मोबाईल नंबर रजिस्टर नसताना देखील गहाळ झालेले आधार कार्ड परत कसे मिळवावे ?

शैक्षणिक

आपला आधार हरवलं..फाटले आहे.. खराब झालंय.. आणि आपल्याला ते पुन्हा हवाय. आता काय करायचं? काळजी करू नका आता युआयडीएआई ने या सर्व बाबींचा विचार करून आधार कार्ड रीप्रिंट सुविधा चालू केली आहे. तेही फक्त पन्नास रुपये इतक्या माफक किमतीमध्ये.

तसेच हरवलेल्या किंवा फाटलेल्या आधार कार्डचा क्रमांक लक्षात नसेल तरी तो आपण पुन्हा रीट्रिव लॉस्ट किंवा फॉरगोट्ट ईआईडी/युआईडी यांच्या माध्यमातून पुन्हा मिळू शकतो. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत हरवलेला आधार क्रमांक कसा शोधावा. आधार कार्ड मध्ये मोबाईल रजिस्टर असताना आधार कार्ड रीप्रिंट ची मागणी कशी करावी

आणि आधार कार्ड मध्ये मोबाईल रजिस्टर नसताना आधार कार्ड रे प्रिन्ट मागणी कशी करावी. हरवलेला आधार क्रमांक कसा शोधावा? आधार कार्ड मध्ये मोबाईल किंवा ईमेल एड्रेस रजिस्टर असणं अनिवार्य आहे. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला आपला आधार हरवलेला आहे.

आणि तो जर परत मिळवायचा असेल तर, त्या ठिकाणी म्हणजे सुरुवातीला रजिस्टर करताना किंवा अपडेट करताना ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी रजिस्टर करणे अत्यंत आवश्यक आहे. ते असेल तरच आपल्याला आधार क्रमांक मिळतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं

आपल्याला यू आई डी ए आई या वेबसाईटवर जाऊन माय आधार या टॅबला क्लिक करून त्यानंतर रिट्रिव्हर लॉस्ट किंवा फॉरगॉटन ईआईडी/युआईडी या टॅबवर क्लिक करायचे आहे. त्याठिकाणी आपला जो ईआयडी/युआयडी शोधायचा आहे, म्हणून तो टॅब आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म ओपन होतो.

या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे आहे, ईआयडी की युआयडी. ईआयडी म्हणजे नोंदणी क्रमांक युआयडी म्हणजे आधार क्रमांक. काय हवा आहे. तर आपण या ठिकाणी विचार करुया की आपल्याला आधार क्रमांक हवा आहे म्हणून आपण आधार क्रमांकाच्या समोरील ऑप्शन बटन ला क्लिक करतो.

क्लिक केल्यानंतर आपल जे पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव जसं आहे तसं अगदी चुकीचं असेल तर चुकीचं, पण जसं असेल आधार वरती तसं आपल्याला त्याठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर जर आपल्याला रजिस्टर कोणता आहे ते माहिती असेल तर तो मोबाईल नंबर तेथे टाकायचा आहे.

मोबाइल नंबर टाकल्यानंतर बाजूला येणारा जो कॅपच्या आहे तो क्यापच्या टाकायचा आहे. आणि सेंड ओटीपी या बटन वर क्लिक करायचं आहे. या बटन क्लिक केल्यानंतर जो नवीन फॉर्म ओपन होतो ज्या ठिकाणी आपल्याला जो ओटीपि येतो रजिस्टर मोबाईल नंबर वरती जो ओटीपी तो ओटीपी भरायचा आहे.

जर समजा आपल्याला मोबाईल नंबर आठवत नाहीये, मोबाईल नंबर हरवलाय किंवा पहिला मोबाईल नंबर आपण चेंज केला आहे रजिस्टर असणारा. आणि आपल्याला फक्त ई-मेल आयडी माहित असेल तर आपण ईमेल आयडी च्या साह्याने सुद्धा आपण आपलं जी आधार कार्ड आहे आधार क्रमांक आहे मिळू शकतो.

ज्याप्रमाणे आपण मोबाईल नंबर टाकला त्याचप्रमाणे आपण येथे ई-मेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर त्या ठिकाणी सेंड ओटीपी यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरती एक ओटीपी येतो. आणि तो ओटीपी या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी तो ओटीपी सहा अंकी किंवा आठ अंकी तो याठिकाणी टाकायचा आहे.

त्यानंतर लोगिन बटन ला क्लिक करायचं आहे. लोगिन बटन क्लिक केल्यानंतर आपल्या समोरची स्क्रीन येते त्या स्क्रीन वरती लिहिलेलं असतं की, तुमचा लास्ट किंवा हरवलेला ईआयडी/युआयडी आहे तो, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर किंवा रजिस्टर ईमेल आयडी वरती पाठवलेला आहे.

आणि त्या ठिकाणी एसएमएस आला आसेल त्यामध्ये आपला आधार क्रमांक आलेला असेल. म्हणजे थोडक्यात काय तर याठिकाणी जर समजा आपल्याला आपला आधार क्रमांक माहित नसेल पण आपण जे आधार रजिस्टर करताना किंवा अपडेट करताना जे काही मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी दिलेला असेल, ते माहित असेल तरी आपण आपला आधार क्रमांक परत मिळू शकतो.

आता आपल्याला आपला आधार नंबर मिळालेला आहे. किंवा तो पहिल्यापासूनच आपल्याला माहित होता. उदाहरणार्थ आपल्याकडे झेरॉक्स होती. आधार नंबर मोबाईल मध्ये सेव करून ठेवला होता वगैरे वगैरे जे काही असेल. आता आपण आधार रेप्रिंत साठी ऑर्डर करूयात. आपण पहिलेच पाहिले आहे की आधार रिप्रिंट करण्यासाठी दोन ऑप्शन असतात. 1. मोबाईल नंबर रजिस्टर असताना आणि 2. मोबाईल नंबर रजिस्टर नसताना

आपण पहिले पाहूया आधार वरती मोबाईल नंबर रजिस्टर्ड असताना: यु आय डी ए आई च्या वेबसाईट वरती जायचं आहे. माय आधार टॅब क्लिक करायचं आहे आणि त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर, ऑर्डर आधार रेप्रिंट या टॅबला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी नोटीस येते ती नोटीस वाचन फार गरजेचा आहे. ती नोटीस अशी आहे, आधार रे प्रिंट करा त्यासाठी नोटीस आहे की, covid-19 सर्व देशभर हा साथीचा रोग पसरल्यामुळे पोस्ट विभागाच्या स्पीड पोस्टद्वारे आधार पत्र, आधार कार्ड यायला उशीर होऊ शकतो.

आणि टीप आहे आधार रिप्रिंट ची सुविधा सशुल्क सेवा आहे. जर तुम्हाला आपले आधार पुन्हा पाण्याची गरज भासत असेल, तर तुम्ही रुपये 50 नाममात्र फी भरून आधार रीप्रिंट करू शकता, यामध्ये जीएसटी आणि स्पीड पोस्ट यांची शुल्क पकडलेले आहेत. आधार चे री प्रिंट ऑर्डर करण्यासाठी आपण आपला आधार क्रमांक म्हणजेच आपला यूआयडी वर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच वीआयडी किंवा ईआयडी हे वापरू शकता म्हणजे याच्या आधाराने आपण आपला आधार री प्रिंट करू शकतो.

ही नोटीस झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म दिसतो ज्यावर ती आपल्याला खऱ्या अर्थाने आधार रिप्रिंट ची ऑर्डर करायची असते. यामध्ये कशाच्या माध्यमातून आपण आपला आधार रेप्रिंट ला पाठवणार आहोत तर या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेले आहेत, 1.आधार नंबर 2.व्हर्चुअल आयडी आणि 3. ईआयडी

तर आपण आधार नंबर च्या साह्याने आपला आधार रेप्रिंट ची ऑर्डर देणार आहोत, यामध्ये सर्वप्रथम आपण आपला बारा अंकी आधार नंबर टाकला. त्यानंतर बाजूला जो काही कॅपच्या येतो तो जशास तसा टाकला. त्यानंतर जर तुम्ही खाली पाहिलं तर तिथे एक बॉक्स आलेला आहे. त्यामधे माय मोबाईल नंबर इस नोट रजिस्टर यासाठी तो ऑप्शन आहे.

आपण आत्ता सध्या काय करतोय माझा मोबाईल रजिस्टर आहे. म्हणून आपण डायरेक्ट काय केलं सेंड ओटीपी ला क्लिक केलं. आणि सेंट ओटीपी ला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे ओटीपी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी आला. तो ओटीपी आपण या ठिकाणी टाकला.

याठिकाणी टाकल्यानंतर टर्म आणि कंडिशन या बॉक्स वरती क्लिक करून आपल्याल सामोरं एक इंपॉर्टन्ट नोट येते त्यामध्ये असं सांगितलं आहे की, मी माझी आधार कार्ड री प्रिंट करण्यासाठी मी माझी संमती देत आहे. मला माहित आहे की माझं प्रिंट झालेला आधार जे आहे ते मला मी रजिस्टर केलेल्या माझ्या पत्त्यावर येईल. त्यानंतर मला पन्नास रुपये आधार कार्ड साठी सर्विस चार्जेस म्हणून भरायचे आहेत. आणि जर यामध्ये जर डिलिव्हरी झालेली आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर मला जर आधार मिळालेला नाही.

तर मी त्याची पोस्टच्या डिपार्टमेंट मध्ये चौकशी करणार आहोत. यानंतर सबमिट बटणावर क्लिक केलं. समिट बटन क्लिक केल्या बरोबर माझ्यासमोर माझं आधार कार्ड मला दिसू लागलं. त्यात माझा माझा फोटो आहे, माझं नाव आहे, माझ्या जन्मदिवस आहे, माझा पूर्ण पत्ता आहे.

आता या मधील दुसरा ऑप्शन आधार कार्ड मध्ये मोबाईल रजिस्टर नसताना: युआयडीएआय च्या वेबसाईट वरती जाऊन माय आधार वर क्लिक करून त्यानंतर ऑर्डर आधार रेप्रिंट वर क्लिक करायचे .त्यानंतर आधार क्रमांक वर क्लिक करून तेथे बारा अंकी आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्याखाली साईडला कॅपच्या जशास तसा टाकायचा आणि खाली बॉक्स मध्ये माय मोबाईल नंबर इस नोट रजिस्टर या बॉक्स वरती क्लिक करायचा.

या वरती क्लिक केल्यामुळे खाली आपल्याला मोबाईल नंबर टाकण्यासाठी एक जागा ओपन होते तेथे आपण आपला नवीन मोबाईल नंबर टाकू शकतो. आणि त्यानंतर खाली सेंड ओटीपी यावरती क्लिप करायचे. या वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येतो तो ओटीपी टाकायचा आणि सबमिट करायचं.

सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर प्रीव्ह्यू आधार लेटर चा फॉर्म ओपन झाला . पण मघाशी आणि आता मध्ये थोडासा फरक आहे. मघाशी आपण ज्यावेळेस पाहिलं, त्यावेळेस प्रिव्हयु मध्ये आपल्याला आपला आधार ची संपूर्ण माहिती दिसत होती, पण आता या ठिकाणी आपल्याला आपली डिटेल्स माहिती दिसत नाहीये. त्याचे कारण असं आहे की प्रीव्यू म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला आपला आधार चा प्रिवीव पाहिला मिळणार होता तो मिळणार नाहीये, कारण आपला मोबाईल आधार कार्डशी रजिस्टर नाहीये. आणि तेथे स्पष्ट शब्दात लिहिलेली नोट आहे.

आता आपण पेमेंट ची प्रक्रिया पन्नास रुपये भरण्याची प्रक्रिया ते आता आपण चालू करू: या वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट ऑप्शन येतो यामध्ये तीन ऑप्शन येतात पहिलं आहे कार्ड पेमेंट दुसरा आहे नेट बँकिंग तिसरा आहे यूपीआय. या तिघांपैकी एकाच्या सह्याने पेमेंट केल्यानंतर, ऑर्डर आधार रीप्रिंट पेमेंटची रिसिप्ट आपल्याला मिळते. यामध्ये एस आर एन नंबर, ट्रांजेक्शन आयडी, आधार नंबर-शेवटचे 4 अंक, प्रिंट अमाऊंट इत्यादी माहिती असते. याचा उपयोग आपण स्टेटस ट्रैकिंग वेबसाइट वर करू शकतो. त्यानंतर आपल्याला एक नोट ओपन होते त्यात आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या जातात.

1 thought on “मोबाईल नंबर रजिस्टर नसताना देखील गहाळ झालेले आधार कार्ड परत कसे मिळवावे ?

Comments are closed.