पहिला प्रश्न सासु नंतर त्यांचे अधिकार वारसाने सुनेला मिळतात का? उत्तर: आता वारसा हक्कासंदर्भात हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. ज्या परिस्थितीत मृत्युपत्र किंवा इतर काही दस्त केलेले नसतात. आणि मालमत्ता केवळ वारसाहक्काने एकाकडून दुसर्याकडे जाणार असते, तेव्हा ती कशी जाते, त्यामध्ये कोणत्या कोणत्या वारसांना अधिकार असतात, या संदर्भात महत्त्वाच्या तरतुदी हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये करण्यात आलेल्या आहेत.
याच कायद्यामध्ये जे वारस असतात त्यांचे क्लास वन आणि क्लास टू असे प्रकार पाडण्यात आलेले आहेत. सहाजिकच क्लास वन चे वारस असतात त्यांना प्राधान्य मिळत. आता हे जर आपण सगळे क्लास वन आणि क्लास टु, यामधल्या सगळ्या वारसांच्या नोंदी किंवा नाव जर पाहिली तर त्यामध्ये सून किंवा डॉटर इन लॉ हे दिसून येत नाही.
सहाजिकच एखाद्या सासूला तिची काही मालमत्ता आहे ती तिच्या निधनानंतर तिच्या सुनेला वारसाहक्काने मिळण हे जवळपास अशक्य आहे. आता निधनापूर्वी तिच्या सासूने जर मृत्युपत्र केला असेल तर गोष्ट वेगळी. पण वारसाहक्काने अशी मालमत्ता मिळणं हे अत्यंत कठीण किंबहूना अशक्य आहे असं म्हटलं तरी चालेल.
आता यात परत दोन मुद्दे येतात. एक म्हणजे नुसती सून, आणि दुसर म्हणजे विधवा सून. आता हिंदू सक्सेशन अॅक्ट मध्ये विधवा सुनांना काही प्रमाणात हक्क किंवा अधिकार हे प्राप्त होतात. मात्र जी सून विधवा नाहीये तिला वारशाने कोणतेही अधिकार प्राप्त होण हे जवळपास अशक्य आहे.
दुसरा प्रश्न अ.पा.क. म्हणून जे नाव लागलेल आहे ते कमी कसं करायचं? उत्तर: आता अ.पा.क. म्हणजे नक्की काय. तर अज्ञान पालन करता. ज्याला इंग्लिश मध्ये गार्डियन असं म्हणतात. आता जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये एखाद्या कायद्याने अज्ञान किंवा मायनर व्यक्तीचे हक्क किंवा अधिकार प्रस्थापित होतात, किंवा प्रस्थापित करायचे असतात.
तेव्हा मायनर व्यक्ती हा करार किंवा बाकी काही करण्यास अपात्र असल्याने त्याच्या वतीने गार्डियन किंवा अज्ञान पालन करतात या गोष्टी करतो. आणि जोवर ती व्यक्ती अज्ञान आहे तोवर त्या सगळ्याची जवाबदारी त्या अ.पा.क. म्हणजे अज्ञान पालन करत्यावरच असते.
आता जिथे अज्ञान पालन करता असा उल्लेख किंवा अशी नोंद झालेली असेल, ती नोंद ज्या व्यक्तीचं वय कमी होतं. किंवा जी व्यक्ती अज्ञान होती. ती व्यक्ती कायद्याने सज्ञान झाली की तो शेरा कमी करता येऊ शकतो. आता आपल्याकडे सर्व साधारणतः वयाच्या अठराव्या वर्षी कोणतीही व्यक्ती कायद्याने सज्ञान होते.
सहाजिकच जेव्हा एखादी व्यक्ती कायद्याने सज्ञान होते तेव्हा त्याचा पुरावा आणि रीतसर अर्ज सादर करून तो अ.पा.क. चा शेरा किंवा नोंद जी आहे ती आपल्याला कमी करून घेता येऊ शकते. त्याकरता महसूल अभिलेखातन जर ती दुरुस्ती करायची असेल, तर त्याकरता संबंधित अधिकाऱ्यांकडे आपण अर्ज करावा. सोबत आपण अज्ञान पासून सज्ञान झाल्याचा पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्र दाखल करावी. जेणे करून अ.पा.क. चा शेरा कमी होऊ शकेल.
तिसरा प्रश्न जुन्या नोंदणीकृत कराराची प्रत कुठे मिळेल? उत्तर: आता गेल्या दहा-वीस वर्षांत जर आपण बघितलं तर प्रत्येक कराराच्या नोंदणी नंतर त्या कराराच स्कॅनिंग केले जात. त्यामुळे जर आपल्याला दहा-वीस वर्षातली एग्रीमेंट किंवा पंचवीस-तीस वर्षांच एग्रीमेंट हवी असेल तर त्याची प्रत आपल्याला त्या तालुक्यामध्ये मिळेल.
म्हणजेच या तालुक्याच्या नोंदणी कार्यालयात आपण जाऊन त्या एग्रीमेंट किंवा कराराची छायांकित आणि साक्षांकित प्रत मागू शकतो. त्या करता आपल्याला त्या कराराची माहिती असणे आवश्यक आहे. जर आपल्याला त्या कराराची माहिती नसेल तर किमान मालमत्तेची माहिती असणे आवश्यक आहे.
म्हणजे त्या मालमत्तेच्या माहितीच्या अनुषंगाने सर्ज घेऊन आपल्याला कराराची माहिती मिळेल. आणि मग आपण त्या कराराची प्रत प्राप्त करून घेवू शकतो. पण एखादा करार समजा फारच जुना असेल तर पूर्वीच्या काळी काय होत असे स्कॅनिंग वगैरे आपल्याकडे तंत्र तेव्हा नव्हतं. तर तेव्हा या सगळ्या करारांचे नोंदणी एकदा झाली की तिचे फोटो काढण्यात यायचे.
आणि त्या फोटोचे रोल हे जतन करून ठेवण्यात यायचे. सद्यस्थितीत हे फोटोचे रोल पुण्याला एका मध्यवर्ती ठिकाणी जतन केलेले आहेत. जिथे आईजीआर अर्थात इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्त्रेशन यांचा ऑफिस आहे, त्यांच्याकडे तर आपल्याला मिळू शकत. म्हणजे प्रथमतः आपण आपल्या करार जेथे नोंदणीकृत झाला आहे. त्या कार्यालयातन आधी त्या कराराची प्रत मिळते का ते बघावं.
जर त्यांच्याकडे सिस्टीम मध्ये उपलब्ध नसेल तर मात्र आपल्याला पुण्याला जाऊन ती प्रत मिळवता येईल. पण पुण्याला जाण्याआधी किंवा त्या रोलचा शोध घेण्याआधी आपण तिथल्या स्थानिक कार्यालयामध्ये शोध घेणे आवश्यक आहे. जर आपल्याला हव्या असणाऱ्या कराराची प्रत स्कॅन झाली असेल तर ते आपल्याला लवकर प्राप्त होईल. त्याच्या करता पुण्याला फेटा मारण्याची आवश्यकता उरणार नाही.
चौथा प्रश्न एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंदच जर झाली नसेल तर काय करायचं? उत्तर: आता सर्वसाधारण: जन्म आणि मृत्यूची नोंद होणे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण जोवर एखादी व्यक्ती कायदेशीर रित्या अस्तित्वात येत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीचे अस्तित्व कायदेशीर रित्या संपत नाही, तोवर त्याच्या पुढच्या गोष्टींना गती येत नाही.
मात्र काही वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करायची राहून जाते. आता जन्म-मृत्यूची नोंद करणं हे आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेलं काम आहे. मात्र जर आपण एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर, विहित मुदतीत जर ती कार्यवाही केली नाही तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मृत्यूची नोंद करायची आणि दाखला द्यायची अधिकारता राहत नाही.
त्याकरता आपल्याला प्रथमता: स्थानिक फौजदारी न्यायालय मध्ये अर्ज दाखल करायला लागतो. आणि तो अर्ज दाखल झाला त्यावर आपल्याला आदेश मिळाला, की मग जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती त्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करते, आणि मग ती एकदा का नोंद झाली की आपल्याला त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळू शकतो. एकदा का तो मृत्यू दाखला हातात आला की मग पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप होत जातात किंवा त्याला आपोआप गती मिळते.
पण लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे एखाद्याचे निधन झाल्यानंतर त्याची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मृत्यूची नोंद आपण लगेच करून घ्यावी. जर आपण त्याच्यात विलंब केला किंवा नको इतका जर वेळ घालवला तर आपल्याला त्याचाकरता कोर्ट कचेरी करण्याची वेळ येऊ शकते. ज्यांनी आपला वेळ, पैसा, त्रास हे सगळं वाढेल. आणि जे सोपं काम आहे ते उगीचच कठीण होईल. ही माहिती आपल्या नक्कीच उपयोगाची असेल.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.