गाडी चोरीला गेल्यास काय करायला हवे? गाडी चोरी गेल्यास नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करता येते? आणि ती कशाप्रकारे करता येते? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

सध्या च्या काळात गाडीचा खूप उपयोग होतो. परंतु मित्रांनो जर तीच गाडी चोरीला गेल्यास काय करायला हवे? गाडी चोरी गेल्यास नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करता येते? आणि ती कशाप्रकारे करता येते? हे आज आपण बघणार आहोत. गाडी चोरी गेल्यानंतर तुम्हाला तीन गोष्टी करायला लागतात.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शंभर या नंबर वर तुम्ही पोलिसांना कॉल करून गाडी चोरीला गेली याची कल्पना देऊ शकता. कधी कधी काय होतं तुमची गाडी चोरीला जाते. परंतु तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याची तक्रार पोलिसांमध्ये देता. परंतु दुर्दैवाने कधी कधी असंही होतं, की त्या गाडी मार्फत कोणाचा तरी काही बरं वाईट केलं जातं.

किंवा ती गाडी चोरी च्या कामासाठी वापरले जाते. तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये गुन्हा जो काही दाखल होतो तो गाडी मालकावरच होतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुम्ही निर्दोष असल्याचं सिद्ध करावे लागत. परंतु मित्रांनो घटनेच्या पूर्वी गाडी चोरीला गेली, असं तुम्हाला त्यामध्ये सिद्ध करावे लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की गाडी चोरी गेल्यानंतर तुम्ही एफ आय आर ही द्यायला हवी.

आता एफ आय आर देत असताना सर्वप्रथम तुम्ही जवळचे पोलीस स्टेशन असेल तेथे जाऊन तुम्ही एफ आय आर दाखल करावे. यामध्ये भारतीय दंड संहिता कलम ३७९ नुसार तुम्ही एफआयआर दाखल करू शकता. म्हणजेच तो चोरीचा गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता ३७९. तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये एफआयआरमध्ये तुम्ही कोणते मुद्दे घ्यायला हवे.

यामध्ये तुम्ही सर्वप्रथम गाडीचा नंबर, गाडी च्या मालकाचे नाव, गाडी कधी चोरीला गेली, आणि कोणत्या स्थळावरून चोरीला गेली, ही प्राथमिक स्वरूपाची माहिती तुम्ही एफ आय आर मध्ये नमूद करायला हवी. या नंतर प्रश्न असा पडतो ऑनलाईन एफ आय आर वगैरे देता येते का? तर निश्चितच मित्रांनो ऑनलाइन सुद्धा एफ आय आर तुम्हाला देता येते.

परंतु यामध्ये ऑनलाइन एफ आय आर दिल्या नंतर तुमच्या ई-मेलवर तुम्हाला त्याची कॉपी सेंड केले जाते. परंतु मित्रांनो पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतरसुद्धा ज्या वेळेस तुम्ही एफआयआर दाखल करतात, त्यावेळेस निश्चितच तुम्ही त्याची कॉपी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी चोरी गेल्यानंतर तुम्ही इन्श्युरंस कंपनी ला कळवावे.

मित्रांनो आता असा प्रश्न पडला असेल की गाडी चोरी गेल्यानंतर इन्शुरन्स कंपनीला कळवायचे. परंतु त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. मित्रांनो प्रत्येक कंपनीचे कस्टमर केअर नंबर हे असतातच. किंवा टोल फ्री नंबरही असतात तर त्यानुसार तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून कंपनी ला गाडी चोरी झाल्याचे सांगू शकता.

आता इन्श्युरंस कंपनीला तुम्ही कळवल्यानंतर इन्शुरन्स कसा मिळेल? यासाठी पण काहीतरी नियम असतात, गाडी चोरीला गेल्यानंतर काही ठराविक वेळेच्या आत तुम्हाला कंपनीला कळवावे लागते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहा महिन्याच्या आत, गाडीचा संदर्भातली जेवढे काही कागदपत्र असेल. म्हणजे आरसी बुक असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, जे काही असतील ते तुम्हाला कंपनी पुढे सादर करावे लागते.

त्यानंतर गाडी चोरीला गेल्यानंतर म्हणजेच तुम्ही कंप्लेंट दाखल करता कंपनीत. त्यानंतर पंधरा दिवसानंतर कंपनीचे एजंट तुमच्याकडे येतो आणि त्या संदर्भातील सर्व डॉक्युमेंट्स तुमचे घेऊन जातो. आणि कंपनीकडे सादर करतो. आता एजंट तुमच्याकडे आल्यानंतर त्याला कोण कोणते कागदपत्र द्यावे लागतात? ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम तुमचा आयडी.

ज्या मध्ये आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड सुद्धा येतं. एक दुसरी गोष्ट म्हणजे आरसी बूक. तिसरी गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. चौथी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुमची गाडी चोरीला गेली होती, अशा वेळेस तुम्ही एफ आय आर हे दाखल केली होती. तर त्या एफ आय आर ची कॉपी लागते.

पाचवी गोष्ट म्हणजे जर तुम्ही गाडी लोन करून घेतले असेल किंवा एग्रीमेंट करून घेतली असेल. तर लोन केल्यावर असल्यास त्याचा एन ओ सी लागेल. आणि एग्रीमेंट असल्यास त्याचा एग्रीमेंट त्यासोबत जोडावे लागेल. आणि जर पोलिसांकडून जर ती गाडी शोधली गेली नाही.

तर त्याची अन् ट्रेस कॉपी ज्याला म्हणतात, ते सुद्धा तुम्हाला त्या एजंटला द्यावे लागते. सर्व कागदपत्रे घेऊन एजंट कंपनी मध्ये जातो आणि सर्व कागदपत्रे सादर करतो. मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एजंट कडे त्या इन्श्युरंस बद्दल चौकशी सातत्याने करायला हवी. परंतु मित्रांनो कधी कधी असंही होतं, की सर्व कागदपत्रे घेऊन सुद्धा तुम्हाला इन्शुरन्स मिळत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कंजूमर कोर्ट कडे अर्ज करू शकता.

यामध्ये तुम्ही क्लेम ची अमाउंट किंवा कंपेंसेशन किंवा यापैकी दोन्ही तुम्ही त्या ठिकाणी मागू शकता. मित्रांनो गाडी चोरी गेल्यानंतर तुम्हाला तीन गोष्टी कराव्या लागतात. ते तुम्हाला समजलच असेल. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शंभर नंबर वर कॉल करून तुम्ही पोलिसांना तात्काळ माहिती देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याची एफ आय आर देऊ शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्शुरन्स कंपनीला त्याबद्दल कळवू शकता.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.