मित्रांनो आपल्याला माहीत असेल की पेट्रोलपंपावर अनेक सुविधा उपलब्ध असतात, परंतु या 10 सुविधा कोणत्या त्या आपण जाणून घेऊ, एखाद्या पेट्रोलपंपावर जर या सुविधा उपलब्ध नसतील तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता, आणि ते जर नसेल तर त्या पेट्रोलपंपाच लायसन्स देखील रद्द होऊ शकत. ह्या सुविधा खालील प्रमाणे आहेत. 1.हवा भरणे-प्रत्येक पेट्रोलपंपावर गाडीमध्ये हवा भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक हवा भरण्याची मशीन आणि त्यासाठी एक कर्मचारी नियुक्त करणे अनिवार्य आहे.
या सर्विस साठी पेट्रोलपंपाचा मालक किंवा तेथील कर्मचारी तुमच्या कडे पैसे मागू शकत नाहीत. ही सुविधा मोफत लोकांना देणे गरजेचे आहे, जर अशी सुविधा उपलब्ध नसल्यास संबंधित कंपनी कडे तुम्ही तक्रार करू शकता. 2.फर्स्ट एड बॉक्स-प्रत्येक पेट्रोलपंपावर प्रथमोपचार पेटी उपलब्ध असणे आवश्यक आहे जेणेकरून गरज पडल्यास लोक त्याचा वापर करू शकतील. या बॉक्स मध्ये जीवनरक्षक औषधे तसेच मलमपट्टी असणे आवश्यक आहे,व त्यावर एक्सपायरी डेट असणे देखील आवश्यक आहे.
तसेच अंतिम विधी संपलेली औषधे बॉक्स मध्ये नसावी. जर गरज पडल्यास पेट्रोलपंपावर प्रथमोचार पेटी न दिल्यास संबंधित पेट्रोलपंपाकडे तुम्ही लेखी तक्रार करू शकता. 3.शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे-पेट्रोलपंप धारकांनी ग्राहकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. यासाठी डीलर ने RO, कूलर, आणि पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन स्वतः घेणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला कुठल्याही पेट्रोलपंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळाली नाही तर त्याची देखील तुम्ही तक्रार करू शकता.
4.फोन कॉल ची सुविधा-प्रवास करत असताना जर कदाचित काही नेटवर्क प्रॉब्लेम मुळे किंवा इतर कारणास्तव तुम्ही फोन करू शकत नसल्यास नजीकच्या पेट्रोलपंपावर जाऊन तिथे तुम्ही फोन करण्यासाठी विचारू शकता, तिथून एक फोन तुम्ही करू शकता, तेथील कर्मचारी तुम्हाला फोन साठी नकार देऊ शकत नाही. 5.वॉशरूम ची सुविधा-पेट्रोलपंपावर स्वच्छ वॉशरूम ची सुविधा असणे आवश्यक आहे, ते वापरण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही.
तसेच हे वॉशरूम तुटलेले किंवा अस्वच्छ असल्यास त्याची तक्रार तुम्ही करू शकता. 6.तक्रार पेटी आणि तक्रार रजिस्टर -प्रत्येक पेट्रोलपंपावर तक्रार पेटी असणे अनिवार्य आहे कारण की जर ग्राहक तिथे असलेल्या सुविधा बद्दल खुश नसेल तर तक्रार करण्यासाठी तक्रार पेटी असणे आवश्यक आहे. आणि तसे नसल्यास त्याचीही तक्रार तुम्ही करू शकता. 7.डिझेल व पेट्रोल ची किंमत जाणून घेणे-पेट्रोल व डिझेल च्या किमती जाणून घेणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.
त्यासाठी पेट्रोलपंपावर मोठ्या मोठ्या अक्षरात पेट्रोल आणि डिझेल च्या किमती लिहलेल्या असणे अनिवार्य आहे. तसे नसल्यास त्यासाठी देखील तुम्ही तक्रार करू शकता. 8.फायर सेफ्टी-मित्रांनो सेफ्टी संदर्भात एक महत्वाची सुविधा प्रत्येक पेट्रोलपंपावर असणे आवश्यक आहे ती म्हणजे फायर सेफ्टी. कारण पेट्रोल पंपावर जर आग लागली तर ती विजवण्यासाठी तिथे फायर सेफ्टी इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास त्याचीही तक्रार तुम्ही करत असाल.
9.बिल घेण्याचा अधिकार-पेट्रोलपंपावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला बिल घेण्याचा अधिकार आहे, जेणेकरून जर पुढे काही अडचण आली तर बिलाच्या आधारे ग्राहक तक्रार करू शकतात जर तेथील कर्मचारी बिल देण्यास नकार देत असतील तर त्याची तुम्ही तक्रार करु शकता. 10.पेट्रोलपंपावर पेट्रोल ची गुणवत्ता आणि माप तपासण्याचा अधिकार-प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल पंपावर पेट्रोल चे माप तपासण्याची.
त्यासाठी मागणी करण्याची मागणी आहे त्यासाठी डीलर ने 5 लिटर चे माप ठेवणे अनिवार्य आहे.तसेच पेट्रोल किंवा डीझेल ची गुणवत्ता तपासण्याचे देखील अधिकार ग्राहकास आहेत. जर पंपाचा मालक किंवा कर्मचारी पेट्रोल व डिझेल ची गुणवत्ता आणि माप तपासण्यास नकार देत असतील तर त्याची आपण तक्रार करू शकतो. अशा प्रकारे वरील सुविधा व अधिकार प्रत्येक पेट्रोलपंपावर उपलब्ध असणे अनिवार्य आहे. याबाबत माहिती देणारा हा लेख होता.
लीगल माहिती मिळाली परत अशा माहिती पाठवा
Nice