उद्योग यशस्वी करण्यासाठीचे महत्वाचे कानमंत्र ।। ९० दिवसांचे सूत्र ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

ज्याप्रमाणे एखादा गणित सोडवण्यासाठी आपल्याला सूत्राची गरज लागते, त्याचप्रमाणे आपल्या व्यवसाय यशाच्या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी देखील सूत्रांची ची गरज लागते. आणि ते सूत्र काय आहे ते आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.आजाचा आपला विषय आहे बिसनेस सक्सेस कसा करायचा? त्याचे काही सूत्र आहे.

प्रत्येकालाच हे वाटत असत की आपण बिसनेस करायला हवा.आणि बरेच लोक आता अनेक माध्यमवर्गीय लोक बिसनेस करतात देखील. परंतु काय होत महिना दोन महिने बिसनेस केल्यानंतर किंवा व्यापार केल्यानंतर ते बिसनेस मध्ये लॉस जातात. आणि धंदा होत नाही. आणि ते काय करतात नवीन येणारी पिढी जी धंद्यामध्ये उतरू इच्छिते त्यांचे मनोधैर्य ते लोक खच्ची करून टाकतात.

ते लोक सांगतात धंद्या मध्ये मजा नाही. उधारी दिली की ती येत नाही. कस्टमर आपल्याकडे येत नाही, परंतु धंदे अनेकजण करतात, आणि अनेकजण बंद देखील करतात. आणि १०० धंद्यांपैकी फक्त १० धंदे सक्सेस होतात. वर्षनुवर्षं ते चालतात आणि मोठे देखील होतात. त्यासाठी काही धंद्याचे जे सूत्र आहेत ते जाणून घेणार आहोत.

सूत्र न.१ व्यापारामध्ये उतरण्याकरता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डोक्यावरती बर्फाचा खडा, तोंडा मध्ये खडीसाखर, आणि अंगावरती गेंड्याची चामडी, सर्वात महत्वाचं पाठीचा कणा हा फ्लेक्सिबल(लवचिक) असायला हवा. या दिलेल्या चारही उदाहरणाचे तात्पर्य पुढील प्रमाणे:

१. डोक्यावरती बर्फाचा खडा : याचा अर्थ असा की धंद्यामध्ये आपण कायम आपलं डोकं शांत ठेवलं पाहिजे. कस्टमर आला तो आपल्याला उलटसुलट विचारतो, बोलतो, काही आपला अपमान देखील करतात तरीही शांत राहून आपण त्याचा मान सन्मान करायचा.

२.तोंडा मध्ये साखर : म्हणजे नेहमी गोड बोलायचं. मोठं छोटा, असुदेत रेस्पेक्टली त्याच्यासोबत बोला. या दादा, वहिनी, ताई,काका मॅडम, सर अस त्यांना संबोधा बसा साहेब, असे शब्द संबोधा. त्यांना बसण्यास सांगा, पाणी घेता का? अस विचारा. चहा सांगू का अस विचारा. एकदम गोड बोला, तुमच्याकडची एखादी गोष्ट जरी नाही आवडली तरी तुमच्या स्वभावाने ती गोष्ट तुमच्याकडून घेतली पाहिजे.

३. अंगावरती गेंड्याची चामडी : याचा अर्थ वरील दोन गोष्टी सांगितल्याप्रमाणे कस्टमरची तक्रार ऐकून घ्या. कस्टमरची तक्रार शांतपणे ऐकून घ्या, त्यांना उलटसुलट बोलू नका, एखादी गोष्ट त्यांना नाही आवडली, तर त्यांना ती बदलून द्या त्यांचे म्हणने समजून घ्या, आपली गोष्ट पटवून सांगा. त्याच्याशी वाद घालू नका. ते कितीही उलट बोलले तरी ग्राहक हा आपला देव आहे अस समजून त्यांना चांगली वागणूक द्या.

४.पाठीचा कणा लवचिक असला पाहिजे : याचा अर्थ असा की बोलण्यात रीस्पेक्ट ठेवा, कस्टमर पुढे हाजी हाजी करा, जस या बसा काही घेणार का? त्यांना आदराने भेट, बोलण्यात नम्रता ठेवा. त्यांच्या बद्दल विचारा, आपली थोडी माहिती द्या, आणि त्यांना उद्धट बोलू नका काय बाहे, मी नाही देणार बदलून,असे शब्द बिलकुल वापरू नका. आणि ‘नाही’ हा शब्द वापरणं बंद करा.

सूत्र न.२-सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे ९०दिवसांचं : उद्योग वाढीसाठी महत्वाचा काळ हा पहिले ९० दिवस असतात. आपला व्यवसाय वाढेल कि लॉस मध्ये जाईल याविषयीची प्राथमिकी कल्पना आपल्याला या पहिल्या ९० दिवसात येते. कित्येक वेळा नवीन व्यवसाय सुरु करणारे तरुण मुलं हे कोणाचा तरी यशस्वी उद्योग बघून व्यवसाय क्षेत्रात आलेले असतात आणि त्यांना जेव्हा व्यवसायातील अडचणी समजतात तेव्हा बरेचजण आपला व्यवसाय सोडण्याचा किंवा बंद करण्याचा विचार सुरु करतात.

हेच पहिले ९० दिवस जर तुम्ही चांगल्या नियोजनाने पेलून नेले आणि कमीत कमी १०% नफा मिळवला तर तुम्ही व्यवसायात योग्य नियोजन करून उतरला आहेत हे नक्की ! योग्य नियोजन, आलेल्या संकटांना योग्य अटीट्युड ने सामोरे जाणे, पैशांचा योग्य विनियोग या द्वारे व्यवसायात नक्कीच यश मिळवता येऊ शकते !

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.