नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
लष्कराच्या आधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रामध्ये भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात सामान्य माणूस पाऊल ठेवू शकत नाही. लष्कराचे संपूर्ण क्षेत्र काटेरी तारांनी संरक्षित केलेले असते आणि त्या क्षेत्राचे उल्लंघन म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक.
अमेरिकेतील नेवाडा प्रांतात एक अशी जागा आहे, जी अमेरिकन लष्कराच्या आधिपत्याखाली तर आहेच, पण गूढतेने वेढलेली देखील आहे. एरिया ५१ ह्या जागेबद्दल आजपर्यंत इतक्या वदंता पसरलेल्या आहेत की, बऱ्याच लोकांनी तिथे नक्की काय आहे किंवा अमेरिकन सरकार सामान्य जनतेपासून काही लपवत तर नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्या रहस्याची उकल होऊन देखील बरेच लोक उपलब्ध माहितीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, इतकी ती जागा संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.
मग एरिया ५१ या गुप्त ठिकाणाबद्दल प्रत्यक्षात काय माहिती आहे? एरिया ५१ हे दक्षिण नेवाडामधील ग्रूम लेक येथील अमेरिकन एअर फोर्सचे मिलिटरी इन्स्टॉलेशन आहे. ही जागा २४ तासांच्या सीसीटीव्ही देखरेखीखाली आहे. इथे काम करणारे कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणापर्यंत एका खासगी विमानाने पोहोचतात. ते ज्या विमानाने जा-ये करतात ते अचिन्हांकित असतं आणि मॅककारन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रतिबंधित टर्मिनल मधून निघालेल्या त्या एकाच विमानाला एरिया ५१ वरील हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यास परवानगी आहे. एरिया ५१च्या हवाई क्षेत्रावरून उड्डाण करणे जरी बेकायदेशीर असले, तरी तिथे ३.७ किमी लांबीची खाजगी धावपट्टी आहे. एरिया ५१ ची उपग्रह प्रतिमा सेन्सॉर केली जाते ज्यामुळे त्याचे गूढ अधिकच रहस्यमय बनले आहे.
एरिया ५१ मध्ये नक्की काय काम चालते ते अत्यंत गुप्त आहे. चेतावणीचे फलक, इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणे जसं सीसीटीव्ही आणि सशस्त्र रक्षक याद्वारे सर्वसाधारण लोकांना दूर ठेवले जाते.
१९५५ मध्ये सीआयएने या क्षेत्राची निवड लॉकहीड यू – २ या अत्यंत उंचावरून टेहळणी करणाऱ्या विमानासाठी चाचणी साइट म्हणून केली होती. तात्कालिन अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांनी चाचणीस परवानगी दिली, जी प्रोजेक्ट ॲक्वाटोन या कोड नेम किंवा सांकेतिक नावाखाली केली जाणार होती. १९५६ मध्ये यू – २ ची सेवा सुरू झाल्यानंतर, एरिया ५१ चा वापर इतर विमाने विकसित करण्यासाठी केला गेला, ज्यात ए – २ हे टेहळणी विमान, ज्याला ऑक्सकार्ट असेही म्हणतात, आणि स्टेल्थ फायटर एफ – ११७ नाइटहॉक यांचा समावेश आहे.
एरिया ५१ मध्ये एलियन्स वर संशोधन चालतं कां? हा प्रश्न तुम्हांला पडणं साहजिक आहे आणि हाच प्रश्न अनेक अमेरिकन लोकांना वारंवार पडत आलेला आहे. त्यात कितपत तथ्य आहे ते नक्की सांगता येणार नाही. बऱ्याच लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एरिया ५१ च्या परिसरात उडत्या तबकड्या पाहिलेल्या आहेत. पण मुळात एरिया ५१ बरोबर एलियन्सचा संबंध कसा जोडला गेला?
१९८९ मध्ये राॅबर्ट लाझार या व्यक्तिने दावा केला की तो स्वतः एरिया ५१ मध्ये कामाला होता आणि त्याने आंतमध्ये एलियनच्या शवविच्छेदनाची छायाचित्रे पाहिली आणि अमेरिकन सरकारने सापडलेल्या एलियन स्पेसक्राफ्टची तपासणी करण्यासाठी ह्या सुविधेचा वापर केला.
२५ जून, २०१३ रोजी सीआयएने माहिती स्वातंत्र्य कायद्याच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून यू – २ आणि ऑक्सकार्ट कार्यक्रमांची माहिती देणारे अवर्गीकृत दस्तऐवज जारी करण्यास मान्यता दिली. त्या दस्तऐवजांच्या प्रकाशनाने यूएस सरकारने प्रथमच एरिया ५१ चे अस्तित्व औपचारिकपणे मान्य केले. परंतु त्यानंतर इतर कोणतीही माहिती पुढे आली नाही. सत्य काहीही असलं, तरी एक गोष्ट नक्की, एरिया ५१ ही जागा नेहेमीच गूढतेच्या आवरणाखाली राहील.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा