर तुम्हाला पुढची प्रोसेस साठी तुम्हाला बोलावलं जातं. तुमची जर सगळी रक्कम तयार असेल 8 ते 10 लाख रुपये तर तुम्ही ते भरू शकता. जर तुम्हाला लोन करायच असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेतून करू शकता. आणि ते लोन बँक म्हाडाला देते आणि घर तुमच्या नावावर होत.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

3 thoughts on “असा भरा MHADA LOTTERY 2021-22 Application Form Online ।। म्हाडा लॉटरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, PM आवास योजना बद्दल महत्वाची माहिती !

Comments are closed.