शेवटी भारतात बॅ न झाले हे ऍ प ।। जाणून घ्या कोणते ‘ऍ प’ ‘बॅ न’ झाले..!

अर्थकारण बातम्या

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 59 धोकादायक चिनी ऍपसंदर्भात इशारा दिला आहे. भारत सरकारने या ऍपवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही 59 चिनी ऍप वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिली आहे. ही 59 ऍप सुरक्षित नसून या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे.

सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टीक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या ऍपचा समावेश आहे.यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या या यादीला आणि या ऍपवर बंदी घालण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने पाठिंबा दर्शवला आहे.

ही ऍप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सरकारला कळवण्यात आल्याचं, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यावर सध्या चर्चा सुरु आहे, असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. प्रत्येक ऍपशी संबंधित धोके आणि त्याचा धोक्यांचा अंदाज कसा बांधता येईल. यासंदर्भात सविस्तर माहिती सरकारला देण्यासंदर्भात काम सुरु असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

परदेशामध्ये बंदी घालण्यात आलेल्या काही व्हिडिओ कॉलिंग ऍपसंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने एप्रिलमध्येच इशारा जारी केला होता. राष्ट्रीय सायबर सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला होता. वापरकर्त्यांच्या म्हणजेच युझर्सच्या सुरक्षेसंदर्भात गांभीर्याने विचार न करणाऱ्या मोबाइल ऍपवर बंदी घालण्यासंदर्भातील मागणी वेळोवेळी केली जाते. मात्र हे असे आरोप कंपन्यांकडून फेटाळले जातात.

चीनमधील बाइट डान्स या कंपनीच्या मालकीच्या टीक-टॉक ऍपवर मागील काही काळामध्ये माहिती मिळवण्यासंदर्भातील आरोपांबरोबर युझर्सच्या खासगी माहितीबद्दल ठोस धोरण नसल्याचे आरोप करण्यात आले. मात्र कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.कंपन्यांकडून आरोप फेटाळण्यात येत असले तरी चिनी कंपन्यांशी संबंधित अँड्रॉइड तसेच आयओएस ऍप धोकादायक असल्याचे सांगण्यात येते.

चिनी कंपन्यांनी बनवलेले किंवा चीनमधील कंपन्यांच्या मदतीने बाजारामध्ये दाखल झालेले ऍप हे हेरगिरी तसेच मालवेअर पसरवण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता अनेकदा व्यक्त कऱण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांसंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींने हे ऍप वापरु नयेत अशा संदर्भातील सूचनाही करण्यात आल्याच्या बातम्याही मागील काही काळापासून सातत्याने समोर येत आहेत. माहिती सुरक्षित राहण्यासंदर्भात साशंकता निर्माण होत असल्याने असे ऍप वापरु नये असं सांगण्यात आलं होतं.

पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या ऍपच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवला आहे. एखाद्या देशासोबत वाद निर्माण झाल्यास या ऍपच्या माध्यमातून विरोधी देशाची संवाद यंत्रणा निकामी केली जाऊ शकते असाही एक इशारा या ऍपबद्दल देण्यात आला होता.