मोबाईल विमा म्हणजे काय ? ।। का आणि कोणी काढावा? ।। कोणत्या परिस्थितीत उपयोगी ठरतो ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

या एकविसाव्या शतकात अन्न, वस्त्र आणि निवारा यामध्ये मानवाने मोबाईल ला ही सामावून घेतले तरी काही हरकत नाही. मोबाईल माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झाला आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी परत झोप येईपर्यंत मोबाईल आपली एका कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तिप्रमाणे साथ देत असतो त्यामुळे त्या मोबाईल ची काळजी घेणे तसे गरजेचे आहे कारण एक व्यक्तीला मोबाईल जर कदाचित बंद झाला तर सगळी कामं ठप्प होतात.

आयुष्य थांबल्या सारखं वाटतं. पूर्वी पाकीट किंवा पर्स चोरीला जाण्याचा धोका असायचा. आता मात्र, या चोऱ्यांनाही डिजिटल स्वरूप आले आहे.दिवसेंदिवस ऑनलाइन चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे.चोर तुमचा स्मार्टफोन चोरून तुमच्या सर्व सोशल खात्याचा वापर करून बनावट खाती बनवून अनेकांना लुटू शकतो.

आता तुम्ही विचार कराल की सायबर विमा योजना म्हणजे काय? यामध्ये तुम्हाला ऑनलाइन फ्रॉड, बनावट ओळख, ऑनलाइन पाठलाग, फिशिंग,सायबर खंडणी व इतर सायबर हल्ल्यापासून होणारे नुकसान यापसून सुरक्षाकवच मिळते. याच कारणामुळे आपण स्क्रीनगार्ड, कव्हर यांसारख्या विविध साधनांच्या माध्यमातून आपण मोबाईल ची काळजी घेत असतो पण तरीही मोबाईल हरवला अथवा फुटला तर आपल्याला विमा संरक्षण देणे गरजेचे आहे.

तसे पाहता मोबाईल विमा ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण मोबाईल ची चोरी, बिघाड अथवा एखाद्या अपघातामध्ये होणारे आर्थिक नुकसान होऊ शकते हे नुकसान टाळायचे असल्यास मोबाईल विमा हा एकमेव पर्याय आहे. आयुर्विमा आणि आरोग्य विमा जसे विमाधारक व्यक्तींचं संरक्षण बनतो तसेच मोबाईल विम्यासाठी आपण भरलेले पैसेही कधी वाया जात नाहीत.

आपण आपला मोबाईल खरेदी केल्यानंतर पाच दिवसांच्या आत आपला मोबाईल विमा काढू शकतो. या विम्याची रक्कम ही आपल्या मोबाईल च्या रक्कमेवर अवलंबून असते. विमा कंपनीकडून मोबाईल साठी प्रथमिकतेने एका वर्षाचे संरक्षण कव्हर दिले जाते पण काही विमा कंपनी दोन वर्ष ही मोबाईल साठी संरक्षण कव्हर करून देतात.

मोबाईल विमा केव्हा लागू होतो : १. नैसर्गिक आपत्ती २. एखाद्या कार्यक्रम अथवा दंगा मध्ये चोरी ३. घरामध्ये चोरी ४. आग आणि वीज यामुळे झालेले नुकसान ५. चोरी च्या प्रयत्नात झालेले नुकसान ६. भारताबाहेर झालेले नुकसान ७. चुकीचे इन्स्टॉलेशन अथवा अपडेट ८. सायबर हल्ला

कोणत्या कंपनी देतात मोबाईल विमा सेवा ? : मोबाईल विमा हा प्रामुख्याने थर्ड पार्टी प्रदात्याकडून देय केला जातो यामध्ये बजाज आलियांज, नेशनल इंश्योरेंस कंपनी, ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी आणि न्यू इंडिया एश्योरेंस कंपनी या कंपनी मार्फत आपण आपल्या मोबाईल ला विमा संरक्षण देऊ शकतो. तसेच या थर्ड पार्टी कंपनी सोडून आपण सिस्को गैजेट्स, बिस्कोट, गैजेटकॉप्स, इन्फ़ी शील्ड, वारंटी बाजार, एप्स डेली आणि ऑनसाइट या वरून ही आपण मोबाईल विमा कव्हर खरेदी करू शकतो.

विमा संरक्षण क्लेम कसे करावे? : शक्यतो मार्केट मधी सर्वच कंपन्यांची मोबाईल विमा क्लेम करण्याची पद्धत एक सारखीच असते परंतू फक्त आपला मोबाईल गहाळ किंवा त्याबरोबर एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर लवकरात लवकर क्लेम करणे गरजेचे असते.

आवश्यक कागदपत्रे : १. मोबाईल खरेदी करतानाचे मूळ कागदपत्रे. २. मोबाईल फोन चा सीरिअल नंबर आणि विमा पॉलिसी नंबर. ३. FiR ची कॉपी ४. क्लेम ची कॉपी

प्रक्रिया : विमा कंपनी च्या टोल फ्री नंबर वर अथवा कष्टमर केअर नंबर वर मोबाईल सोबत झालेल्या दुर्घटनेची माहिती देणे. ऑनलाइन किंवा विमा कंपनी च्या ऑफिस मध्ये जाऊन क्लेम फॉर्म भरणे. जर मोबाईल चोरी झाला असेल तर पोलीस स्टेशन च्या FIR ची कॉपी आणि मोबाईल आगीत पडला असेल तर फायर स्टेशन मधून फायर रिपोर्ट मिळवणे

काही विमा कंपन्यांसाठी डॅमेज झालेल्या फोन चे फोटोस काढणे आवश्यक असते. यानंतर ही वरील कागदपत्रे आणि मोबाईल चे फोटोज हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन म्हणजे विमा कम्पनी कार्यालयात भरावे लागतात. मग विमा कंपनी मोबाईल बदलून अथवा दुरुस्त करून आपल्या हवाली करते.

अपवाद : मोबाईल चे नुकसान कशामुळे झाले हे जर विमाधारकाकडून स्पष्ट होत नसेल तर मोबाईल विमा संरक्षण देऊ केले जात नाही. अगर मोबाईल फोन चे नुकसान मुद्दाम केले गेले असेल तर यावेळी तुमच्या विमा संरक्षण वर आक्षेप घेतला जाऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे म्हणजेच जल अथवा वायू मुळे मोबाईल फोन ला अडचण आली किंवा खराब झाला तर अशावेळी विमा संरक्षण देऊ केले जात नाही.

जर मोबाईल फोन चा असामान्य परिस्थितीत उपयोग केला गेला असेल तर विमा संरक्षण देऊ केले जात नाही. मोबाईल विमा पॉलिसी काढण्या अगोदर तुमच्या मोबाईल मध्ये काही खराबी असेल तर त्याला विमा संरक्षण लागू केले जात नाही. तर आज आपण मोबाईल चे विमा कव्हरेज या विषयीची माहिती घेतली. तुम्हाला आजचा लेह कसा वाटलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.