पैसे बचत करण्याचा सर्वोत्तम सल्ला काय? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज मज्जा करू आणि म्हातारपणी बचत करुया, परंतु पैसे बचतीची सवय निर्माण केली नाही तर वृध्द काळात पैसे बचत करू शकत नाही. वीस रुपये बचत करण्याचा प्रयत्न करा,एखाद्या वीस रुपयाची नोट तुमच्या खिशात असेल आणि ती तुम्हाला वाचवायची असेल तर लगेच पाकीटमध्ये ठेवून टाका आणि पाकीट लपवून ठेवा. म्हातारपणी तुमच्याकडे एक चांगल्या पैशेची निर्मिती होऊ शकते.

प्रत्येकानं आपलं पैसेच मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आपल्याला कधी, केव्हा, कुठे, किती पैशाची गरज लागेल हे सांगता येत नाही, आणि बऱ्याच वेळेला पैशांच मॅनेजमेंट न केल्यामुळे, लोकांकडून नेहमी त्याच्या तोंडातून ऐकायला मिळत की ‘काश मेरे पास भी पैसा होता’ जर माझ्याकडे पण पैसे असले असते तर, हा संवादच तोंडात आला नाही पाहिजे म्हणून मॅनेजमेंट करणं सर्वात जास्त महत्त्वाचं असत.

1. तारुण्यातच पैसे बचत करण्याची सवय लावा : साधारणता अठरा ते पंचवीस वयोगटातील मुल मुली ही डिस्ट्रॅक्शनमुळे वाईट मार्गाला जातात आणि त्यांच्या मार्फत पैसे खर्च होतात. त्यांना पैशाचे महत्व त्याच वेळेत कळलं पाहिजे, म्हणजे आज मजा करू आणि म्हातारपणी पैशाची बचत करुया असं

काही जणांचं मत असतं परंतु पैसे बचतीची सवय जर तुम्ही निर्माण केली नाही तर वृद्ध काळात पैसे बचत करू शकणार नाही. तरुणपणी बचत केल्यानंतर उतार वयात तुमच्या कडे बक्कळ पैसे तुमच्याकडे असतील. तेव्हा तुम्ही असा विचार करणार नाही की ‘काश मेरे पास भी पैसा होता’.

२. आता बचत करायची तर किती ? एक लाख, दोन लाख कितीची बचत करायची का ? तर नाही अगदी थोड्या पैशाची बचत तुम्ही करू शकता. वीस रुपयाची बचत करण्याचा प्रयत्न करा. एखादी वीस रुपयाची नोट असेल तुम्हाला ती जर वाचवायची असेल तर वीस रुपयाची नोट एका पाकिटात ठेवा आणि पाकीट लपवून ठेवा. वीस ने सुरवात करा. त्यानंतर पन्नासची नोट, शंभरची नोट, पाचशेची नोटेची बचत करण्याचा प्रयत्न करा. अस नाही की तुम्ही खूप पैसे बचत केले पाहिजेत, सुरवात केली पाहिजे.

3. एफडी, आरडी, एसआयपी किंवा एलआयसी चा सहारा घ्या : पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. बँक खात्यातून विशेष पैसे राहतात. आपल्या नकळतच पैसे राहतात तुम्ही हे करू शकता. LIC मध्ये दरमहा पैसे गुंतवून देखील तुम्ही पैसे वाचवू शकतात.

4.तुमच्या खर्चाचे मूल्यांकन करा : तुम्ही महिन्यात जो खर्च करतात त्यांचं मूल्यांकन करा, त्याची नोंद करा, अगदी एक रुपया जरी खर्च केला असेल तरी नोंद करा, तीस दिवस तुम्ही हे काम करा. तुमचा तीस टक्के पैसा वाचेल आणि तुम्ही न लागणारा पैसा खर्च करताय हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जे काही खर्च करताय तर ते तीस टक्के तुम्ही वाचवू शकता.

लगेच तुम्ही याची यादी करा, तुम्हाला नक्की कळेल की तुमची पैसे कुठे खर्च होतात ते आणि तुमची नक्की बचत होईल. अशा प्रकारे काम केल्याने एक चांगली सवय लागेल. म्हातारपणी किंवा तुमच्या वृद्धापकाळात तुमच्याकडे एक चांगला पैशाचा नेहमी ओघ चालू राहील.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.