जमिनीची खातेफोड कशी आणि कोणत्या प्रकारे करायची? कोणत्या कायद्यानुसार ती केली जाते? जमिनीची खाते फोड करताना कोणकोणत्या अडचणी असतात? जमिनीची खाते फोड करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? कोणाकडून जमिनीची खातेफोड करून घेतली जाते? या सगळ्याची सविस्तर माहिती !

अर्थकारण शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे जमिनीची खातेफोड कशी आणि कोणत्या प्रकारे करायची? कोणत्या कायद्यानुसार ती केली जाते? जमिनीची खाते फोड करताना कोणकोणत्या अडचणी असतात? जमिनीची खाते फोड करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? कोणाकडून जमिनीची खातेफोड करून घेतली जाते? या सगळ्याची सविस्तर माहिती.

कित्येक लोकांची अद्याप खातेफोड झालेली नाही हे जर का असेच पुढे चालू राहिले तर भावी पिढीला त्याची कितपत आवड असेल हा एक प्रश्न म्हणावा लागेल. आपल्या हिताची जमीन आपल्या वारसांना मिळावे या सकारात्मक भावनेने खातेफोड महत्वाची आहे.

जमीन महसूल अधिनियमानुसार तहसीलदारांना महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण अधिनियम 1947 च्या कायद्यात बांधील राहून शेत जमिनीचे वाटप करण्याचा अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार कायद्याने देण्यात आला आहे.

मात्र त्यासाठी संबंधित सहधारकांनी विनंती अर्ज करणे, सदर जमिनीवर कोणाचा हक्क, अधिकार आहे का हे पडताळून पाहण्यात प्रसिद्धी देऊन हरकती मागवून व संमती घेऊन जमिनीचे वाटप केले जाते आणि संमतीविना जमिनीचे वाटप करण्याचा आदेश देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे.

सार्वजनिक हिस्सेभागीत जमिनीचे खाते फोड करणे तेवढे सोपे नाही. जेवढे हिस्सेदार आहेत त्यांना प्रथम एकत्रित करून उद्देश समजावून सर्वांना पटेल असे खाते वाटप करावे. त्यासाठी कोणीतरी हिस्सेदाराने मेहनत घेणे भाग आहे. संबंधित जमिनीच्या वाटपासाठी शेतकऱ्यांनी सर्व हिस्सेदारांच्या संमतीचा विनंती अर्ज तहसीलदारांकडे करावा.

कोर्ट फी स्टॅम्प लावावा व त्यासोबत गावच्या तलाठ्याकडून चालू सात बारा उतारा आणि त्यावर नोंद असणाऱ्या सर्व जमिनीचे सातबारा उतारा ची प्रत जोडावी. कुटुंब मोठे असल्याने जमिनीचे वाटप कशा प्रकारे करणार याची सविस्तर माहिती अर्जात लिहावी.

जमिनी वाटपाबाबत हरकत नसल्याचा सर्व हिस्सेदार यांच्या अर्जावर सह्या घेणे आवश्यक आहे. खातेदारांच्या पत्नीचीही अर्जावर सही घेणे आवश्यक आहे. अज्ञात व्यक्तीच्या बाबतीत पालन करते तिची संमती घ्यावी. जमीन वाटपात बहिणींना हिस्सा द्यावा लागतो.

तो जर का त्यांना नको असेल तर मात्र त्यांचे हक्क सोडण्यास तहसीलदारांकडे जबाब देऊन सह्या कराव्या लागतात. सातबारा उताऱ्यावरील बहिणींची नावे हक्क सोडण्याची प्रत मिळाल्यावर हक्कातील नोंदी कमी करतो. त्यानुसार फेरफार नोंद तलाठी करतो.

अर्थातच बहिणींची नावे कमी केली जातात. सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा असेल तर ज्या संस्थेचे कर्ज असेल त्यांचे वाटपास हरकत नसल्याचे संमती पत्र द्यावे लागते. सदर हक्कात इतर कोणाची नावे लागली असतील तर तशी त्यांची संमती घ्यावी लागते.

अशाप्रकारे हक्कातील नोंदी कमी करून नंतर वाटपासाठी चा अर्ज विचारात घेतला जातो. विनंती अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करावा. एक महिन्यात त्यांना लेखी सूचना पत्र मिळेल. त्याची एक प्रत संबंधित तलाठीला देण्यात येते.

संबंधी तहसीलदारांना ठरल्याप्रमाणे तहसीलदार कार्यालयात जबाब देण्यासाठी जावे लागते, याची जाहीर घोषणा केली जाते. नंतर तहसीलदार वाटपाचा अंतिम आदेश देतात, त्याची नोंद तलाठी करतात. फेरफार बुक मध्ये सर्व हिस्सेदार यांच्या सह्या घेतल्या जातात.

फेरफार मंजुरीनंतर तहसीलदार यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे स्वतंत्र सातबारा उतारे सहहिस्सेदार आला मिळू शकतात. मात्र जर का कोणी आक्षेप घेतल्यास त्याची सुनावणी तहसीलदारांकडे होते आणि त्यांचा निर्णय बंधनकारक असतो. तर अशाप्रकारे आपण आपले खातेवाटप करून घेऊ शकतो. माहिती आवडल्यास माहिती शेअर करा.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा

व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

3 thoughts on “जमिनीची खातेफोड कशी आणि कोणत्या प्रकारे करायची? कोणत्या कायद्यानुसार ती केली जाते? जमिनीची खाते फोड करताना कोणकोणत्या अडचणी असतात? जमिनीची खाते फोड करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? कोणाकडून जमिनीची खातेफोड करून घेतली जाते? या सगळ्याची सविस्तर माहिती !

  1. मी मार्लेश महादेव पवार रा.मालगाव ता मिरज जि सांगली येथील रहिवासी असून आमच्या आजोबांच्या नावे साडे पाच एकर शेत जमीन आहे,आजोबा आजी माझे आई वडील हे सर्व मयत झाले असून आता वारसा हक्काने वडिलांच्या जागी माझ्या बहिणी चे व माझे नाव सदर शेतजमिनीवर लागले आहे,तरी सदर शेत जमिनीत माझे काका व माझ्या 3 आत्या ची ही नावे असून एका को ऑप बँकेचा बोजा देखील नोंद आहे तरी माझ्या हीश्याच्या जमिनीचे मला खातेफोड करायची असून त्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करावे

  2. नमस्कार, एका अर्ध्या एकरचे प्लॉटस करून देणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये 2017 मध्ये गुंतवणूक केली. एकूण 40-42 एकरच्या गटात70-80 प्लॉटस करणार असे त्याने सांगितले होते.
    पण एकतर प्लॉटस खरेदी केलेल्या लोकांची नावेच 7-12 वर येऊन देत नाही. माझे नाव मी केस करून चढवून घेतले आहे.
    आता किमान माझा हिस्सा (3.5 एकर) मला वेगळा काढून मिळण्यासाठी काय करावे लागेल?
    जमीन महाड तालुक्यात आहे.

  3. विहीरपड खरेदी अडीच गुंठे थोरल्या भावाच्या नावे आहे इतर भावांची नावे नाहीत थोरला भाऊ नावे लावायला तयार नाही पण पीक पाणी ला 80 साला पासून सर्व भावांची नावे आहेत कायदेशीर नावे लावण्यासाठी काय करावे लागेल

Comments are closed.