५०० रुपये ते ७५००० करोडचा प्रवास रिलायन्स चे संस्थापक ‘धीरूभाई अंबानी’ यांचा जीवनप्रवास !!

अर्थकारण लोकप्रिय

दहावी पास माणूस मुंबईत ५०० रुपये घेऊन येतो आणि आज ७५००० करोड चा मालक बनतो. गुजरातमधल्या एका छोट्या शहरात जन्मलेला मुलगा जगातील प्रसिद्ध व्यावसायिक बनतो ते ही कोणतीही पदवी नसताना. अशा या व्यक्तीच नाव आहे धीरूभाई अंबानी. धीरूभाई यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील चोरवाड या गावी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबानी हे शिक्षक होते, आणि आई जमुनाबाई हिराचंद अंबानी या गृहिणी होत्या.

घरची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घरच्यांना मदत म्हणून त्यांनी भजे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. वयाच्या १६व्या वर्षी ते त्यांच्या चुलतभवासोबत यमन देशात गेले. तिथे ते एका पेट्रोलपंपावर महिना ३०० रुपयाने क्लार्क च काम करू लागले. ते काम करता करता इतर पार्ट टाइम कामे पण करू लागले, धीरूभाई ना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची खुप आवड होती. शिक्षण कमी असून सुद्धा त्यांनी तिथल्या कंपनीतल्या अकाऊंट, मार्केटिंग, बुक किपिंग, आयात निर्यात या गोष्टी शिकून घेतल्या.

रात्रीचे ते वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करीत, इंग्लिश शिकण्यावर त्यांचा जास्त भर होता. रिलायन्स मोठं करण्यात ज्या गोष्टी शिकल्या त्याचा मला खूप फायदा झाला असे धीरूभाई सांगतात. काही वर्षे यमन मध्ये राहिल्या नंतर धीरूभाई कळून चुकले की आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर नोकरी करून चालणार नाही. आपल्याला काहीतरी व्यवसाय केला पाहिजे असे त्यांच्या मनात आले. हा विचार करून १९५८ मध्ये ते भारतात आले, तिथून ते मुंबई ला आले.

तेव्हा त्यांच्या खिसात फक्त ५०० रुपये होते. १९५८ मध्ये चुलतभाऊ चंपकलाल अंबानी यांच्या सोबत मिळून त्यांनी एक व्यवसाय चालू केला. इथले मसाल्याचे पदार्थ बाहेर देशात पाठवायचे आणि तिथून कपडे देशात आयात करायचे असा त्यांचा व्यवसाय होता, त्यांचे ऑफिस फक्त ३०० चौ फूट होते, त्यात एक टेबल आणि तीन खुर्च्या होत्या. त्यावेळी पॉलीस्टर ला खूप मागणी होती त्यामुळे त्यांचा बिसनेस चांगला चालत होता. पण १९६५ मध्ये त्यांची आणि त्यांच्या चुलतभवाची भागीदारी संपुष्टात आली.

अस म्हणतात याचे कारण धीरूभाई यांचा स्वभाव रिस्क घेण्याचा होता. आणि त्यांच्या भावाचा स्वभाव थोडा सावधगिरीचा होता. धीरूभाई म्हणतात व्यवसायाची समज रिस्क घेण्यानेच येते. पॉलीस्टर च्या लोकप्रियतेमुळे १९६६ मध्ये त्यांनी अहमदाबाद येथे रिलायन्स मिल या टेक्सटाईल कंपनीची स्थापना केली. आणि तो त्यांच्या आयुष्यातल्या टर्निंग पॉईंट ठरला, १९७५ मध्ये त्यांनी कपड्याचा विमल ब्रँड मार्केट मध्ये लाँच केला आणि तो खूपच लोकप्रिय झाला. वर्ल्ड बँकेच्या टीम ने त्यांना भेट दिली आणि विमल ब्रँड हा जागतिक दर्जाचा आहे असे प्रमाणपत्र दिले.

१९७७ मध्ये त्यांनी रिलायन्स चा IPO मार्केटमध्ये आणला आणि त्यांना रेकॉर्ड ब्रेक ५८००० गुंतवणूकदार मिळाले. याचे सगळे श्रेय धीरूभाई कडे असलेली लोकांना जिंकून घेण्याची कला आणि त्यांचा विश्वास संपादन करणे याला जाते. १९७६-७७ मध्ये रिलान्स ची वार्षिक उलाढाल ७० करोड च्या आसपास होती. १९८२ नंतर रिलायन्स कंपनी भारतातली सर्वात जास्त गुंतवणूकदार असलेली कंपनी झाली. १९८५ मध्ये रिलान्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड चे नाव रिलायन्स इंडस्ट्रीज करण्यात आले. १९८६ मध्ये धीरूभाई ना पॅरालिसिस चा अटॅक आला होता त्यात त्यांचा उजवा हाथ निकामी झाला पण त्यांनी काम करणे थांबवले नाही.

कारण ते म्हणायचे मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल. रिलान्सनंतर पेट्रोकेमिकेल, रिटेल, टेक्सटाईल, टेलिकॉम्मुनिकेशन, नॅचरल गॅस, मीडिया या क्षेत्रांमध्ये त्यांनी पदार्पण केले. २४ जुन २००२ साली धीरूभाई यांना हृदयविकारा मोठा झटका आला त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले. ६ जुलै २००२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. २००२ साली त्यांच्या कंपनीची आर्थिक  उलाढाल  ७५००० करोड रुपयाच्या वर गेली होती. जोखीम घ्यायला न घाबरणे, सतत नवीन गोष्टी शिकणे, लोकांना आपलंसं करण्याची कला, अपयशाला पचवण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी आपण धीरूभाई यांच्या कडून शिकू शकतो.